चांदरात
चांदरात


पौर्णिमेचा पूर्णचंद्र प्रहररात्री आभाळात वर आलेला असताना तिला तीन वर्षापूर्वीची अशीच पौर्णिमा आठवली... अर्थात तेव्हा तो असा स्पष्ट नव्हता... वादळवारे आणि फिक्कट राखाडी ढगांचे करडे मळभ त्याच्यावर साचलेले होते... तरीही त्या पूर्णचंद्राच्या उगवतीला.. ती त्या चंद्राला केसात माळून बघत होती.. कधी तो एखाद्या काजव्यासारखा तिच्या केसात बसलेला दिसायचा.. कधी त्याचा विशाल गोलक तिच्या भोवती रुंजी घालायचा.. कधी तो तिच्या कपाळावरचे गोंधन .. कधी तो तिला मिळालेले आंदण.. कधी त्याला उराशी कवटाळून जोजवलेलं.
क्षितिजावरच्या चंद्राशी लडिवाळ चाळे करत फोटोसेशन झाल्यावर त्यांनी मग परतीचा प्रवास सुरु केला.. ती एक विश्वासानं त्याच्या सोबत मुक्कामी चालली होती. विरळ ढगातून चंद्र तिच्यावर नजर ठेवून होता... आता तो डायमंड वगैरे सारखा नव्हता उरलेला.. तो केवळ साक्षीदार होता.. तिचे हात आता पार्थाच्या हातात गुंफलेले होते. आता तिने चंद्राला पाठीशी नव्हे पण साईडला जरूर टाकले होते.
आज खरंतर, तिच्या पायातल्या चपलेला हा खडतर प्रवास झेपत नव्हता. म्हैसमाळच्या रानातले रस्ते नावाप्रमाणेच रानटी. पण तिच्या डोळ्यात चढत्या चंद्राबरोबर कसलीशी धुंदी चढत चालली होती. शेवटचा चढ चढून ते हॉटेलमध्ये आले. परिसरात तेवढे एकच धडसे हॉटेल. पश्चिम कड्यावर असलेल्या डायनिंग हॉलमध्ये एकदम कड्याच्या रेलिंग जवळचे टेबल निवडून ते बसले. खालच्या हजारेक फुटांच्या उभट दरीतून वर येणारा सोसाट्याचा गार वारा अंगावर येत तिच्या मोकळ्या केसांना अस्ताव्यस्त उडवत होता. वेटरने सलाड आणि रोस्टेड पापड आणून ठेवले. तर त्यांच्या बेसावधपणाचा फायदा घेत एक पापड सोसाट्याच्या वाऱ्याने वरचेवर उडवून त्याच्या ठिकऱ्या उडवल्या देखील. उरलेला दुसरा पापड एक हाताने दाबून त्याने दोघांत शेअर केला आणि जेवण झाल्यावर रूममध्ये जाऊन जरा फ्रेश व्हायला झाले. आधी ती जाऊन आली आणि कॉटच्या कडेला बसली. आता तो वाशरूमला जाण्यासाठी उठणार तोच त्याला तिच्या भेगाळलेल्या टाचा दिसल्या.
“बॉबी, मला तुझे तळपाय दाखव...”
तो तिचे मूळ नाव सोडून असेच कोणत्याही नावाने हाक मारतो, तेही प्रत्येक वेळी बदलून. तर या क्षणी बॉबी त्याच्या या मागणीने संकोचली.
“काय पहायचंय तुला माझ्या भेगाळलेल्या पायात..? सगळ्या जगाचा नकाशा भरलाय तिथं.”
“त्या नकाशातलं मला माझं जग पहायचंय”
असे म्हणत तिच्या पायापाशी बसून त्याने चक्क तिचा एक तळवा उचलून हातात घेतला. तशी ती ओशाळून एकदम किंचाळलीच.
“हे काय करतोस नकट्या? चक्क माझ्या पायाला हात लावला तू?”
“स्वच्छता असेल तर शरीराचा प्रत्येक भाग, हातच काय ओठ लावावा इतका पवित्र असतो.”
“अरे पण, मला कसंतरीच वाटतं तू माझ्या पायाला हात लावलेलं पाहून ?”
