akshata alias shubhada tirodkar

Horror Fantasy

2  

akshata alias shubhada tirodkar

Horror Fantasy

गडद

गडद

2 mins
3.2K


ढगाळ वातावरण झालेलं. पाऊस येण्याचे संकेत होते. संध्याकाळी पाचची वेळ सर्वांना घरी परतण्याची घाई, मीरापण ऑफिसमधून निघाली. जाताना तिला भाजी मार्केटमध्ये जायचं होतं. लवकर चालत ती भाजी मार्केटमध्ये पोहोचली. पाऊस पडायच्या पहिले तिला घर गाठायचं होतं.


भाजी घेत असताना तिला ती भाजीवाली ओळखीची वाटली. पण ती भाजीवाली मीराची नजर चुकवत होती. 


"मी तुला आजच पाहिले इथे, पण न जाणो असं वाटतंय तुला पूर्वी कुठेतरी पाहिलंय..."


"नाही मला तुम्ही पहिले पाहू शकत नाही. आज माझा नवरा गावाकडे गेला म्हूणन मी आज इथे आहे..."


मीरा पण गडबडीत असल्याने पैसे देऊन भाजी घेतली व निघाली. बसमध्ये बसली. बस सुरू झाली. 


आणि तिनी पाहिले की समोरच्या सीटवर त्या  भाजीवालीबाईसारखी कोणतरी बसलेली. रूपाने तिच्यासारखी दिसणारी, पण पेहराव मात्र होता तिचा भारी. 

ही इथे कशी आणि एवढी महागडी साडी नेसून?


तिच्या लक्षात येते की मघाशी ऑफिसमधून खाली उतरताना गार्डनमध्ये पाणी घालणारी बाई हिच्यासारखी दिसायची. एकसारखी दिसणारी तीन माणसे...

 

एवढ्यात तिकीट तिकीट, कंडक्टरचा आवाज आला मीराने पैसे देण्यासाठी वर पाहिले तर आश्चर्य कंडक्टरचा चेहरा तिच्यासारखा. तिने सभोवती बसमध्ये नजर फिरकवली. प्रत्येकाचा चेहरा एकसारखा... हे काय चाललंय तिला कळेना.


तिने घड्याळात पाहिले तर अर्धा तास होऊंन गेलेला. 

"अरे नेहमी २० मिनिटामध्ये बस पोहोचते आणि आज एवढाडा वेळ..."


तिने बाहेर नजर फिरकवली. गडद काळोख पसरलेला. फक्त बसमधील लाईट चालू होती. 


नेहमीची दुकानाची गजबज, रहदारी आज नव्हती. 


"मी तर नेहमीच्या बसमध्ये बसली आहे, पण ही वाट का अनोळखी वाटते..."


एवढ्यात बसमध्ये काळोख पसरतो. मीरा भयभीत होऊन जोराने किंचाळते. 

अचानक तिच्या डोळ्यांवर प्रकाश पडतो. ती हळूच डोळे उघडते. आजूबाजूला पाहते तर नाही तो काळोख ना ती बस... ती तर घरात होती आणि गडद स्वप्नाच्या जगात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror