चिंटी बनला नेता
चिंटी बनला नेता
"चिंटी चिंटी चिंटी याचा विजय असो "
चिंटी पुढे चालत होता लोक मागून चालत होते घरा घरात जाऊन प्रचार चालू होता चिंटी निवडणुकीत बदल घडवण्यासाठी उभा राहिलेला.
रोबोट ह्या निशाणीवर शिक्का मारा अशी आरोळी ऐकू येत होती.
"येऊन येऊन येणार कोण चिंटी भाऊ आणि कोण "
प्रचार जोरात चालला होता.
नवीन काहीतरी बदल घडेल ह्या आशेने लोक चिंटी कडे पाहत होते सगळीकडे चिंटी बदल चर्चा चालू होती..
निवडणुकीचा दिवस उजडला सगळीकडे मत घालण्यासाठी रांगा लागल्या होत्या. चिंटी आपल्या समर्थकांसह मतदान केंद्रावर उपस्तिथ होता संध्यकाळ होत आली आणि मत बंदिस्थ पेट्यात बंद झाली.
असेच दिवस गेले निवडणुकीचा निकाल लागला चिंटी अधिक मताने निवडून आला समर्थकांनी एकच गल्ला केला. हार तुरे घालून मिरवणूक निघाली सगळीकडे फक्त चिंटी याचा विजय असो हाच नारा घुमत होता. आमदारकीची माळ चिंटी च्या गळ्यात पडली लोकांना त्याच्याकडुन खूप साऱ्या अपेक्षा होत्या.
मुलाखत गाठी भेटी त राजकीय पक्षच्या मुलखाती चालू होत्या. अनेक पक्षांनी चिंटी समोर आपल्या पक्षात येण्याची गळ घातली पण चिंटी ने आपल्या सगळ्या मागण्या ज्या लोकांच्या हिता साठी असेल त्या जर मान्य असतील तरच आपली तयारी दर्शवली. असेच एका पक्षांनी चिंटी ची मागणी मान्य केली
शप्प्थविधी चा दिवस उजाडला चिंटी आपल्या समर्थक सह उपस्तिथ होता कार्यक्रम चालू झाला एक एक करून मंत्री नि शप्पथ घेतली टाळयांचा गडगडाट झाला चिंटी चे नाव पुकारण्यात आले चिंटी उभा राहिला, माइक जवळ आला आणि त्याने शप्पथ घेतली सगळीकडे जलोष केला गेला टाळायच्या कडकडानी सगळ्यांनी त्याला प्रोसाहित केले.
चिंटी चे सर्वे सर्वा सायंटिस्ट मिस्टर वेगारण हि सोहळ्याला उपस्तिथ होते त्यांनी हि आपली मान उंचावत जोरात टाळ्या वाजवल्या.
'प्राऊड ऑफ यु चिंटी "
आणि त्यांनी डोळे उघडले समोर तो जगमगता रंगमंच नव्हता ते आपल्या लॅब मध्ये होते आणि चिंटी बॅटरी डाउन बॅटरी डाउन असे ओरडत होता.
