Priya Pawar

Others

3  

Priya Pawar

Others

स्टे हो म प्लीज

स्टे हो म प्लीज

3 mins
897


अनुप आणि क्षिप्रा यांच्या लग्नाला पाच वर्षे झालीत. दोघेही पेशाने डाॅक्टर, अनुप सरकारी हाॅस्पीटला मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत. पाच वर्षे होऊनही घरी पाळणा हलला नव्हता,त्यासाठी अनेक ट्रिटमेंट घेतल्यावर क्षिप्रा गरोदर राहिली होती. घरात आता बाळाच्या रडण्याचा आवाज गुंजणार, छुमछुम वाजवत बाळ दुडूदुडू आपल्या इवल्याशा पावलाने घरभर धावणार या कल्पनेने त्या दोघांचेही मन आनंदाने भरून आले होते. 

क्षिप्रा म्हणाली, "मग अनुप तु तर आता बाबा होणार आहेस, आता तुझे केसं आणि मिश्यांच काही खरं नाही... "

अनुप हर्षित होऊन म्हणाला, "हो ना, मी तर आता आतूरतेने वाट बघतोय कधी मी माझ्या बाळाला कुशीत घेऊन त्याला डोळे भरून बघेल याची.... हो पण आता तुझी काळजी घ्यायला हवी तुला डाॅक्टर रीना मॅडमने बेडरेस्ट सांगितलाय.. "

क्षिप्रा अनुपला मिठी मारत म्हणाली, "ते तर मी घेतच आहे आणि माझ्याही पेक्षा तुच माझी काळजी जास्त घेतोय... तु असल्याने मला काहीच टेन्शन नाही... "

"हो ग राणी, मी तर आहेच पण गावावरून आईबाबांना पण बोलावून घेतो... तु दिवसभर एकटीच असते ना... " अनुप म्हणाला

तिनेही होकार दिला. आईबाबा आलेत ते पण आनंदी होते कारण त्यांच्या सोबत खेळायला छोटासा त्यांचा मित्र/मैत्रिण जे येणार होते... 

बघता बघता क्षिप्राला आठवा महिना लागला होता... आता त्यांची उत्सुकता अजूनच वाढली होती... मार्च महिन्याच्या शेवटी ती एका गोंडस बाळाला जन्म देणार होती...... पण म्हणतात ना कधी कधी अती आनंदाला नजर लागते तसेच त्यांच्या कुटूंबाबाबतीतही झाले. राज्यात अचानक कोरोना नामक व्हायरस पसरल्याची बातमी आली.... हळूहळू करून कोरोना व्हायरस ने संपूर्ण देशाला वेठीस धरले... 

हे ऐकून क्षिप्राला तर धडकीच भरली. अनुप तिला सावरत म्हणाला, "हे बघ क्षिप्रा या व्हायरसला घाबरण्याची गरज नाही तर दक्षता पाळण्याची गरज आहे त्यासाठी तुला घरीच राहून तुझी व आपल्या बाळाची काळजी घ्यावी लागणार आहे आणि आईबाबा तर आहेच तुला मदतीला... "

"आणि तु.???......" क्षिप्राचे टपोरे डोळे पाण्याने तुडूंब भरून गेले होते 

"मला हाॅस्पिटलला जावेच लागेल.... त्यामुळे मी घरी नाही येऊ शकणार कारण त्याचा आपल्या बाळाला व आईबाबांना पण धोका राहील.... " म्हणत जड अंतःकरणाने तो तिला मिठी मारून निघून गेला. 


अनुप आता हाॅस्पिटलच्या शासकीय वसाहतीत एकटा राहतोय परिवारापासून दूर....आणि त्याचा बाळ या जगात आल्यावरही तो त्याला आपल्या हाताने स्पर्श करू शकणार नाही, त्याच्या जवळही जावू शकणार नाही कारण कारोना नामक राक्षसाचे सावज अख्या जगावर पसरलेले आहे.... सध्यस्थितीत  तो आठवड्यातून एकदा घराच्या फाटकातूनच आपल्या गरोदर बायकोला दुरूनच बघून पाणावलेल्या डोळ्याने परत निघून जात आहे

त्यांचा बाळ या जगात आल्यावरही तो बाप आनंदाने आपल्या बाळाला कुशीत घेऊ शकणार नाही, हात लावू शकणार नाही.... देवा अशी यातना कोणाच्याही वाटेला येऊ देऊ नको... 


ही कहाणी सत्य आहे जरी यातील पात्रांची नावे बदलवली आहेत... माझापण नवरा सरकारी दवाखान्यात डाॅक्टर म्हणून कार्यरत आहेत तर हे सर्व आम्ही खुप जवळून अनुभवतोय... म्हणूनच तुम्हा सर्वांना विनंती करतेय.... आपले सर्व मेडिकल स्टाफ, पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी, बँकेतील कर्मचारी हे आपले कार्य तत्परतेने बजावत आहेत त्यांनाही कुटूंब आहेत म्हणून तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आपण पण घरात राहून त्यांच्या कार्यात मदत करायला हवी... कृपया करून घराबाहेर पडू नका... आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना नामक शत्रूला आपल्याला हरवायचे आहे... 

 "STAY AT HOME PLEASE "


Rate this content
Log in