kanchan chabukswar

Drama

4.0  

kanchan chabukswar

Drama

" चेक अँड मेट"........ सौ कांचन चाबुकस्वार

" चेक अँड मेट"........ सौ कांचन चाबुकस्वार

9 mins
352


टेनिस खेळून झाल्यावर घाम पुसत असताना रेखाने गौरवला विचारले," काय रे तुझ्या बिझनेससाठी दिले की नाही तुझ्या खडूस बापाने पैसे"?

" रक्कम जास्त आहे त्यामुळे तो विचार करतो आहे." गौरव म्हणाला. " मी आता पंचवीस वर्षाचा आहे, आतापासून हळूहळू बिझनेसमध्ये जम बसवायचा मी प्रयत्न करत आहे, आसिफ बरोबर पार्टनरशिप करण्यासाठी असे तयार आहे पण तो पन्नास टक्के रक्कम मागत आहे. पण मी जर त्याच्याबरोबर घुसलो तर माझं पण कल्याण होण्यासारखा आहे असं मला अगदी वाटतं." गौरव म्हणाला.

" अरे पण आधीच आसिफने तुला म्युझिक स्टुडिओ मध्ये बरेच नुकसान पोहोचलेला आहे. तुला काय आसिफ पेक्षा दुसरा कोणी पार्टनर मिळत नाही का?" रेखा वैतागून म्हणाली.

" आसिफ ना माझ्या बाबांच्या जुन्या मित्राचा मुलगा आहे, अर्थात आईला तो अजिबात आवडत नव्हता पण आता आई पण नाही म्हणून मी ठरवलं आहे जो पैसे देईल त्याच्या बरोबर जायचं." गौरव म्हणाला.

" अरे तुझ्या आईला आवडत नव्हता म्हणजे काही तरी कारण असले पाहिजे ना, हा आता आयुष्य तुझं आहे, तुझ्या म्हाताऱ्या डॅडी ला पटव, नाहीतरी तुझ्याशिवाय त्यांना कोण आहे?" रेखा म्हणाली.

बोलत बोलत दोघेजण जिम कडे रवाना झाले. टेनिस जिम् याच्यामुळे रेखा आणि गौरव ची चांगलीच मैत्री झालेली होती.

गौरवचा म्युझिक स्टुडिओ आहे, त्याची आई ॲक्ट्रेस होती हे सगळे रेखाला माहीत होत. पण मुळांमध्ये गौरव चा नवीन डॅडी रेखा ला अजिबातच माहीत नव्हता.


15 वर्षाच्या गौरवला आणि त्याची आई मधूला रवी देसाई कडे येऊन आता सहा महिने झाले होते.

झालं असं की गौरव चे बाबा आणि मधू चा नवरा त्याच्या दुर्वर्तन आणि दूरव्यसनामुळे अकाली मृत्यू पावला. तसे गौरवच्या बाबाचा म्युझिक स्टुडिओ होता, पण तो यथातथाच चालत होता, काही मेंटेनन्स नाही, नवीन उपकरणे नाहीत, गौरव चा बाबा टीव्हीवरच्या कुठल्यातरी नटीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडून रोज संध्याकाळी दारू पीत बसायचा. त्यामुळे मधु पण त्रासली होती. मधु एक टीव्ही ॲक्ट्रेस होती, स्क्रीनवर काम करायचं म्हणजे तिला तिचं दिसणं वागणं राहणं हे कायम एका उंचीवर ती व्यवस्थितपणे सांभाळावे लागत होतं. गौरव च्या बाबाच्या अशा विचित्र वागण्यामुळे ती खूपच त्रासली होती. मधु पण आता पस्तिशी ओलांडून चाळीशी कडे झुकलेली होती, प्रमुख नटीच काम तिला मिळतच नव्हतं, कुठेतरी आईचा रोल किंवा मोठ्या बहिणीचा रोल, वहिनी चा रोल असले फडतूस रोल तिला मिळत होते, त्यातून तिच्या नवऱ्याची दुश कीर्ती सगळीकडे पसरलेली असल्यामुळे जास्त कोणी तिच्या नादाला लागत नव्हता. कारण काही झालं की गौरवचा बाबा सेटवर येऊन तमाशा करायचा.