तिला गप्प बसण्याचा इशारा करत, त्याने तिच्या भेगाळल्या टाचेला जवळ घेऊन बारीक निरीक्षण केले... नंतर समोरचा तळवा पाहताना त्याला अगठ्याजवळ चप्पल घासून आलेला फोड जाणवला... नंतर दुसरे पाऊल उचलून निरीक्षण केले. दोन्ही तळवे डोंगराळ रस्त्यावर चालल्याने लालबुंद आणि गरम झाले होते. त्याने तिचे पाय आपल्या मांडीवर घेतले आणि स्पर्श जाणवेल न जाणवेल असा अगदीच हलक्या हाताने तिच्या पावलावर हात फिरवणे सुरु केले. कोणी आपल्या पायाला इतक्या प्रेमाने कुरवाळू पाहतेय या भावनेने तिला भरून आलं. संकोच आणि आनंदात कुचम्बून तिने डोळे मिटून घेतले. वेदनेचा हुंकार दाबण्यासाठी तिने क्षणभर ओठ दाताखाली दाबून धरला.
“हे बघ चिकुडी, मी तुझ्या पायाला हात लावले ते तू कोणी महान आणि मी तुच्छ या भावनेसाठी नाहीच मुळी. मी तर फक्त तुझ्या पावलांच्या वेदना वेचून घ्यायचा प्रयत्न करतोय. तुझ्या बाबांनी तुझ्या पावलांना बालपणी अनेकदा असं कुरवाळत गुदगुल्या केल्या असतील.. पायात रुतलेले काटे काढले असतील.. फोडावर फुंकर घातली असेल.. तर ते काय तुझ्यापेक्षा लहान ठरले का ?”
तिला काय बोलावे सुचेना. पण तो जुमानत नाही म्हंटल्यावर तिने मागे झुकून डोळे मिटून घेतले. मिटल्या पापणीतून एकेक अश्रू गालावरून वहात ओठापर्यंत ओघळला. प्रेमात असं काही असू शकतं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. आता तळव्यातली वेदना कमी होत जाऊन एखाद्या अलगद फुलाचा स्पर्श व्हावा अशा प्रकारे त्याची बोटे तिच्या तळपाय आणि पंजाची मालिश करत होती. कधी त्यातून मोरपिसासाच्या स्पर्शाचा भास होत होता... सगळा देह पिसासारखा हलका हलका होत जणू सुखाच्या डोहात तरंगू लागलेला होता. हळूहळू तिच्या पापण्या जडावू लागलेल्या. हळूवार उठून तिच्या मस्तकावरून हात फिरवत तो बोलला..
“तुला झोप येतेय न राजुडी. चल मी तुला झोपवतो...”
तिने स्वत:ला आता संपूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलेले. तर त्याने मागची उशी सेट करून अलगदपणे तिला बेडवर आडवे झोपवले. ती डोळे मिटून पुढच्या क्षणाची वाट पाहू लागली.. “एक मिनिट थांब हं” असं म्हणत त्याने आपल्या ब्यागेतून व्हिको टर्मरिकची क्रीम काढली. थोडी थोडी बोटावर घेऊन तिच्या टाचेच्या भेगात भरून पुन्हा हलकी मालिश सुरु केली. तिला क्षणभर काय होतेय तेच समजले नाही. पण डोळे उघडून पाहिल्यावर डोळ्यावर विश्वास बसेना.
“नको ना रे इतका सेवाभाव दाखवू..!” ती अक्षरश: कळवळून बोलली.
“प्रियकर काय फक्त शरीर भोगण्यासाठी असतो का गं ?”
ती त्याच्यापुढे सर्वस्वी निरुत्तर होती. तो तिच्या पायाची अलगद मालिश करत होता अन गेली वीस वर्ष साचलेले दु:क्ख तिच्या डोळ्यातून वाहून जात होते. तिला पुन्हा एकदा आपले पंचवीस वर्षाचे वैवाहिक जीवन आठवले. लग्न जमेपर्यंत नवरा प्रियकराच्या ओढीने भेटायला तर यायचा. पण अवघ्या पाचच मिनिटात मिठीत घेऊन दाबायला बघायचा. मात्र ती असं उमलू शकत नव्हती. संस्काराचं पूर्वसंचित हे लग्नाआधी बरं नाही असं ओरडून सांगू लागे. तिचा आकसलेला प्रतिसाद पाहून त्याचा मूड जाई.
तो मग तिला घेऊन एखाद्या कॉफी हाऊसला जाई आणि एकेक घोट चाखताना तिला आपल्या घराण्याच्या चालीरीती समजावू लागे. खरं तर कॉफी हे तिचे अगदी आवडते पेय. पण त्याच्या घराण्याच्या चालीरीतीत आपल्या प्रीतीला फारसा वाव नाही हे जाणवल्यावर कॉफीची कडू चव तेवढी जिभेवर उरे. तिला लवकरात लवकर नवरा प्लस सासू, सासरे, रिकामटेकडा दीर यांच्या चोवीस तासाची नोकरानी या भूमिकेसाठी तयार व्हायचे आहे, हा मेसेज तो प्रत्येक भेटीत तिच्यावर ठसवत असे. त्यातही पुन्हा ड्रेस घातलेला चालणार नाही. नोकरी करता येणार नाही. ती संगीत विशारद असली तरी छंद म्हणूनही हार्मोनियमवर बसायला मिळणार नाही. पिरीयेडमध्ये वेगळं बसावं लागेल... वगैरे रूढी परंपरा घोकून घेतल्या जाऊ लागल्या तसं तिचं आतलं विश्व कुचंबून जाऊ लागलेलं असायचं. मग ते निरोप घ्यायला उठत.
पण सगळ्यात हद्द तर हनिमूनच्या वेळी झाली. नवऱ्याने रीतसर स्पर्श करण्यापूर्वीच तिला बजावले कि, मला ओठाचे चुंबन घ्यायला आवडत नाही. स्तन कुस्करायला आवडतं पण तिथेही माझ्या ओठांची अपेक्षा ठेवू नको. नंतर हेही कळून चुकले कि, त्याला तिची तयारी होईपर्यंत दम निघत नाही. वरची दाबादाबी झाली कि बाई झटक्यात तयार व्हायला पाहिजे हे त्याचे अजब कामशास्त्र ! तिची लवकर तयारी नाही झाली तर सुरुवातीची दोन पाच मिनिटे ती दात ओठ दाबून वेद्नात तडफडत तो बलात्कार सहन करायची. नंतर कदाचित देहधर्म जागा होऊन थोडीशी मजा येई.. पण हाय रे दैवा... नवऱ्याला तिचा पाठीवर फिरणारा हातही आवडायचा नाही. तिच्या अंगभर उठणाऱ्या लाटा देहातल्या देहात धडका मारून मरून पडत.
पुढे तर आणखीच हद्द झालेली. घरच्या कामाचा रगाडा आणि सासूचे काहीतरी खुसपट काढून किरकिरत राहणे, पुढे दोन लेकरांची भर, पाहुणे, सणवार यात तिला स्वत;कडे पाहण्यास उसंतच उरली नाही. तर नवरा तिला बाहेरच्या कार्यक्रमात नेणेही टाळू लागला. एकदा कारण विचारले तर म्हणे स्वत:ला आरशात न्याहाळ. कसली काकूबाई छाप दिसतेस. मला लाज वाटते बायको म्हणून सांगायला. त्या क्षणी तिच्या मेंदूत शेकडो सुरुंगाचे स्फोट झाले. मी घरात आल्या क्षणी दोन मोलकरणी कमी केल्या तेव्हाच माझे भवितव्य कळून चुकले होते. माझ्या सगळ्या इच्छा चिरडून टाकल्या. दुसरी कोणी असती तर पाचव्या मजल्यावरून झोकून देऊन मोकळी झाली असती. नंतर त्या हरामखोराने बाहेर एक परीत्यक्तेशी सूत्र जमवले. तिच्यात इतका बुडून गेला कि, कैक महिने आपले वैवाहिक संबंधच उरले नाहीत. रात्री अंगांग तापू लागले तर सरळ बाथरूममध्ये जाऊन गार पाण्याचा शॉवर सोडून अंगात हुडहुडी भरेपर्यंत उभं राहायचं. एक दिवस मग आपण आपल्या आतल्या आवाजाची हाक ऐकायचा निर्णय घेतला...
