Priya Pawar

Others

3  

Priya Pawar

Others

विश्वासाचा खून

विश्वासाचा खून

6 mins
797


"अवं सुनिता... आवर पटकन, लेकरायले कपडे घ्याले जाचं हाये, " दगडू पायावर पाणी घेत म्हणाला. 

"बाप्पा, कश्याले आत्ता तं तुमी तुमच्या बहिणीच्या लग्नासाटी पैशे देल्ये नं...आता कायले खर्च करून राहिले अजूक, " सुनीता हातातला झाडू एका कोपर्यात फेकत म्हणाली. 

"मंग काय पोरायले खरकटल्या कपड्याईन नेऊ काय माया बहिणीच्या लग्नात??, "असं म्हणत तो तिच्यावर खेकसला. 

" अस्स म्या पैशे मांगितले तं तुमच्यापासी खडकू नाई सापडत आता कुटून यून राईले "सुनिता जरा ठसक्यातच बोलली. 

त्यामुळे तो रागात येऊन बोलला, " जास्त शानपट्टी नगं करू चुपचाप तयारी कर "


"हाव चाल्ली" म्हणत तिही आत झोपडी मध्ये शिरली व तयार होऊन बाहेर आली. दोन्ही मुलं आनंदात नाचत तयार होऊन बाहेर आले. ते चौघेही मग मार्केटमध्ये जाऊन मस्तपैकी कपडे घेऊन आले, पण परत येतांना त्यांचा अडीच वर्षाचा बबन नविन ड्रेस आत्ताच घालायचा म्हणून हट्ट करू लागला. ते दोघेही त्याला समजावत होते. घरी आल्यावर सुनिता स्वयंपाक बनवायला लागली व दगडू झोपडीबाहेर बीडी फुकत बसला. बबन मात्र अजूनही रडत होता म्हणून सोनू त्यांची चार वर्षाची लेक चुपचाप पिशवीतला ड्रेस काढून त्याला घालून देत होती. तेच सुनिताचं लक्ष गेला आणि तिने तिच्या हातातलं लाटणं सोनूकडे भिरकावला.ते सोनूच्या पायाला जोराने लागलं व ती पण भोकांड पसरून रडायला लागली. पोरांच्या रडण्याच्या आवाजाने दगडू आत आला व सुनितावर ओरडला, "काऊन मारून राह्यली माया पोरायीले मायाच पैशाचे हाय ते कपडे, घालू दे त्यायले तु कायले मारून राह्यली"


तिही रागात बरळली, "मंग तुमच्या दोन पोरायले घेऊन राहा अन् तुमीच खाऊ घाला, मी जातो येकटी कुटं निंघून"

तेव्हा तो म्हणाला, "असीन ना तुया लफडं बाहेर म्हणून तं घरात अशी वागून राईली"

ती चांगलीच भडकली व म्हणाली, "जास्ती बोलू नको नाहीतं दोन्ही पोरायले घेऊन विहीरीत उडी मारून जीव देईन"

तिच्या या बोलण्याने त्याच्या तळपायातली आग मस्तकात गेली व कोपऱ्यात पडलेला झाडू घेऊन तिला बदडू लागला. ती अगदी जमीनीवर कोसळली आणि त्याने हातातला झाडू फेकत तिथून तावातावाने निघून गेला. तिनेही रडतरडत दोन्ही पोरांना जवळ घेतले व तसेच ते तिघेही उपाशीपोटी झोपी गेले. सकाळी उठून ती दगडू आला नाही म्हणून शेजारीपाजारी चौकशी करू लागली. तोच शेजारी राहणारा मंगेश म्हणाला, "म्यां काल रातच्याला दगडूले दारूच्या दुकानात पायलं व्हतं बम्म दारू ठोसली त्यानं अन् तो तिकडं जंगलाकडं गेलता, म्यां आवाज द्येले त्याले पण तो काई थांबला नाई मले वाटलं आला असीन वापस"