 शेवटी एक दिवस किडनी आणि लिव्हर दोन्ही फेल झाल्यामुळे गौरवचा बाबा या जगाला सोडून गेला, तेव्हापासून मधु आणि गौरव जरा शांत जीवन जगत होते. रवी देसाई मधु आणि गौरव , बाबाला चांगलाच ओळखत होता त्यांचं येणं जाणं पण होतं त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी मधूला लग्नाबद्दल विचारले तेव्हा मधुनी तात्काळ होकार भरला. कारण आता मधु ला जास्त काम मिळत नव्हते, गौरव चे शिक्षण ,राहणीमान सगळे खर्च आता तिला परवडेनासे झाले होते.

आश्चर्य म्हणजे रवी देसाई तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होता, तरीपण त्याच्या प्रेमामुळे मधूने होकार भरला.


  आई चे दुसरे लग्न, दुसरे बाबा त्याच्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये गौरव ला भरपुर चिडवण्यात येत असे. त्याच्या मनामध्ये रवी बद्दल काही फारसा आदर नव्हता. त्याला बाबाच आवडत. पण करणार काय?

एक दिवशी काहीतरी झालं आणि गौरव च्या तोंडून नको त्या शिव्या [जसा त्याचा बाबा देत ना तसा] बाहेर पडल्या. ते ऐकल्यावर ती रवीने एक त्याच्या कानफटात लगाऊन दिली, झालं अजूनच आगीत तेल पडलं. आता गौरव रवीशी बोलेनासा झाला.

मधुनी त्यांच्यामध्ये समेट घडवण्याचा भरपूर प्रयत्न केला. बारावीच्या परीक्षेच्या वेळेला रवीच गौरवला एक्झाम सेंटर वरती सोडायला आणि घ्यायला जात असे, गौरव मुलगा असल्याचे भरपूर फायदे रवी कडून लाटले पण तो त्याला बाप मानायला तयार नव्हता.

मधू समोर असली की तो रवीला डॅडी डॅडी अशी हाक मारे, पण मधूच्या मागे त्याचा तिरस्कार उफाळून येई.


कर्वे रोड वरील शांत वस्तीमध्ये रवी देसाईचा टुमदार बंगला होता, त्यांनी त्याच्या कामाच्या वेळा देखील सोयीस्कर ठेवल्या होत्या, शक्यतोवर गौरव घरी असल्यावर रवी देखील घरीच राहत असे, त्यांची दोघांची फक्त एकच सवय सारखे होती मधु, गौरव आणि रवी वेळ मिळेल तेव्हा बुद्धीबळ खेळत . बुद्धिबळाचा पट घराच्या प्रचंड गॅलरीमध्ये मांडून ठेवलेला असे, पांढरी सोंगटी रवीची तर काळी मधु नी गौरव चे, रवी डावाला सुरुवात करे, दुसऱ्यांनी जमेल तेव्हा खेळी खेळावी, दोन-तीन दिवसात खेळ संपे.

मधूच्या अपघाती मृत्यू नंतर तिने सोडलेला डाव तसाच अर्धवट राहिला होता.

मधुच्या तेराव्या दिवशी तिला वचन दिल्याप्रमाणे रवीने गौरवचा हात आपल्या हातात घेतला आणि सांभाळून त्याला घरी आणले.

अचानक त्या दिवशी काळी सोंगटी हललेली दिसली आणि खेळाला परत सुरुवात झाली.


   ज्या दिवशी रेखाच्या आग्रहाखातर डॅडींना भेटायला म्हणून रेखा गौरव च्या घरी आली.

डॅडी ला म्हणजे रवी देसाई ला बघून ती आश्चर्यचकित झाली. रवी नुकताच चाळीशीत आला होता. अजूनही तो अतिशय रुबाबदार स्मार्ट आणि देखणा दिसत होता. उंचापुरा व्यायामाने कमावलेल्या शरीराचा गोरापान रवी पाहून रेखाच्या मनामध्ये असलेल्या म्हाताऱ्या डॅडी चे चित्र पुसले गेले.

खरं म्हणजे गौरव पेक्षा देखील रवी जास्त आकर्षक दिसत होता. त्याचं वागणं, मार्दव शील बोलणं, त्याच्याकडे असलेला पैसा, सगळं भुरळ घालणार होतं. बोलता-बोलता रेखाने त्याला ती मॉडेल असल्याचं सांगितलं. रवीला अतिशय आनंद झाला,, त्यांनी मॉडेलिंगच्या बऱ्याचशा टिप्स रेखाला आपण होऊनच दिल्या. बोलता बोलता त्याने तो टीव्हीवरील मालिकांचा स्क्रिप्त राईटर असल्याचे सांगितले.

