Deepali Aradhye

Inspirational

3  

Deepali Aradhye

Inspirational

दाद - लेख

दाद - लेख

1 min
175


६४ कलांचा स्वामी - गजानन! असा उल्लेख आढळतो आपल्या धार्मिक-पौराणिक ग्रंथांमध्ये!


आजच्या घडीला, यातील किती कलांचं अस्तित्व शिल्लक आहे? यातील किती कला, कालाच्या ओघात, लोप पावल्या आहेत? किंवा ६४मध्ये अजून इतर कलांची भर पडली आहे? किंवा अस्तित्वात असलेल्या कलांमध्ये कालौघात काही बदल झालेले संभवतात?

एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची म्हणजे अर्थातच संशोधन करायला हवे. मात्र, सोबतच आणखीही मुद्दे लक्षात घ्यायला हवेत- ते म्हणजे, कोणत्याही प्रकारच्या कलेला राजाश्रय, लोकाश्रय आहे का? सरकार दरबारी त्याकरिता वजन आहे का?


यातील एक मुद्दा - लोकाश्रय - हा थेट सर्वसामान्य माणसाला लागू पडतो.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, या म्हणीनुसार जरी बघितलं तरी, ६४ च्या ६४ कलांना लोकाश्रय मिळायला हरकत नसावी, आपापल्या आवडीनुसार-निवडीनुसार!


आणि लोकाश्रय म्हणजे तरी सुरुवात कुठून होणार, तर ती 'दाद देण्यापासून!'. 

पुनःश्च एकदा प्रवृत्तीनुसार ही 'दाद'ही असणार. मनापासून, मनाविरुद्ध, लाजेखातर, कला सादर करणारी व्यक्ती आवडती आहे म्हणून - अशा पठडीतल्या सकारात्मक. तर अगदी शिव्यांची लाखोली वाहिलेल्या, अगदीच हलक्या-नीच दर्जाच्या नकारात्मक!


काही 'दाद' स्वीकारण्याजोग्या असतात तर काही अपरिहार्य नाकारण्याच्या. पण दाद असावी, सादर होणाऱ्या प्रत्येक कलाकृतीला.


कारण, ती सादर करणाऱ्या व्यक्तीची त्यामागे मेहनत असते, कष्ट-परिश्रम असतात, काही विचार असतो, भावना म्हणा - मन:स्थिती म्हणा, गुंतलेल्या-गुंफलेल्या असतात. काही स्वप्न असतात, मग भलेही सादरीकरणानंतर भंग पावोत ती स्वप्न, ती मेहनत.


पण लोकाश्रयाकडून 'दाद' नक्की हवी असते. आणि म्हणून शिस्तीत सादर झालेली कला, लोकांवरही अन्याय न होता मनमुराद आनंद लुटत अथवा त्यातील चुका शोधत त्यांना बघता यावी, 'दाद' देण्यासाठी!


म्हणूनच, शिस्तीत दिलेली दाद महत्वाची, घटना-लेख-लेखन कोणतेही असू देत


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational