vaishali kadam 😘

Action Children

3.5  

vaishali kadam 😘

Action Children

दिवाळी

दिवाळी

1 min
286


एक दिवा जळत होता. आपल्याचं रंगात रंगत होता. भान हरपलं होतं त्याचं. सभोवतालचं सारं विश्व विसरला होता तो. वाऱ्याची एक झुळूक अलगद स्पर्शून जात होती. तो विझतो की काय अशी पुसटशी शंकाही मनाला चाटून जात होती. पण तोच श्वास रोखून नवा दम भरत पुन्हां पेटता होत होता जणू डॉल्फिन माशाने पाण्यातून वर उसळी घ्यावी तशी. त्याचं ते पूर्ववत पेटतपण त्या अंंधाराला छेद देत होतं. कुठेतरी आशा आकांक्षा फुलवत होतं. दिव्याला कळत नव्हतं त्याचं थोरपण. तो या भूतलावरचा एक अनामिक असा प्रकाश पाडणारा निरागस निराकार दिव्य तेज होता. आहे गरज तेवढी त्या हवेच्या लाटेपासून त्याला वाचवण्याची.... तो प्रकाश देईल. युगांयुगांचा अंधकार दुर करेन. त्या दिव्याला भान हरपून पेटू द्या. असा दुर पाड्यावर... जंगलात... झोपडपट्टीत... गल्लोगल्ली... तो दिवा कुशीत निजलाय.... किंबहुना कित्येत दिव्यांचा तो आधारही गेलाय.... तेव्हा...... 


एका थोर अशा कविच्या -कवितेच्या ओळी आठवतात..... 


थोडा उजेड ठेवा... 

अंधार फार झाला... 

पणती जपून ठेवा... 

अंधार फार झाला..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action