 पिनाकिन नावाने तो मालिका लिहित असे." पिनाकिन" शंकराचे नाव, त्याच्या मालिका अतिशय गाजत होत्या त्यामुळे त्याच्याकडे पैसाही भरपूर येत होता. मधू शी लग्न झाल्यावर त्याने तिच्या दृष्टीने तिचा मुख्य रोल असेल अशा मालिका लिहायला सुरुवात केली होती. ताकद वर महिला दाखवण्या मध्ये तो अतिशय वाकबगार होता. ऐतिहासिक मालिका, सामाजिक मालिका, ह्याच्या मध्ये त्याने मधूला भरपूर रोल दिले होते. त्या दोघांचे लग्न झाल्यावर त्या दोघांच्या जोडीने अतिशय यश कमावले पण गौरव मात्र याच समजुती खाली होता की पैसे फक्त त्याची आई कमावते.


रेखा पण थोडं फार लिहित असे, मॉडेलिंगचा आयुष्य हे फार थोडं असतं म्हणून तिचा पण प्रयत्न मालिकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये काम करण्याचा होता. किंवा मॉडेल झाल्यावर ती कुठल्या तरी चांगलं ब्रांड मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता म्हणूनच ती जिम टेनिस असे उपद्याप करून स्वतःची कमनीय फिगर मेंटेन करून होती. कुठेतरी चांगली संधी मिळावी म्हणून ती जीवापाड प्रयत्न करत होती.

 पण गौरव असं काही तसं लक्ष नव्हतं, तो नक्की काय करायचं प्रयत्न करत होता हेच कळत नव्हतं. आई-वडिलांचे पैशावर फक्त वेळकाढूपणा करत होता.


 आता गौरव आणि रवी चा संवाद बुद्धिबळाच्या सोंगट्या करत होत्या.

गौरवने रेखा ला हाताशी धरले, तीला सांगितले कि रवीला भुलवून तिने गौरव साठी त्याच्याकडून 25 लाख रुपये काढावे. तसेच कर्वेनगर चा राहता बंगला पण गौरव च्या नावाने करून द्यावा. म्हणजे काय होईल ती गौरव आरामात राहील, त्याला पार्टनरशिप मध्ये कुठलातरी बिजनेस करता येईल आणि सुखाचा आयुष्य जगता येईल.

रेखा आता बरेच वेळेला रवी देसाई ला भेटायला म्हणून त्याच्या बंगल्यावर येत राहिली. रवी चे विचार त्याच्या कथांचे विषय तिच्या मनाला भुरळ पIडू लागले. रवीच्या ओळखीने ,एका मोठ्या ब्रँड कंपनीने रेखाला मॉडेलिंग ची संधी दिली.

तिला संधी मिळाली हे रवीला माहीत होतं पण रेखाला ही आनंदाची गोष्ट आधी गौरवला सांगायची होती. रेखा ला वाटले गौरव ला पण फार आनंद होईल पण झाले उलटेच.

" मॉडेलिंग म्हणजे शुद्ध नागडे पणा, तुला हेच करायचं असेल तर माझ्याशी लग्न करता येणार नाही. मॉडेल्स आयुष्य काय असतं हे मला चांगलं माहीत आहे" गौरव तिला वाटेल तसं बोलला.

त्यादिवशी रेखा अतिशय दुःखी मनाने रडत रडत घरी गेली.

 काही दिवसानंतर गौरव शांत झाला आणि रेखाला परत डॅडी वर मायाजाल पसरवण्याच्या कामगिरीवर पाठवले.

रेखाने आपल्याला मॉडेलिंग ची संधी कशी मिळाली हे रवी ला सांगितले. " तुझा आयुष्य तू ठरव, मॉडेलिंग मधले वाईट अनुभव बाजूला ठेवून चांगले अनुभव घे आणि पुढे जा. तुझ्या कॅरेक्टर वरती तुला काम मिळतील. तुझं जर मॉडेलिंगचा काम यशस्वी ठरलं तर कोणीही तुला वेडेवाकडे काही करायला सांगणार नाही. उलट तू वेगवेगळ्या मॉडेलिंगच्या स्पर्धांमध्ये भाग घे." रवी ने तिला एक जबाबदार सल्ला दिला.

“पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही पण पाण्यात राहून कमळ देखील होता येतं “ही नवीन कल्पना रवीने रेखा ला सांगितले. रेखाच्या मनात आता रवि विषयी अतिशय आदर वाढू लागला. रेखा आणि रवी ची आता फार छान मैत्री झाली.

" वर्षांपूर्वी तुम्ही कुठे होतात? आणि गौरव च्या भेटायच्या आधी जर मला तुम्ही भेटले असतात तर!" रेखा हसत हसत रवीला म्हणाली.

" गौरव पण एक चांगला मुलगा आहे, पण त्याला कोणी वळणच लावलं नाही, त्याचा बाप दारुड्या होता, आई सतत कामात बिझी तो काय करतो कुठे जातो कोण मित्र आहेत हे बघायला कोणाकडे वेळच नव्हता. पण तो एक चांगला मुलगा आहे हे लक्षात ठेव" रवी म्हणाला.

त्यादिवशी रेखाला रवीच्या मनाचा मोठेपणा दिसून आला.


 बुद्धिबळाचा डाव पुढे पुढे सरकू लागला. रेखा ची सोंगटी पुढे करून गौरव रवी कडून पैसे आणि घर बळकावण्याचा जोरदार प्रयत्न करू लागला.

 एके दिवशी कंटाळून रवीने गौरव ला 25 लाखाचा चेक दिला." तू पार्टनर बघून त्याच्याबरोबर बिजनेस कर. हे पैसे जसे तुझ्या आईचे आहेत तसे माझे पण आहेत. पैसे विनाकारण उडवू नकोस." रवीने कळकळून गौरवला सांगितले.

पैसे दिल्यावर तरी गौरव नीट वागेल अशी रवीचे अपेक्षा गौरवने खोटी ठरवली.

महिन्याभरातच असिफ च्या कंपनीचे बारा वाजले, गौरव चे पैसे त्यांनी बँकेचे लोन परत करण्यासाठी वापरले आणि स्वतः दुबईला पळून गेला. ना चिट्ठी ना कॉन्ट्रॅक्ट, गौरव अतिशय मूर्खासारखं वागत होता. आता त्याने वकिलाकडे जाऊन त्याच्या आधीच्या वडिलांची गावी असलेली जमीन विकता येईल का याची चौकशी करायला सुरुवात केली. गावची जमीन भावकी मध्ये होती. त्याच्यामध्ये चार काका हिस्सेदार होते. ते जमीन विकायला तयार नव्हते. त्यामुळे तिकडे भांडण करून गौरव परत आला.

त्यांनी सगळी बुद्धी पणाला लावून कुठून पैसे मिळवता येतील याचा विचार करायला सुरुवात केली.

 गौरव चा तरुण रक्त, त्याने घेतलेली भूमिका, रवीला आता त्याच्या जिवाचा धोका वाटू लागला.


" मी रेखा बरोबर लग्न करतो आहे, त्यामुळे तुम्ही हा बंगला आमच्या नावावर करून द्या". गौरव म्हणाला.

रवीला या दिवसाचे अपेक्षा होतीच, काडीचही काम न करता फुकटचे पैसे लाटण्याचा आणि उधळण्याचा गौरव चा स्वभाव त्याला पूर्ण परिचयाचा होता.

" मला विचार करू द्या " रवी म्हणाला.

आपल्या आईचं कसलं तरी कागदपत्र गौरवन कुठून तरी मिळवलेले होते. त्यानुसार त्याच्या वाट्याला बरी ची रक्कम आणि घर हे पण होतं. बुद्धिबळाचा डाव पुढे सरकू लागला, गौरव ची सरशी होताना दिसत होती.


त्या दिवशी संध्याकाळी रवी न गौरव आणि रेखा दोघांनाही घरी बोलावले.

त्याला पण एकदाच निवाडा करायचा होता. गौरवने टेबलावरती आई चे कागदपत्र टाकून रवीला सांगितले की त्याला आता हे घर पण त्याच्या नावावर हव आहे.


कागदपत्र वाचताना रवीच्या लक्षा मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने आली.

कागदपत्र फार जुनी होती म्हणजे जेव्हा रवीचा बाबा जिवंत होतात तेव्हा.

तेव्हा कुठलंतरी घर रवीच्या बाबांनी विकत घेतलं होतं. त्यांचा म्युझिक स्टुडिओ त्यांनी विकत घेतलेला होता.

पण नीट चौकशी अंती असं लक्षात आलं की रवीच्या दारुड्या बाबांनी म्युझिक स्टुडिओ कधीच विकून टाकला होता आणि ते छोटं घेतलेलं घर देखील मधूला न सांगता विकून पैसे उडवून ते मोकळे झाले होते.

तरी पण गौरव हट्टाने म्हणत राहिला की हे कर्वेनगर च राहते घर त्याला त्याच्या नावावर करून पाहिजे.

