STORYMIRROR

Vedanta gosavi

Fantasy Others

3  

Vedanta gosavi

Fantasy Others

देवयोद्धा कल्की - भाग ४

देवयोद्धा कल्की - भाग ४

2 mins
196

ओम गणेशाय नमः

कल्कीने आपल्या माता पिता चे आशिर्वाद घेतले व आपल्या मित्रासोबत म्हणजेच शुक सोबत निघाला. शुक ला तो पोपट असं चिडवायचा कारण तो खुप हुशार होता.त्याचं भुगोल तर अति उत्तम होतं म्हणून कल्कि ने त्याला आपल्या सोबत घेतले होते. तसं पण शुकचं या जगात कोणीही नव्हतं त्याला फक्त आपल्या वडिलांबद्ल येवढच माहित होतं की त्याचे वडिल खूप विद्वान होते. कल्कि व शुक असेच गप्पा मारत चालत होते. त्याच्यां पाठीवरच्या झोल्यात त्यानां लागणारं सर्व सामान होतं .दोघेही एकमेकाचीं थट्टामस्करी करत होते. पण कल्कि ला एकदा दोनदा असं वाटलं की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

झाडावर कलिने पाठविलेला मारेकरी धनुष्यबाण घेउन बसला होता. तो कधी एकदा कल्कि येतोय याची वाट पाहत होता. तेवढ्यात त्याने बघीतले की दोन अठरा वर्षाचे तरूण चालत चालत त्याच्या समोरुन जात होते . कलि ने सागिंतल्या प्रमाणे हाच तो मुलगा असावा. रगांने सावळा ,उचीं सहा फुट, पीळदार शरीरयष्टी, मुखावर एक वेगळचं तेज. काही क्षण तो कल्कि कडे पाहतंच राहिला तेवढ्यात तो भानावर आला "अरे, नाही,नाही याला पाहण्यात मी वेळ नाही घालवू शकत जर हा परत पुढे निघुन गेला तर परत याच्या पाठी पळावं लागेल" असं स्वताःशीच विचार करून त्याने कल्कि वर नेम लावला. पण याच्या पासुन पुर्णतः अनभिज्ञ कल्कि शुक बरोबर चालत होता . तेवढ्यात त्याला दिसलं की बाजूच्या झाडीतून एक आकृती झपकन तिथुन निघाली व बाजुच्या झाडात गेली .

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

मारेकरयाने पाहिले की त्या झाडीतून निघालीली मनुष्याकृती एक उडीत त्याच्याजवळ येऊन पोचली व त्या आकृतीने एका झटक्यात मारेकऱ्याचा गळा पकडला व त्याची मान खट करुण मोडून टाकली. मारेकरी जागच्याजागी ठार झाला .

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

"कोण असेल रे तो ?" शुक त्या मनुष्याकृती बद्दल कल्कि ला विचारत होता. " काय माहित कोण असेल पण त्याला एक शेपुट होती हे मात्र मी बघीतलं.!! कल्कि बोलला

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy