घोटाळा
घोटाळा
कधी कधी असाही घोटाळा होऊ शकतो
घोटाळा
"हॅलो मिल्या"
"हां बोल राजा"
"अरे गण्याचे बाबा ऑफ झाले"
"अरेरे वाईट झालं ओके चल बाय"
"अरे बाय काय करतोस?"
"मग"
"अरे आपल्यालाच सगळी तयारी करायची आहे"
"नाही रे नाही जमणार दोन दिवसांनी आजच आलोय कामावर"
"कुठे गेला होतास दोन दिवस"
"अरे पक्याची हळद होती काय धमाल आली"
"हळद दोन दिवस?"
"अरे दुसऱ्या दिवशी हॅंग ओव्हरची सुट्टी"
"अरे मिल्या प्रसंग काय तू काय बोलतोयस"
"मी संध्याकाळी येतो सुटल्यावर पाया पडायला"
"अरे गण्याकडे सत्यनारायण नाहीय रे त्याचा बाप मेलाय"
"मी काय करू तू दुसरं कोणी बघना मला इथून काय काम करायचंय ते सांग"
"ठीक आहे सगळ्या गृपवर बातमी टाक. संध्याकाळी ५ वाजता उचलणार आहेत म्हणून. ५ चा टाईम दे आणि सामानाची ऑर्डर पण दे मी आहे गल्लीत"
"ओके करतो आणि मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो ओके बाय"
"मिलिंद "
"हा आई बोल अरे वाडीत गर्दी कसली आहे"
"गर्दी अरे हां ते बाबा गेले"
"काय?"
"अगं हो गण्याचे बाबा गेले"
"अरे नीट बोल रे तू आता मी गेले असते"
"नको तू आत्ता नको जाऊस आधी मी जातो आणि तुला कळवतो"
"अरे तुझं काय चाललंय"
"आई मी कामात आहे गं आपण नंतर बोलू"
"मिलिंद"
"हा बाबा"
"नक्की कोणाला पोहचवताय"
"कुठे?"
"वैकुंठाला"
"साॅरी बाबा मला वेळ नाही आपण नंतर जाऊया"
"कुठे?"
"तेच वैकुंठाला"
"अरे भ...दारात मयताच सामान आलंय ते कुणासाठी?"
"ते होय ते गण्याचे बाबा गेले ना त्यांच्यासाठी"
"मग ते आपल्या दारात तिरडी बांधतायत"
"हो का? मग इथे बांधून तिथे नेत असतील. मी बघतो आणि तुम्हाला फोन करतो"
"हॅलो राजा"
"अरे तुझा फोन का लागत नाही?"
"अरे ऑफिसमध्ये फोन सायलेंटवर असतो"
"अरे पण काही इमर्जन्सी असली तर"
"घरच्यांकडे माझ्या ऑफिसचा नंबर आहे ते काॅल करतात त्यावर"
"अरे फक्त घरच्यांनाच इमर्जन्सी असते का? इतरांना असली तर"
"ते जाऊदे मी फोन का केला ते मयताच सामान आमच्या दारात का ठेवलस? ते उचल आणि गाण्याकडे घेऊन जा"
"अरे तेच सांगायला फोन करतोय तुला गण्याच्या बाबांना पोहचवून आलो आम्ही. आता गर्दी तुझ्या दारात आहे"
"माझ्या दारात कशाला"
"तू गृपवर मॅसेज काय टाकलास"
"बाबा गेले"
"कुणाचे?"
"गण्याचे"
"मग तू गण्याचे नाव टाकलेच नाही"
"नुसते बाबा गेले ५ वाजता अंतिम यात्रा घरातून निघेल एवढंच टाकलयस, आता ये आणि निस्तर काय ते"
"अरे देवा! तेव्हाच बाबांचा फोन आला आणि ते वैकुंठ अरे बापरे मेलो...."