त्यावर चिंतेने अस्वस्थ झालेली सुनिता दोन चार लोकांना घेऊन जंगलाच्या रस्त्याने दगडूला शोधायला गेली. त्यांना मोठमोठ्या वाढलेल्या झाडाझूडपात पडलेला दगडू दिसला. ते सर्वजण धावतच तिथे गेले. त्यांनी बघितला पण दगडूचा जीव गेला होता. त्याला सापाने दंश केला होता. सुनिताच्या तर पायाखालची जमीनच सरकली. ती धपकन जमिनीवर बसली व तिने दगडूला उठवण्यासाठी त्याला हलवत जोरदार टाहो फोडला. फाटक्या संसाराला अर्ध्यातच सोडून दगडू तर गेला होता. आता एकट्या सुनितावर दोन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली होती. तिच्या माहेरहून आणि सासरहून तिला कुठल्याही प्रकारची पैशाची मदत मिळणार नाहीत हे तिला ठाऊक होता. दोन वर्षापासून सुनितानेे कामही सोडला होत म्हणून शेजारच्या मंदाच्या मदतीने तिला धुणीभांडी करण्याचे तीन-चार घरी काम मिळालं. दोन्ही मुलांना कामावर सोबतच ती घेऊन जात होती ,त्यामुळे सोनूला शाळेत पाठवणं तिने बंद केले होते कारण सोनूला ती एकटी घरी ठेऊ शकत नव्हती. सोनूही आईला धुणीभांडी धुवायला मदत करत होती. लताताईंच्या घरीपण सुनिता धुणीभांडी धुवायची. तिच्या मुलांना लताताईंच्या घरी जायला आवडायचे कारण त्यांना तिथे रोज छान खाऊ खायला मिळायचा. तिलाही ताईंचा आधार वाटायचा त्या नेहमी तिला गरजेच्या वेळी पैशाने मदत करायच्या. एके दिवशी लताताई म्हणाल्या, "का गं सुनिता...तु सोनूला शाळेत का नाही पाठवत? "


त्यावर सुनिता म्हणाली, "काय करू मंग ताई, ईची शाळा दोन वाजता सुटते अन् मी कामं आटपून पाच वाजता घरी जात असतो मंग एकट्या पोरीले झोपडीवर नाई ना ठेवू शकत अन् आमच्या झोपडपट्टीतल्या माणसाईचा काई भरवसा नाई त्यापेक्षा मायी पोरगी माया सोबतच बरी"

लताताई तिला समजावत म्हणाल्या, "अगं हो पण ती शिक्षणापासून मुकतेय ना आणि आजच्या काळात शिक्षण खुप महत्त्वाचे आहे गं... तु असं कर तिला शाळा सुटल्यावर माझ्या घरी ठेवून जात जा आणि जातांना तिला घरी घेऊन जात जा"


सोनूचाही निस्तेज असलेला चेहरा क्षणात उत्साहाने उजाळला. मुलीच्या आग्रहाखातर तिनेही संमती दर्शवली. दुसर्यादिवशीपासून ती सोनूला शाळेत पाठवायला लागली व शाळा सुटल्यावर लताताईकडे सोडून देऊ लागली. तिथे सोनूचा ताई रोज अभ्यास घ्यायची. आता असाच तिचा रोजचा रूटीन सुरू झाला होता. असेच एक दिवस ताई मार्केटला गेल्या असता विक्कीने (ताईंचा मुलगा) दार उघडून सोनूला आत घेतलं. सोनूही हातपाय धूवून हाॅलमध्येच अभ्यास करत बसली. विक्कीही आतल्या खोलीत जाऊन अभ्यास करू लागला. थोड्यावेळाने त्याने आपल्या खोलीचा दरवाजा लावून घेतला व आत मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसला. सोनू बाहेरच अभ्यास करत बसली होती. नंतर काही वेळाने विक्की दार उघडून बाहेर आला थोडासा अस्वस्थ आणि अशांत झालेला तो सोनूला त्याच्या खोलीत जाऊन अभ्यास करायला त्याने सांगितले. सोनूही लगेच गेली व जमिनीवर बसून त्याच्या खोलीत अभ्यास करत बसली. विक्की लगेच घराबाहेर जाऊन आजूबाजूला बघू लागला. ती दुपारची वेळ होती म्हणून सर्वत्र सुनसान झालं होतं. त्याने आत येऊन आतून हाॅलच्या दाराची कळी लावली व आपल्या खोलीमध्ये गेला. जमिनीवर बसलेल्या सोनूला त्याने त्याच्या बेडवर बसायला सांगितला. तिही एक पाय जमिनीवर ठेवत दुसरा पाय बेडवर चढण्यासाठी वर उचलते व बेडवर ठेवते तेव्हा तिचा शाळेचा ड्रेस थोडा वर सरकला. तसेच एखाद्या वाघाने शिकार दिसल्यावर झडप मारावी तशीच झडप विक्कीने सोनूवर मारली. तिचे कोमल शरीर आपल्या दोन्ही हातांच्या मधात दाबत तिला गच्च पकडून तिच्या अंगाचे तो चुंबन घेत होता. तिला अचानक आपल्या सोबत काय होतेय हे कळत नव्हता पण विक्की काहीतरी विचित्र आपल्या सोबत वागतोय ह्याची तिला जाणीव होत होती.


ती घाबरून ओरडायला लागली, "दादा हे काय करून राह्यीला... मले सोड... काकू ...दादाले सांगा ना मले सोडाले... आई मले वाचव... मले आईपाशी जा च हाय सोड मले दादा..."

