akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

4.5  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

गब्बर घाबरला कोरोनाला

गब्बर घाबरला कोरोनाला

2 mins
328


कोरोना चा काळ चालू होता सगळयांनी घरीच रहाणे पसंद केले त्यात प्रख्यात गुंड गब्बर सिंग हि घरात लोकडाऊन झाला वय वाढलेलं ६० वर्षा च्या माणसांनी बाहेर फिरण्यास मनाई होती म्हूणन त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतले तुरुंगवास भोकुन आलेला गब्बर तरी आपल्याला ताकदवर समजत होता पण जशी कोरोनाची लाट आली ह्यांनी आपली खोली आणि आपण बरे कोरोनाचा काळ चालू होता घरातल किराणा घ्याला त्याने सांबाला पाठवलं 

"काय हि गर्मी त्यात हा मास्क "

"सांबा" 

"जी सरदार "

"कितने आदमी थे "?

'हयाच नेहमी हाच प्रश्न असतो "

"सरदार कोणीच नाही रस्त्यावर "

"काय" ?

"कोणीच नाही "

"सरदार कोरोना मुळे कोणचं बाहेर निघत नाहीत "

" तू किराणा आणलास ?"

"हो सरदार पाया पडलो त्या दुकान वालाच्या तो दुकान बंद करत होता "

"बडी ना इंसाफी हे रे गब्बर सिंग चा माणूस साध्या दुकान दाराच्या पाया पडला "

"कसली ना इंसाफी सरदार त्याने दुकान बंद केले असते आणि ह्या लोकडाऊन च्या काळात काय उपाशी मरायचं आहे" 

"बरं सानिटीझर लावलास ना हाताला "

"हो सरदा"र 

"सरदार एक काळ असा होता कि तुमची दहशत असायची तुम्हला पहिले कि लोक कापायची पण आता बघा ना फक्त कोरोनाच्या नावाने सारं जग भयभीत आहे ज्याला पहिले सुद्धा नाही कोणी आणि तुम्ही सुद्धा घाबरलात ना" 

"कोण मी"? 

"काय बोलतोस तू मी गब्बर सिंग आहे कोणाला घाबरत नाही ते सांगितलं ना वय असणाऱ्यानी बाहेर पडायचं नाही म्हूणन बाहेर पडत नाही"

'खरं सरदार तुम्ही कधी पासून नियम पाळायला लागलात नियम मोडण्यात तर तुम्ही माहीर "

"सांबा तू मला भित्रा म्हणतोस काय" 

नाही सरदार तुम्हाला भित्रा कसा म्हणेन तुमचे पराक्रम मला माहित आहे पण काही दिवसा पासून पाहतो खोलीत च असतात मास्क लावूनच बोलतात सानिटीझर घेऊन घरात फिरतात बाहेर च्या मंडळींना नको येऊ सांगितलं "

"हा ते काय आहे सांबा आपण आपली काळजी घ्याला हवी. हा कोरोना आपला कधी घात करेल कळायचं नाही आपली बंदूक त्याचवर बसणार हि नाही आणि जान तो सबको प्यारी हें ना 

"बरोबर सरदार "

"चल मला काढा करण्यात मदत कर "


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy