STORYMIRROR

Vedanta gosavi

Others

3  

Vedanta gosavi

Others

देव योध्दा कल्कि भाग ३

देव योध्दा कल्कि भाग ३

2 mins
207

ओम गणेशाय नमः  

कल्कि आता अठरा वर्षाचा झाला होता. त्याने रूद्राचार्यां कडून वेद शिकुन घेतले होते. त्याचे तीन भाऊ कवि,प्राज्ञ,व सुमन्तक याचं सुध्दा वेदाध्ययन पुर्ण झालं होतं. कल्कि विष्णू देवांचा अवतार आहे हे फक्त कल्कि चे पिता विष्णूयश ,कल्कि ची माता सुमती व गुरू रूद्राचार्य यानांच माहित होतं. कल्कि ची आता परशुरामां कडे जान्या ची वेळ आली होती एका रात्री विष्णूयश यानीं कल्कि ला आपल्याजवळ बसवून सागिंतले की " कल्कि"

" होय बोला पिताश्री"

" कल्कि तुला आता थोडे दिवस आमच्या पासुन लाबं जावं लागेल.."

"कुठे पिताश्री ? आणि का? "

"तुला शस्त्रविद्या शिकायला परशुरामांकडे जावं लागेल कारण तुला एक मोठी जबाबदारी पार पडायची आहे"

"कसली जबाबदारी पिताश्री?"

"असुरांच्या विनाशाची" रूद्राचार्य खोलीत प्रवेश करत म्हाणाले.

"प्रणाम आचार्य" कल्कि ने आचार्यांना प्रणाम केला .

"शुभम भवतुः कल्कि तुला माहितच आहे की आपल्या पृथ्वीवर असुराचं राज्य आहे ते कीती अत्याचार करतात तुला माहीतच आहे त्याच असुराचां तुला नाश करायचा आहे कल्कि. म्हणून तुला परशुरामांकडे शस्त्रविद्या शिकायला जावं लागेल."

" पण मीच का आचार्य? व माझे तीन ज्येष्ठ बधुं असताना मीच का जावे ?"

" हे बघ कल्कि छोटा व मोठा याच्याने काहिच फर्क पडत नाही व तुच का तर ते तुला परशुरामच सागुं शकतील"

" ठीक आहे आचार्य मी उद्याच निघायची तयारी करतो पण परशुराम आहेत कुठे?"

"ते हिमालयात आहेत" रूद्राचार्य म्हणाले.

"ठीक आहे आचार्य पण मी माझ्या मित्राला अर्थातच शुकाला सुध्दा बरोबर नेहील कारण तो त्या भागाचा जाणकार आहे"

"ठीक आहे कल्कि आता रात्र झाली आहे तु आता झोपून जा तुला लाबंचा पट्टा गाठायचा आहे शुभम भवतुः"  

रात्रभर कल्कि परशुरामांचाच विचार करत होता

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

विषमणपुरी असुराचीं राजधानी

कलिचा चेहरा लालबुंद झाला होता. कारण त्याला बातमी कळली होती कि कल्कि नावाचा एक मुलगा शस्त्रविद्या शिकायला परशुरामांकडे जाणार आहे. त्याला त्याच्या गुरूने हे सागिंतल होतं कि कल्कि नावाचाच एक मनुष्य त्याचा वध करणार होता जोकि विष्णू चा अवतार असनार. कलि ने ताबडतोब त्याच्या सहा अगंरक्षकानां आदेश दिला कल्कि ची हत्या करण्याचा. गुप्तचरानीं कलिला कल्कि कसा दिसतो हे सुद्धा सागिंतल होतं. तेच वर्णन कलिने त्याच्या मारेकरयांना समजवून सागिंतले ते आपल्या कामगिरी वर निघाले . तेव्हा कुठे कलि च्या जीवात जीव आला. आता कधी एकदा त्याचे लोक कल्किचं मुडंक घेउन येतायेत याची कलि आतुरतेने वाट पाहत होता.

क्रमशः...


कशी वाटली मित्रांनो ही कथा. मला नक्की प्रतिक्रिया करुन कळवा धन्यवाद


Rate this content
Log in