घटस्फोटाच्या वाटेवर
घटस्फोटाच्या वाटेवर


(पात्र-पती-मंगेश, पत्नी-मीरा, सासरा-रामदास)
(दृष्य-घरातील-मंगेश कामावरुन घरात येतो.
मंगेश:मीरा, मला पाणी प्यायला आण.
मीरा:घ्या स्वतः उठून.
मंगेश :अरे, असे तुला अचानक रागवायला काय झाले?
मीरा:मला सोन्याचे दागिने पाहिजेत म्हणजे पाहिजे
मंगेश:तुला लग्नात तर केलेना?अजून कशाला दागिने पाहिजे?तुला का दागिन्यावर झोपायचे?माझा तुटपुंजा पगार. त्यात ह्या महागाईत महिन्याचा खर्च भागविणे अवघड झालेत. तुझी इच्छा आता तरी मी पूर्ण करू शकणार नाही. महिन्याचा पगार पुरत नाही. त्यात दागिने कर्ज काढून झेपणारे नाही. आपली परिस्थिती चांगली सुधारली की करू.
मीरा:अहो ती शेजारची प्रिया बघा. किती दागिने आहे तिच्या अंगावर. ती येऊन सांगते माझ्या नवरा किती चांगला. मला दहा तोळयाचे मंगळसूत्र बनवले.नाहीतर तुम्ही, लग्नात फक्त एक तोळ्याचे मंगळसूत्र.
मंगेश:तिच्या नवऱ्याला पगार साठ हजार. सरकारी नोकरी वाढता पगार. माझा पगार पंधरा हजार. त्यात भाडयाची खोली. आपल्याला ते कसे शक्य?आपण दोन वेळच्या जेवनाचा विचार करायचा. समाधान मानायचे. कुणाशी ही बरोबरी करायची नाही. दागिने म्हणजे आपण ओढवून घेतलेले संकट आणि दुःख! सुखाने झोप नाही. कुठे दागिने घालून फिरायची भिती!हल्ली दागिने चोराने किती सुळसुळाट केलाय. चालताना दागिने पळवतात.जीवाला धोका पत्करायचा.पोटापुरते आहे ना दागिने.
मीरा:समाधान तुम्ही माना. मला दागिने पाहिजे म्हणजे पाहिजेच. नाहीतर माझ्या सोबत रहायचे नाही. बायको म्हणून कुठलाच सबंध ठेवायचा नाही. मी तुमची कुणीही नाही.
मंगेश:पगार वाढला की करू दागिने.(दोघांत भांडण होते.)
मीरा:लग्नाच्या अगोदर तुम्ही दागिने करणार होते. बंगला घेणार होते. मला पंचविस हजाराचा मोबाइल घेणार होते.
कुठे गेले ते सर्व?
मंगेश:हो म्हणालो होतो;पण एकदम नाही. आपल्या संसारात त्याच्यावाचून काही अडलय का?
मीरा:तुमची खानदान नाहीतरी लबाडच आहे. मला तुमच्यासोबत नाही नांदायचे. करा एखादी हिरोनी.
मंगेश:तुझा बाप सुद्धा भाडयाच्या खोलीत राहतो. तुझ्या आईच्या अंगावर एक फुटका सोन्याचा मणी तरी आहे काय?बिचारे, त्यांनी सगळे दागिने विकून तुझे लग्न केले आणि तू मला सोडायला तयार झाली?अजून त्यांचे कर्ज सुद्धा फिटले नाही. पाहिजे तर तू कामाला जा आणि आण पैसे म्हणजे कळेल तुला कष्ट काय असतात ते.
मीरा:हो, हो म्हणे कामाला जा. त्यासाठी नाही मी लग्न केलय.पोसायचे जीवावर आलेय का?बांगड्या भरा. तुमच्यापेक्षा किती भारी स्थळ आले होते. गाडी, बंगला.
उगाचच तुमच्याशी लग्न केले.
मंगेश:मी गरीब घरातील माणूस. मला आई, वडील, लहान, भाऊ, बहीन सगळ्यांना पहावे लागते. त्यांना उपाशी ठेवून तुझी इच्छा पूर्ण करायला मी तेवढा श्रीमंत नाही. तुझी इच्छा असेल तर ठीक आहे ,घे घटस्फोट.नाहीतरी मी तुझ्या दररोजच्या भांडणाला खूप कंटाळलोय.
(मंगेश ,त्यांचे सासरे रामदास यांना मोबाइल वरुन दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी बोलवतात.)
रामदास:मीरा,तुम्ही दोघे का बोलत नाही?
मीरा:मला ह्या माणसाबरोबर नांदायचे नाही. तुम्हीपण माझी फसवणूक केलीय. माझ्या पसंतीने मी मुलगा पाहिला होता तो किती श्रीमंत होता आणि पहा माझ्या गळ्यात भिकारचोट बांधलाय.
मीरा:असे काही बोलू नकोस. तो तुझा नवरा आहे. दागिने, बंगला आजनाउद्या होईल. एकदम कुणी श्रीमंत होत नाही. श्रीमंतीपेक्षा संस्कार, खानदान, माणुसकी पैशापेक्षाही मौल्यवान असते. सगळा राग विसरून जा. मी तुझ्या आयुष्यात किती दिवस पुरणार आहे?
मीरा:बाबा, माझा अखेरचा आणि शेवटचा निर्णय मी घेतला आहे. मला नाही नांदायचे.
रामदास:बघ,परत एकदा विचार कर. आयुष्य खूप मोठे आहे. अश्रू ढाळत .....
मीरा:होय, बाबा पण आता आम्हाला दोघांनाही एकत्र राहण्याची इच्छा नाही.
रामदास:ठीक आहे पोरी.
मंगेश :मला ही तिचा निर्णय मान्य आहे.
रामदास:माफ करा मंगेशराव.मी तुमच्यावर कोणतीही केस करणार नाही. कोर्टात जाणार नाही. येतो.