Mohit Kothmire

Thriller

3  

Mohit Kothmire

Thriller

डेविल बायबल इतिहास व रहस्य..

डेविल बायबल इतिहास व रहस्य..

4 mins
756


नेट ची गूढ गोष्ट लिहित असताना त्यातील एका भागात illuminati चा एक विषय होता त्यात डेवील बायबल चा पण एक उल्लेख आला तेव्हा पासून अनेक वाचकांनी मला सांगितले की ह्या बद्दल अजून माहिती द्या नेमके काय आहे कसे आहे..

ह्या लेखातील सर्व गोष्टी ह्या त्या विषयावर झालेले जगातील संशोधन लिहिले गेलेले लेख ह्या गोष्टीतून संदर्भ घेण्यात आला आहे..

बायबल सर्वांना परिचित आहेच..

ख्रिस्ती धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणजेच बायबल होय.. 

मानवाच्या जीवनाला एक सकारात्मक दिशा देणारा ग्रंथ..

पण तसाच अजून एक ग्रंथ आहे ज्याचा उल्लेख जास्त होत नाही किंवा अनेक लोकांना तो माहित ही नाही..

कोडेक्स गिगाज (codex gigas) अर्थात डेविल बायबल..

आता ह्या ग्रंथाचे दोन कथा सांगितल्या जातात कोणती त्या पैकी खरी कोणती हे थोड कठीण आहे पण आपण २ कथा जाणून घेऊ..

एका अज्ञात माँक ला एका राजाने मृत्यूची शिक्षा सुनावली,आणि दुसऱ्या दिवशी त्याला मृत्यू होईल असा आदेश काढला तेव्हा त्या व्यक्तीने राजाला असे सांगितले की,"जीवनाचे सर्व सार आणि माझ्याजवळ असलेले सर्व ज्ञान मी एका रात्रीमध्ये लिहून देईल"राजाने ही गोष्ट मान्य केली व रात्री त्या व्यक्ती ला एक खोलीत ठेवले पण जेव्हा त्या व्यक्तिला हे लक्षात आले की,"अस काही होणे आपल्याकडून शक्य नाही तेव्हा त्याने lucifer ला आव्हान केले आणि असे बोलला की,"हे पुस्तक जर एका रात्रीत पूर्ण केले तर मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करेल" आणि lucifer ने त्याची मदत केली आणि ते पुस्तक लिहायला मदत केली तेव्हा lucifer ने त्याला स्वतःचे चित्र काढायला लावले आणि अस हे पुस्तक पूर्ण केले,

पण ते पुस्तक ज्याच्या हातात पडले त्या सोबत काही विचित्र घडले..

दुसरी कथा ही अशीच आहे एक माँक ने आपली शपथ मोडली होती म्हणून त्याला शिक्षा झाली होती एका भिंतीमध्ये जिवंत पुरायची आणि त्याने अस ठरवलं की आदल्या रात्री एक अस पुस्तक लिहायचं ज्याचा उपयोग सर्वांना होईल पण हे एका रात्रीस शक्य नव्हते तर त्याने सुद्धा असच lucifer ला आव्हान केले आणि पुस्तक पूर्ण केलं पण ते जे लिहायचं होत ते न लिहिता वेगळाच काही लिहिलं गेलं त्याने ते पुस्तक फेकून दिले एका खिडकीतून खाली...

जुलै १६४८ ला स्वीडश ने पराग वर आक्रमण केले आणि लूट केली त्या लुटी मध्ये काही मौल्यवान वस्तू वैगरे लुटल्या त्यात त्यांना हे पुस्तक भेटले..

त्या पुस्तकामध्ये बायबल च लिहिलेले आहे पण त्याचा अर्थ वेगळा आहे..

ज्याने कोणी ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला एक तर त्या व्यक्ती ने जीव दिला किंवा काही वाईट घडल वेडा झाला किंवा तो व्यक्तीचं एक खलनायक झाला अस घडल..

नंतर काही संशोधकांनी त्याच्यावर संशोधन केले, तर काही आश्चर्य करणाऱ्या गोष्टी समोर आल्या ह्या पुस्तकाचे वजन हे जवळ जवळ ८० किलो आहे ते पुस्तक ३ फुटाचे आहे आणि ह्याचे पाने म्हणून गाढवाचे चामडे वापरण्यात आली आहेत..

१६० गाढवाचे चामडे वापरण्यात आले आहे..

आणि ह्या पुस्तकातील सुरवातीचा शब्द तर शेवटचा शब्द ह्याचे हस्ताक्षर हे अगदी same आहे म्हणजे हस्ताक्षर मध्ये काहीच बदल नाही अर्थात तो ग्रंथ सलग लिहिलं गेला आहे..

ह्या ग्रंथामध्ये ३२० पाने होती पण त्यातील १० पाने गहाळ आहेत ती कुठे आहे कोणी नेली माहित नाही पण त्यावर काही महत्त्वाची माहिती होती..

प्रश्न निर्माण होतो कस? एका रात्रीत १६० पानाचा ग्रंथ १६० चामडे ३ फूट ८० किलो कस लिहू शकतो कोणी हे केवळ अशक्य आहे? 

national geography च्या संशोधना नुसार सलग दिवस रात्र जर कोणी लिहायला बसल तर त्याला साधारण २५ ते ३० वर्ष लागेल पूर्ण करायला..

सिद्ध व्हायचं कारण, एक सारखे अक्षर, वापरण्यात आलेली शाई ही पण सारखीच..

हा ग्रंथ अजून आहे स्वीडिश च्या एका ग्रंथालय मध्ये..

पण ह्याचा सांगण्यात आलेल्या कथा मध्ये काही गोष्टी ह्या साम्य आहे जस की माँक दोन्ही व्यक्ती ना शिक्षाच होते शिवाय lucifer ला आवाहन ह्या गोष्टी सारख्या आहेत..

lucifer अर्थात ख्रिस्ती धर्मानुसार राक्षसांचा देव राजा..

आता त्या ग्रंथामध्ये एक चित्र आहे आणि त्या चित्राचे काम खूप बारीक आहे खूप एकाग्र होऊन काढावे लागेल असेल ते चित्रच काढायला साधारण १२-१३ तास लागतील 


हे त्यातील खरे चित्र आहे ह्याची उंची १९ इंच आहे ह्या मध्ये शरीर माणसांचे आहे शिवाय त्याच्या पायाला आणि हाताला फक्त ४ बोटे आहेत आणि तीक्ष्ण नखे आहेत रक्ताने माखलेले.

डोक्यावर शिंगे आहेत आणि त्याला दोन जीभ आहेत आहे त्याने जे वस्त्र घातले आहे ते शाही वस्त्र मानतात..

अस बोलतात हे चित्र lucifer चे आहे जेव्हा माँक समोर आला होता तो तेव्हा त्याने हे चित्र काढायला लावले होते..

त्यातील जी पाने गहाळ आहेत त्या पानांच्या बाजूला आता एक हे चित्र दिसते आणि एक बाजूला जेरुसलम मधील एका महालाचे चित्र समोर आहेत..

आणि ते चित्र एका पवित्र महालाचे आहेत..

काही असा अर्थ लावतात की त्या मार्फत असे सांगायचे आहे,"तुम्हाला कुठे जायचे सकारात्मक की नकारात्मक असा अर्थ मानतात..."

आणि जे माँक होते ते बोहेमिया चे होते आता त्याच काय संबंध आहे माहित नाही..

तो ग्रंथ अजूनही आहे स्वीडिश मध्ये सुरक्षित शिवाय त्या ग्रंथाला हात लावायची कोणाला परवानगी नाही...

तुम्हाला काय वाटतं ह्या बाबत हे कमेंट मध्ये नक्की सांगा..

असे अनेक ग्रंथ आहेत ज्यांना शापित बोलतात त्यांच्या पण कथा अश्याच आहेत...

तर एक थोडीशी माहिती मी देण्याचा प्रयत्न मी केला कमेंट करून नक्की कळवा ...



Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller