Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Neelima Deshpande

Romance Inspirational


3  

Neelima Deshpande

Romance Inspirational


एक दुजे के लिए!

एक दुजे के लिए!

2 mins 202 2 mins 202


"मेघना,अगं तू नीट झोपली नाहीस का काल रात्री? तुझे डोळे खुप सूजलेले वाटताहेत बघ! तुझा आराम झालेला नाही हे कळत असुनही मी तुला आज फारशी मदत करू शकत नाही याचे वाईट वाटते आहे मला. या ऑफिसच्या कामात आणि प्रेझेंटेशन अजून बनवलेले नसल्याने त्याचे काय करावे हे कळत नाहीये. माझा जीव तुझी काळजी आणि यात अडकला आहे. मी आपल्यासाठी सगळ्या डाळी घालून तांदळाची खिचडी बनवतो. तेवढीच तुला मदत होईल ! तू काही आता स्वयंपाक करत बसू नको.मी सुद्धा खिचडीचा डबा भरून घेतो आणि लवकर निघतो. तू बाळ उठेपर्यंत आधी खाऊन घे तोपर्यंत मी चहा आणतो.मी गेलो की आज दिवसा जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तू आराम कर. निवांत झोप....एक विचारु का? बाळाने जागवले का रात्रभर? मला आवाज द्यायचा ना! काय करत होतीस तू एकटीच रात्रभर?"


एका पाठोपाठ अनेक गोष्टी बोलून काळजी करत असलेल्या अजयला निदान एका गोष्टीचे समाधान मिळावे म्हणून जी धडपड आपण रात्री जागून केली ती सांगायला मितालीने त्याला काळजी सोडून निवांत बसायला लावले....


"रात्री काही विशेष नाही केले मी. हे तुझं आज देण्याचं प्रेझेंटेशन बनवण्यासाठी तू रात्री बराच वेळ जागा होतास. तुझं तुझ्या सरांशी झालेलं बोलणं मी ऐकलेलं होतंच. रात्री बाळासाठी जेव्हा उठले त्यावेळी तुला मदत करावी म्हणून बाळाशी गप्पा मारताना तुझ्या प्रेझेंटेशनची कॉपी सेव करुन मी त्यावर काम केलं.इफेक्ट देऊन,इमेजेस टाकून ते मी तयार ठेवले आहे.तू एकदा पाहून घे आणि आवडले तर तेच सादर कर.तू त्यात सगळे पॉईंटस टाकलेले असल्याने मला फक्त ते नीट करायचे होते. सगळ्या स्लाईडस डेकोरेट करायला अवघड गेले नाही. तुझा थकवाही कळतोय मला! नाही म्हटले तरी तुझी बरीच दमछाक होते आम्हाला मदत करण्यात..."


आपण एकमेकात किती गुंतलोय याची जाणीव दोघांनाही सुखावून जात होती. तिच्या हातात चहाचा कप देत तो म्हणाला,


"मानलं बुवा तुला ! उगाचच नाही सगळे आपल्याला 'जोडी एक दुजे के लिए! म्हणत...."


अजयच्या यशाचं रहस्य त्या दोघांच्या एकमेकांवर असलेल्या प्रेमात व समजूतदारपणात होते.


Rate this content
Log in

More marathi story from Neelima Deshpande

Similar marathi story from Romance