देव योध्दा कल्कि भाग २
देव योध्दा कल्कि भाग २
ओम गणेशाय नमः
"पण आचार्य कल्कि ला शस्त्रविद्या शिकविणार कोण "? विष्णूयश म्हणाले. कल्कि चा नामकरण सोहळा पार पडला गेला होता. आणि त्याच दिवशी विष्णूयश याच्यां घोड्याच्या पागेत एक शेगंरू सुद्धा जन्माला आलं होतं त्याचं नाव देवदत्त अस ठेवलं गेलं. कल्कि च्या
नामकरण सोहळया नतंर विष्णूयश आणि रूद्राचार्य कल्कि च्या भविष्याबाबत चर्चा करत होते "परशुराम" रूद्राचार्य म्हणाले "परशुराम!!"विष्णूयश चकित होत म्हणाले "पण ते तर हिमालयात आहेत, ते कल्कि ला शस्त्रविद्या कसे शिकवतील ??" "कल्कि जेव्हा अठरा वर्षाचा होइल तेव्हा तो स्वता परशुरामांकडे जाउन शिक्षण घेइल पण त्याचा आता विचार करायची गरज नाही आहे. तो अजून लहान आहे त्याला आता आपलं बालपण जगु द्या विष्णूयश" रद्राचार्य म्हणाले. सहा फुटाचे सावळ्या रगां चे रूद्राचार्य म्हणजे एक आकर्षक व्यक्तीमत्व. त्याचं वय हे सत्तरच्या पुढे होतं. त्यानीं चार वेद, अठरा पुराण, सहा शास्त्रे , इ. ग्रंथाचा अभ्यास केला होता व त्याचं असुरांपासुन रक्षण सुध्दा केलं होतं त्यांनी एक अशी औषधी बनवली होती की ज्याच्या ने घोड्याचं आयुष्य वाढतं व ती औषधी देवदत्ताला सुद्धा पाजली गेली होती कारण कल्कि जेव्हा मोठा होउन असुरांचा विनाश करेल तेव्हा देवदत्त सुद्धा कल्कि सोबत असेल. "होय चालेल"
विष्णूयश यानीं मान डोलावली .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
विषमनपुरी असुरांची राजधानी
" आणि माझ्या गदेच्या एका फटक्यात त्या माणसाच्या डोक्याचे तुकडे तुकडे झाले हा हा हा ..." असुर सेनापती नरातंक हसत हसत म्हणत होता. तेवढ्यात दरबारात असुर सम्राट कलि आला " सेनापती नरातंक दरबार ही प्रौढी मारायची जागा नाही आणि हीच घटना तुम्ही गेली 25 वर्षांपासुन मारत आहात तुम्हाला कटांळा नाही आला का? एकच गोष्ट बोलुन." कलि च्या या वाक्यावर दरबारातील सर्व असुर हसत सुटले. नरातंक खजील झाला. "गप्प बसा" कलि चा भारदस्त आवाज दरबारात घुमला सर्व असुर गप्प बसले " अजुन आपण पुर्ण युद्ध नाही जिकंलो आहोत. आताशी आपण फक्त अर्धच युद्ध जिकंलो आहोत आपण तर खरं युद्ध तेव्हा जिकुं जेव्हा आपण सपुंर्ण मानव जाति ला सपंवुन असुरांच आधिपत्य पुर्ण पृथ्वीवर लागु करू. त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत आहे . सेनापती नरातंक आज किती मदिंर तोडली गेली व किती माणसे मारली गेली ?" "आज एकुण 36 मदिंर तोडली गेली व 87 माणंसे मारली गेली सम्राट" नरातंक बोलला. " जो कोणी देवतांची पुजा करताना दिसेल त्याला अतिशय यातना देवुन मारा व जो कुणी माझी पुजा करेल फक्त त्यालाच जिवंत ठेवा ह्या देवतांनी आमच्या पुर्वजानां जेव्हा युद्धात पराभूत केल तेव्हा आम्ही पृथ्वी सोडून एका दुसऱ्या ग्रहावर रहायला गेलो तिथे आम्ही हळूहळू सेना प्रशिक्षित केली . मग ज्या मानवानां देवतांनी आमच्यापासुन वाचवलं होतं तो मानव त्या देवतांनाच विसरून गेला तो पापी झाला मग आम्ही त्याच्या वर आक्रमण केलं. जेव्हा मानव देवतांची पुजा करनं सोडून देइल तेव्हा खरं कलियुग सुरु होइल. कलियुग कलिचं युग." कलिच्या डोळ्यात एक विखार होता.
क्रमशः....
कशी वाटली ही कथा मित्रांनो आवडली असेल तर प्रतिक्रिया द्या नसेल आवडली तरी प्रतिक्रिया द्या तुमचा पठिबां असु द्या धन्यवाद
