Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Jyoti gosavi

Romance


4.0  

Jyoti gosavi

Romance


दिनकरची वसुंधरा

दिनकरची वसुंधरा

3 mins 212 3 mins 212

आज आमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस माझ्या मुलांनी मुलाबाळांनी नातवंडांनी मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा ठरवला खरेतर आम्ही दोघे आता पंच्याहत्तरी पर्यंत आलो होतो लग्नामध्ये मी 20 वर्षाचा होतो तर ती 16 वर्षाचे होते तेव्हा काही एवढे लग्नाच्या वयाचे बंधन नव्हते आणि कायदादेखील नव्हता माझी वसु अजूनही तितकीच सुंदर दिसते जशी मी तिला प्रथम पाहिले तुम्हाला माहित आहे का अंदाज करा बरं मी तिला प्रथम किती वर्षाची असताना पाहिले असेल आहो ती जेव्हा एक वर्षाची होती ना तेव्हा मी पाच वर्षांचा होतो आणि आई बरोबर सुट्टी मध्ये मामाचा बाळ बघण्यासाठी आम्ही आलो होतो वसु चा पहिला वाढदिवस होता तेव्हा मी तिला प्रथम पाहिले आणि बाळाला माझ्या मांडीवर दे असा हट्ट करून मी तिला मांडीवर तीदेखील घेतले होते. तेव्हा ते गोरं गोरं गुबगुबीत बाळ मला फारच आवडलं होतं. मी आईच्या मागे लागलो आई तिला आपल्या घरी घेऊन जाऊ या .मला खेळायला कोणीतरी हवे. तेव्हा आई गमतीने म्हणाली एवढ्यात नको! अजून पंधरा सोळा वर्षे थांब. मग तिला तुझ्याशी खेळायला आपण घरी आणू आणि खरोखरी असे गमतीने बोललेले शब्द पुढे खरे ठरले आणि आम्ही गेली पन्नास वर्षे झाले संसाराचा खेळ खेळत आहे. मी दर सुट्टीमध्ये मामाच्या गावी जात असे. तेव्हा वसुबरोबर खेळत असे, भांडत असे, मारामाऱ्या करत असे, तिला चांगला चोप देत असे. त्यानंतर तिची बाजू घेऊन आई मला चोप  द्यायची.


आजूबाजूची मंडळी जमा करून आम्ही भातुकली खेळायचो, त्यामध्ये अजून कितीतरी मुली असायच्या, पण मला मात्र बायको म्हणून वसुच पाहिजे असायची .असं आमचं भातुकलीच्या खेळामध्ये कित्येक वेळा लग्न लागलेलं होतं. पुढे साधारण मी दहावीच्या वर्षी सुट्टीला मामाकडे आलो नाही. कारण मला वेकेशन होतं. त्यानंतर लगेच तेव्हा 11 वी बोर्ड असायचं. त्याचा अभ्यासामुळे सलग दोन-तीन वर्ष मी मामाकडे गेलोच नव्हतो. त्यानंतर मामाच्या गावी गेलो, पण मला वसु कुठे दिसलीच नाही. मी आपला तिला हाका मारत शोधत होतो आणि मामा मामी हसत होते.


अरे काय करतोस दिनकर? 

कोणाला शोधतो आहेस? 


अरे मामा वसू कुठे आहे? 


अरे वसु! कोण वसु? 


अरे अस काय करतोस मामा?आपली वसु नाही का? 


अच्छा! अच्छा! वसुंधरा बाहेर ये बरं! 

त्याबरोबर एक मुलगी आतून लाजत लाजत बाहेर आली. मी तिला ओळखलेच नाही.


अरे बघतोस काय? हीच तुझी वसु! 


खरोखर गेल्या दोन-तीन वर्षात ती इतकी मोठी झाली होती. तिच्या शरीरावर यौवनाच्या खुणा दिसून येत होत्या आणि ती आता पहिल्यासारखी माझ्याशी बोलत नव्हती. खेळायचे तर लांबच. सुट्टी संपायची वेळ आली तरी वसू मला भेटेना. मला पण एक प्रकारची अनामिक हुरहुर लागली. सतत तिच्याकडे पहावे असे वाटू लागले. शेवटी काहीतरी कारण काढून मी एकदा माज घरात शिरलो पण वसु तिथे नव्हती. ती वर माडी वरती होती. मी माडीवर गेलो. 


तुझ्याशी गप्पा मारायला आलो आहे वसु उद्या मी जाणार आहे मी म्हणालो


ठीक आहे! ती खाली मान घालून बोलली


वसू! दरवेळी माझ्याशी दंगामस्ती करणारी तू, आज तुला काय झाले आहे? 


मला पाहताच ती तेथून लगबगीने खाली निघाली. मग मला रागच आला मी तिचा हात धरला आणि तिला जवळ खेचली, तशी ती एकदम माझ्या अंगावर धडपडली आणि माझ्या मिठीत आपोआप आली. त्यानंतर आमच्या दोघांनाही काय झाले ते समजले नाही. पण सगळ्या अंगातून झिणझिण्या गेल्या. जसा काय एखादा लाईटचा करंट मारावा. असे अनुभव शब्दाने सांगता येत नाहीत ते ज्याचे त्याला घ्यावे लागतात. तिला मुद्दामच गच्च धरून ठेवले. तिचे गाल एकदम लाल लाल झाले. सोड रे दिनू, सोड रे दिनू, असे म्हणत ती मला अधिकच बिलगली आणि माझ्या ओठावर ओठ ठेवून खाली पळाली.


त्या क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो तो आजतागायत. माझ्या लग्नाला आज पन्नास वर्षे होतील पण अजूनही मला ती सोळा वर्षांची माझ्या मिठीत लाजलेली वसुंधरा आठवते. बरोबर परमेश्वराने आमची नावेच अशी ठेवली होती. मी दिनकर म्हणजे सूर्य, आणि ती वसुंधरा म्हणजे पृथ्वी, म्हणजे आमची जोडी युगे युगेअखंड राहील.


कुसुमाग्रज यांच्या कवितेमध्ये भास्कराने पृथ्वीची वंचना केली. परंतु या दिनकराने मात्र वसुंधरेवर प्रेमच केले.


Rate this content
Log in

More marathi story from Jyoti gosavi

Similar marathi story from Romance