डोळ्यांच्या पापण्यावर त्याच्या ओठांचा हलका स्पर्श जाणवला, तशी ती तंद्रीतून जागी आली. पार्थ तिचे वाहते डोळे टिपत तिच्या पापण्यावर ओठांनी हलके चुंबन जडवत होता. पण अजूनही त्यात कुठली वासना जाणवत नव्हती. क्षणभर तिला त्याला घट्ट मिठी मारावीशी वाटली. पण त्याच्या करुणेत वासना मिसळायची हिम्मत झाली नाही. त्याने तिचे मस्तक मांडीवर घेतले आणि अलगदपणे किसातून बोटे फिरवत मस्तकाला बोटांनी चोळत मालिश करू लागला. तिला त्या परमसुखाच्याने गाढ झोप लागून गेली.
पहाटे त्याच्या ओठांच्या मृदू स्पर्शाने तिला जाग आली. सगळ्या घराची नोकरानी आज ती तिच्या मर्जीची राणी होती. तिला जाग येताच त्याने वाफाळत्या कॉफीचा कप तिच्यासमोर धरला. खिडकीतून येणारा मंद पहाटवारा अंगावर घेत ते कॉफीचा स्वाद घेऊ लागले. कित्येक वर्षांनी कॉफीतला कडवटपणा जाऊन गोडवा परतला होता. कॉफी संपल्यावर तिने खुर्चीवरच अंग ताणून लांब आळस दिला. त्याने पाठीमागून तिच्या गळ्यात मिठी घातली. त्यात मार्दव आणि जवळीक होती. पण अजूनही त्याचा हात खाली घसरला नव्हता. तिला गेल्या वेळच्या भेटीतला प्रसंग आठवला. त्याला संधी म्हणून तिने बाथरूममध्ये अंगावर पाणी घेतल्यावर त्याला हाक मारली..
“पार्था, मी टॉवेल आणि साबण घ्यायला विसरले रे.. तेवढं देतोस”
यावर तो दोन्ही वस्तू घेऊन आला. बाहेर आलेला तिचा ओलेता गोरापान हात मोठा आकर्षक दिसत होता. पण त्याने फक्त तिच्या हातात दोन्ही वस्तू दिल्या आणि आपल्या जागेवर परत फिरला. त्यावेळी दोन दिवसात त्याने तिची काळजी तर घेतली.. पण त्यात कुठेच शारीरिक ओढ नव्हती. नंतर मधल्या वर्षभरात फक्त फोन आणि चाटवरच संवाद. महत्प्रयासाने जुळवून आणलेली ही भेट. पण मग यावेळीही तसेच होईल का ?
दरम्यानच्या काळात नवरा तिच्यामागे कसला हात धुवून लागलेला असायचा तेही आठवले. त्याला दिवसातून कितीवेळा सेक्सची इच्छा होईल काहीच नेम नव्हता. दिवसातून चारवेळा मोका मिळाला तरी ठोका द्यायला तयारच असायचा. कधी ती अक्षरशः इरीटेट व्हायची. त्याला फोरप्ले नावाचा प्रकार मान्य नव्हता. गाऊन वर करायचा आणि भिडायचा. कुठले उत्तेजक घेऊन पिडत होता कुणास ठाऊक...! पण त्याच्या त्या प्रदीर्घ मेहनतीत तिला भक्त स्लीपिंग एड म्हणून गृहीत धरलेलं असायचं. कार्यभाग झाला कि, तो पाठ फिरवून घोरायला लागायचा. अन इकडे ही मात्र अजून कुवारी असल्यासारखी पार्थच्या भेटीची वाट पहायची. त्याच्या स्पर्शात काय बरं शोधत होती ती ?
“तुला आवडणार असेल तर मी तुला माझ्या हाताने आंघोळ घालू ?”
“काय ? तू मला आंघोळ घालणार ?”
