Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

2  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

धाडसी मुक्ता

धाडसी मुक्ता

3 mins
564


जातीय विषमतेवर प्रहार करणारी- मुक्ता साळवे


     शिक्षणरत्न महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीआई फुले यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे मातंग समाजातील लहुजी साळवे यांची नात म्हणजे मुक्ता साळवे होय. मुक्ता साळवे यांचा जन्म ५ सप्टेंबर १८४३ मध्ये झाला.गंज पेठेत वास्तव्यास असणारी अवघ्या दहा- अकरा वर्षाची मुक्ताबाई ज्योती सावित्री च्या शाळेत १८४८ मध्ये दाखल झाली. ही घटना ऐतिहासिक ठरली. कारण मुक्ताबाई चा जन्म अस्पृश्य म्हणून हिणवल्या जाणाऱ्या जातीत झाला.अस्पृश्य समाजातील एक मुलगी ज्ञान संपादनासाठी सत्यशोधकांच्या शाळेत प्रवेश करते आणि नुसती मुळाक्षरे गिरवून आकडेमोड करून न थांबता सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे पहिले सत्यशोधक निबंध लिहून उगवत्या बुद्धिजीवी वर्गाची भागीदार बनते. ही एक ऐतिहासिक व क्रांतिकारी गोष्ट आहे.


      मुक्ता साळवे यांनी लिहिलेला निबंध जातिव्यवस्थेने लादलेल्या दुःखाबद्दल, समाजव्यवस्थेने लादलेल्या स्थानाबद्दल, तर स्पृश्य-अस्पृश्यतेवर प्रहार करणारीआहे. सत्यशोधक संस्कारामुळे मुक्ताला इतिहास, धर्म,संस्कृती, याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. १८५५ मध्ये ज्ञानोदय च्या अंकात १५ फेब्रुवारी व १ मार्च च्या अंकात तिचा निबंध प्रसिद्ध झाला. या निबंधातून मुक्ताची सत्यशोधक लेखन शैली व विचारपद्धती प्रतीत होते.मुक्ताने तिच्या निबंधातून स्त्रियांचे दुःख, दलितांच्या होणाऱ्या कत्तली याबद्दलचे विवेचन मांडले. आहे मुक्ता साळवे म्हणजे विषमतेवर प्रहार करणारी धाडसी वृत्तीची स्त्री... त्या निबंधात लिहितात ब्राम्हण लोकं म्हणतात कि इतर जातीने वेद वाचू नयेत.याचा अर्थ आम्हास धर्मपुस्तक नाही मग आम्ही धर्म रहित आहोत का ? तर हे भगवान आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग?


       शिक्षणामुळे आत्मभान आलेल्या मुक्ताने आपल्या ज्ञाती बांधवांना शिक्षण घेण्याचे आव्हान या निबंधात केले होते.मुक्ता साळवे पुढे म्हणतात अहो दारिद्र्य आणि पडलेले मांग महार लोकंहो तुम्ही रोगी आहात तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल. रात्रंदिवस तुमच्या ज्या जनावरांप्रमाणे हज-या घेतात त्या बंद होतील.तर आता उठून अभ्यास करा.दलित जातीवरील गुन्हेगारीच्या शिक्षक या विषयी बोलणारी मुक्ता ही सर्वात पहिली स्त्री ठरते अवघ्या तेरा चॏदा वर्षाची मुक्ता डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निबंध लिहून विषमतेविरुद्ध प्रहार करते. अवघ्या दीड पानाच्या लेखनात तिने जाती, पुरूषसत्ताक समाजातील शोषणाचे धागेदोरे उलगडून दाखविले. सत्यशोधकी बना हे तिच्या निबंधाचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानाचे सार्वत्रीकरण झाल्याशिवाय खरेखुरे समाज परिवर्तन होऊ शकत नाही. हे मुक्ताने जाणले होते. आपल्या समाजाला आजार झाला आहे. म्हणून ज्ञानरूपी रगुट्टी दिली पाहिजे असे उपायही मुक्ताने सुचवले आहेत.


     १३,१५ वर्षे वयाच्या मातंग समाजातील या विद्यार्थिनीने निबंध लिहिला व सदर निबंध तत्कालीन वृत्तपत्रांतूनही प्रसिद्ध झाला होता. इंग्रज सरकार मधील मेजर कँडी यांनी सण १८५५ मध्ये मुक्ताचा पुण्यात सत्कार केला होता. या निबंधात मेजर कँडी यांनी महागडे चॉकलेट आणले होते. मुक्ताने नम्रपणे चॉकलेट स्वीकारण्यास नकार दिली व म्हणाली sir please " give us good books not chocolate's धर्माचा किडा वळवळ करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. धर्मचिकित्सेचे धाडस दाखवत, सामाजिक विषमता, महिलांचे शोषण, याविरुद्ध निबंधातून आवाज उठवला आहे. आज एकविसाव्या शतकातही ऑनर किलिंग, बलात्कार, जाती-धर्माच्या नावावर होणारी हिंसा अशा अनेक घटना घडत असताना मुक्ता साळवे यांची आठवण झाल्यावाचून राहत नाही.


   अशा धाडसी सत्यशोधक लिखाण करणाऱ्या व पहिली निबंधकार असणाऱ्या मुक्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....


Rate this content
Log in

More marathi story from MEENAKSHEE P NAGRALE

Similar marathi story from Inspirational