घ्या काळजी
घ्या काळजी
ती रस्त्याच्याकडेला उभी राहून त्याला बघत होती. तो ही रंगांची उधळण करत एक नजर तिच्याकडे बघत हसला. ती लाजली.... तो लोकांच्या गर्दीतून वाट काढत तिच्याजवळ आला. हातात गुलाल घेऊन अलगदपणे तिच्या गालावर गुलाल लावणार तितक्यातच ती त्याच्या हातावरच शिंकली. त्याने लगेच हातातील गुलाल फेकून शर्टच्या खिशातून सॅनिटाइजरच पाकिट बाहेर काढलं व त्यातून सॅनिटाइजर हातावर घेऊन हात चोळत तिथून पळ काढला. अहो, कोरोना व्हायरस आलाय ना काळजी तर घ्यायलाच पाहिजे....