ती उत्तेजित होऊन अक्षरश: ओरडलीच. याच क्षणासाठी ती केव्हाची आसुसली होती. लगेच दोघे टॉवेल घेऊन आत गेले. पहिल्यांदा त्याच्या समोर तिचे कपडे उतरू लागले. समोरच्या आरशात आपला उघडा पडणारा देह पाहून ती शहारली आणि संकोचलीसुद्धा. पण त्याचं अजूनही काही समजत नव्हतं. त्याने आधी तिच्या मस्तकावर गरम पाण्याचे दोनचार मग ओतले. मग शाम्पूची एक पुडी तिच्या केसात रिती करून बोटांनी मालिश करत शाम्पू खोलवर पसरवत फेस करू लागला. मग साबण घेतली आणि तिच्या सर्वांगाला साबण लावायला सुरुवात केली. तिला गोड गुदगुल्या होऊ लागल्या. डोळ्यात जाईल म्हणून तिने डोळे मिटले. त्याने एखाद्या लहान मुलीला आंघोळ घालावी तसा तिचा प्रत्येक अवयव साबणाच्या फेसात चोळून काढायला सुरुवात केली. आधी गाल मग मान पाठ... आणि आई गं... इतका वेळ मलूल पडलेले स्तन आता ताठू लागलेले.. उरातले काहूर गच्च गच्च दाटून गोलाकर घुमट कळस दाखवू लागलेले. तो मात्र अशा थाटात चोळत होता कि, त्यात काही घोळ नसून फक्त आंघोळच आहे. त्याचे फेसाळ हात पाठीवरून नितंबावर आले. आता तिच्या अंगभर उसासे दाटून आले. तो मागून बोटे सरकवून एकेक कळी चोळत होता. तो ओटीपोटापर्यंत चोळत येऊ लागला. तर दुसरा हात ताठलेल्या स्तनावर आणि त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर रुतलेली.. ओठ कानाला चावटपणा शिकवू लागले तशी ती बेभान वेडीपिशी होत मागेपुढे उसळू लागली. मग तो सावकाश समोरून आला. मांड्यावर साबणाचे हात फिरू लागले तेव्हा तर अंगभर सतारीच्या तारा छेडल्या जात होत्या... आणि त्याचे हात आता गुडघे, पोटऱ्या चोळत पुन्हा तळपायावर आले.
“पार्था, नको रे माझ्या पायांना हात लावू.”
पण त्याने तिचा एकेक तळवा उचलून साबण लावलाच. त्या गुदगुल्यांनी ती धुंद झाली. जणू माहेरच्या सुखात न्हाली. तो आता मगने पाणी ओतत तिच्या केसांना धुवू लागला. इतक्या जवळून ओलेते केस अनुभवणे एक दिव्य अनुभव असतो. मग तिचे गाल.. मान.. छाती.. नभी.. ओटीपोट .. कंबर.. मांड्या ... पोटऱ्या.. तळपाय सगळीकडे पाणी ओतून त्याने साबण धुवून टाकला. तिचे देहभान केव्हाच हरपले होते. ती फक्त सुख संवेदनांनी उसासत होती. धपापत होती. जणू पाण्यात असूनही मासोळी तडफडत होती. तळपाय धुतल्यावर त्याने पुन्हा एकदा तिचे पाय कुरवाळले... आणि इकडे बघ म्हणत तिच्या गुलाबी तळव्याचे चक्क चुंबन घेतले.
“पार्था.. काय करतोस तू हे ? ती जागा काय ओठ लावायची असते का ?”
“जेव्हा हृदयात निरतिशय प्रेम असेल तेव्हा सगळ्या जागा पवित्र आणि सुंदर असतात.”
“पण इतक्या सुखाने मी मरून पडेल रे”
“मरून तर तू इतके दिवस पडलेली होतीस. आज फक्त तुझा पुनर्जन्म झालाय.”
असं म्हणत त्याची जीभ, ओठ ओला स्पर्श करत वर वर सरकू लागले. तिच्या सर्वांगाला जणू लक्ष लक्ष इंगळ्या डसल्या. धुंद स्पर्शाने बेभान होऊन ती शॉवरखाली थयथय नाचू लागली.
“आज खऱ्या अर्थाने मी मला सापडले पार्था.”
तोवर त्याच्या ओठांनी तिचे फुललेले टपोरे स्तनाग्र ताब्यात घेतले.. आणि तिच्या संयमाचा बांध फुटला. तिने त्याचे मस्तक जोरदारपणे छातीवर दाबून धरले... सगळ्या अंगागातील सुखाचे झरे एकदम मोकळे झाले. रोमरोमातून उन्माद उफाळून येऊ लागला आणि दोन मिठ्यात एकाकार झालेला देह झुलू लागला... शॉवर आत तसाच खळखळत वाहत होता.