खरं म्हणजे सावत्र मुलाचा सावत्र बापाच्या संपत्तीवर ती काहीही अधिकार नसतो. पण गौरवच्या डोळ्यावर ती जणू काही संपत्तीचे झापड आलेलं होतं.


रवीने आता शेवटची चाल खेळली," ठीक आहे तुम्ही दोघं लग्न करा, मी हे घर रेखा च्या नावावर करून देईल. कारण आतापर्यंत तुला दिलेल्या सगळ्या गोष्टी विकून टाकले आहेस." रवी गौरवला म्हणाला.


चौथ्या दिवशी रवीने वकिलाला बोलावून रेखा च्या नावाने घराचे बक्षीस पत्र करून दिले.


त्या दिवशी रात्री जेव्हा रवी वर बाल्कनीमध्ये आला तेव्हा बुद्धिबळाचा डाव जवळजवळ संपत आला होता.

रवीला अतिशय वाईट वाटत होते, मधूला दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांनी गौरवला सांभाळण्याचा भरपूर प्रयत्न केला होता.

थकून रवि बुद्धीबळाचा जवळच असलेल्या त्याच्या खुर्चीवर बसला.

तेवढ्यात आतून रेखा आणि गौरव विजयी मुद्रेने बाहेर आले.

" डॅडी आता हे घर आमचं आहे त्यामुळे इथे तुम्हाला राहता येणार नाही. आम्ही हे घर विकू, सहज याचे चार कोटी रुपये येतील आणि त्या पैशांमध्ये मी बिझनेस करीन. रेखा पण तयार आहे." गौरव घमेंडी ने म्हणाला.

" डॅडी आत्तापर्यंत तुम्ही मला बुद्धिबळात हरवत होतात पण या वेळेस मात्र तुमच्या आयुष्याच्या बुद्धिबळाचा डावच मी उलटवून लावला." आणि हो तुम्ही काही माझे वडील वगैरे नाहीत,. माझे वडील फक्त माझे बाबा होते". गौरव बोलतच राहिला.


रवीच्या चेहऱ्यावरती खेद आणि आश्चर्य एक साथच उमटले. असली तर कथा देखील त्यांनी कधी लिहिली नव्हती. केलेल्या उपकाराची अशी परतफेड?


" गौरव, डॅडी, तुम्ही दोघेही विसरत आहात, बुद्धिबळाच्या डावांमध्ये एक राणी पण असते. कुठेही, कधीही, कशीही जाण्यासाठी तिला कोणाचीही परवानगी लागत नाही." रेखा विचित्र आवाजात म्हणाली.

" गौरव, एक निर्जीव सोंगटी असल्याप्रमाणे तू मला वागवले, त्याच्या उलट तुझ्या डॅडींनी माझ्या विचाराची कदर केली, मला योग्य दिशा दाखवली मला कायमच प्रोत्साहन दिले आणि तुला तर मी करत असलेल्या कामाबद्दल काहीच माहिती नाही. माझ्या मेहनती बद्दल पण तुझ्या मनामध्ये काहीच आदर नाही. तू मला निर्जीव सोंगटी प्रमाणे वागवले, तू विसरलास की मला पण मन आहे भावना आहे, माझ्यापण भविष्याच्या काही कल्पना आहेत, तुझ्या डॅडींना तर तू , खरं म्हणजे, व्यवस्थित ओळखत,,देखील नाहीस त्याच्यामुळे मी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे".

रेखाने रवी च्या बाजूला खुर्चीच्या हातावर बसत रवीच्या गळ्यात हात टाकला, उजव्या हाताने रवीची पांढरी राणीची सोंगटी उचलून सरळ जाऊन गौरवच्या राजाला पटा बाहेर फेकून दिले.

" गौरव, मी रवि शी लग्न करणार आहे तुझ्याशी नाही, तुझ्यासारख्या लूझर बरोबर जन्म घालवण्याची माझी अजिबात तयारी नाही. मला पण माझं करिअर करायचा आहे आणि त्याची मोकळीक मला तुझे डॅडी देणार आहेत." रेखाने रवीच्या गालाचे हलकेच चुंबन घेत गौरव च्या दिशेने बघत आवेशाने उद्गार काढले. तिच्या गळ्यातल्या हाताचा रविने पण जोरदार मुका घेतला ,

" चेक अँड मेट" असे म्हणत नजरेनेच गौरवला घराच्या बाहेर जाण्यास सांगितले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama