Priya Pawar

Others

3  

Priya Pawar

Others

घ्या आवरून कपाट

घ्या आवरून कपाट

2 mins
724


आता एकवीस दिवस लाॅकडाऊन...मग करायचे काय? मग विचार केला चला कपड्यांचं कपाट आवरू म्हटलं.... कपाट उघडल्यावर....तर पहिले कपाळावर आठ्या पडल्या पण वेळ घालवण्यासाठी तेव्हा हे करावच लागला कारण बाकी काही करायचा तेव्हा मूड नव्हतं... बसले पालखट मारून कपाड्यांच्या ढिगामध्ये...म्हटलं भरंभरं अर्ध्या तासात आवरून घेऊ. पण कशाचं, स्त्रियांना कपडे बघितले की घालून बघायचा मोह आवरत नाही ना मग ते जूने असो की नवे...


मग झालं ते सुरू पहिले साड्यांचा नंबर लागला एक एक साडी नेसून बघून आरश्यासमोर मटकनं धटकनं झालं मग त्यांच्या घड्या घालून त्यांना कपाटात ठेवल्या... त्यानंतर आले सलवार सूट... तर कुर्त्या मधातच डोके वर काढून माझ्याकडे बघत जणू 'मेरा नंबर कब आयेगा?' म्हणत होत्या त्यानांही माहिती आहे ना आता ही बाई काही लवकर आवरून आपल्याला ठेवणार नाही अन् आपल्याला काही आराम करायला मिळणार नाही...त्यांना जरा थांबा म्हणत सर्व सलवार सूट पहिले बाजूला काढले. मग तेही घालून ओढणी घेऊन एकदा उजवीकडून एकदा डावीकडून स्वतःला आरश्यात बघितले आणि हे सर्व करताना केसांची पुरचुंडी बांधून बसलेला चिमटापण निघत केसं पण मटकायला लागले. मग थोड्यावेळाने झालेत एकदाचे सलवारसूट घडी घालून.... मग कुर्त्या लेगिंग यांची घडी झाली. कपाट आवरणं झालचं होता तेच काही जुने टाॅप आणि जीन्स उड्या मारायला लागले म्हटलं चला यांना पण अजून एक चान्स देऊन पाहू... तर कितीही श्वास आत ओढला तरी ते काही अडजस्टमेंट करायला तयारच नव्हते. म्हटलं जाऊ द्या आता या लाॅकडाऊन पिरीयडमध्ये वजन कमी करूच की, तेव्हा घालून बघू म्हणून ते पण लगेच घडी करून कपाटात गेले.


मग आली गुपित खजिन्याची पाळी. सर्व पर्सेस हुडकून काढल्यावर चक्क सोळाशे एक्केचाळीस रूपये सापडले ना. अशी खुश झाली ना मी की कपाट आवरताना आलेला सर्व थकवाच पळाला... बघताबघता एक कपाट आवरायला दोन तास लागले... हुश्श... पण असं छान कपाट आवरून ठेवलं ना एकदम नीटनेटकं दोन चार वेळा तर त्याची नजरच काढली मी, कारण माझीच नजर लागते ना त्याला... असो तुम्ही पण आवरा कपाट, बघा वेळ कसा जातो ना कळणार पण नाही... आता हीच आशा की हे लाॅकडाऊनचे दिवस लवकर जावे आणि भारत कोरोनामुक्त व्हावा...


Rate this content
Log in