तो तिला दाटत चूप करू लागला पण ती आणखीच ओरडायला लागली म्हणून तो एका हाताने तिचा तोंड दाबत होता. ती हातपाय हालवत तोंडावरचा हात काढण्यासाठी धडपडू लागली पण काही क्षणातच ती शांत झाली. तसाच विक्की भानावर आला, तो घाबरला... त्याला काहीच सुचत नव्हते, त्याने तिला उचलून हाॅलमध्ये ठेवले व आईला फोन करून सोनू चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे असे खोटेच सांगितले. ताई लगेच घरी येऊन सोनूला बघितला तर तीचे शरीर गार झालं होत व तिच्या शरीरावर ताज्या ओरबडण्याच्या खुणा होत्या. 


ती लगेच विक्कीकडे बघत म्हणाली, "काय झालं हिला अचानक?? तू तर काही केला नाही ना?? "

तो जरा भांबावला व म्हणाला, "वेडी आहेस का आई... मी कशाला काय करणार आहे.. "

ताईने लगेच विक्कीला पाठवत ऑटोरिक्षा बोलावला व सोनूला घेऊन ते दोघेही हाॅस्पिटलला गेले. तिने फोन करून सुनितालाही हाॅस्पीटला यायला सांगितला. हाॅस्पिटलमध्ये डाॅक्टरांनी सोनूला तपासल्यावर मृत घोषित केला व तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला हे ही सांगितले व आत जाऊन फोनवरून पोलिसांना कळवले. हे ऐकून लताताई व सुनिता स्तब्ध झल्या. सुनिता तर खालीच कोसळली, तिला धक्काच बसला...व रडत ती म्हणाली, "आतापर्यंत हसतखेळ होती मायी पोर.....कसं झालं हे ताई?? कोणाचं काय घोडं मारला होता तिनं???? "

ताई रडतच तिला आधार देत होत्या. विक्की मात्र भितीने एका कोपऱ्यात नखं कुतरत उभा होता. तितक्यात तिथे पोलिस आले ते पाहून विक्कीची चांगलीच झोप उडाली व तो घाबरून आईजवळ गेला, व आईचे दोन्ही हात पकडत म्हणाला, "आई माफ कर मला... मी मुद्दाम नाही मारला तिला चुकून झालं माझ्याकडून हे सर्व... माहित नाही कुठला सैतान घुसला होता माझ्यात... मला वाचव आई मला जेलमध्ये नाही गं जायचं आहे..." व रडायला लागला. तिला तर धक्काच बसला तिने रागाने त्याचे दोन्ही हात झटकले व मागे सरकली. पोलिसांनीही हे ऐकलं व त्याला ताब्यात घेतला व पोलीस स्टेशनला घेऊन गेले. सुनिता आता हे कळाल्यावर पश्चातापाने आणखीच जोराने रडत ताईला म्हणाली, "म्हणून मी सोनूले शाळेत पाठवत नव्हती... ताई तुमच्याच घरी तिच्यासोबत असं होईन हे कुटं मले मालूम व्हतं... मायी सोनू मले पाहिज्ये..."


ताईतर स्तब्धच झाली होती. ताईंच्या नवऱ्याचा फोन आल्यावर तिने त्यांना हाॅस्पिटलला बोलावून घेतले. तिथे आल्यावर त्यांना जेव्हा हे कळालं तर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ताईंना घेऊन ते पोलिस ठाण्याला गेले. तिथे गेल्यावर त्यांना पोलिसांकडून समजले की आपल्या पोराच्या मोबाईलमध्ये बरेचशे पाॅर्न व्हिडिओज आहेत तर दोघेही थक्कच झाले... त्यांना आपल्या एकुलत्या एक एकोणवीस वर्षाच्या मुलाला अती लाडाकोडात वाढवल्याचा व त्याला त्याची स्पेस देत निष्काळजीपणाने त्याच्यावर लक्ष न ठेवण्याचा पश्चाताप व्हायला लागला. ते दोघेही तिथेच रडायला लागले.

 

त्या दिवशी सोनूच्या, सुनिताच्या आणि विक्कीच्या आईवडिलांच्या विश्वासाचा खून झाला होता. पुढे जाऊन विक्कीला तर त्याच्या गुन्ह्याची शिक्षा न्यायव्यवस्था तर नक्कीच देईल पण असे कितीतरी सोनूंवर आजही समाजातली मतीभ्रष्ट झालेल्या लोकांच्या वाईट नजरा असतील... अन् असे विक्कीही असतील ज्यांच्यावर घरच्यांचे कुठलेही दडपण नसणार अन् त्यामुळे ते अश्या वाईट मार्गाने जात असतील...


Rate this content
Log in