umesh todakar

Inspirational

4  

umesh todakar

Inspirational

चांदीची राखी

चांदीची राखी

9 mins
498


जन्माला येणारा प्रत्येक माणूस समाजाचं काहीतरी देणं लागत असतो आणि हेच वाक्य अभिप्रेत मानून तो समाजासाठी सत्कार्याची कामे करत असतो. समाजातील विविध घटकांचे प्रश्न मिटविण्याचे काम तो सातत्याने करत असतो आणी आपली छाप समाजमनावर पाडत असतो. यातूनच सामाजिक कार्यकर्ता उदयास येत असतो त्याच्या कार्यामुळे समाज त्याला पुढारी ही पदवी प्रदान करण्यास मागे पडत नाही. समाजकार्य करणारा कार्यकर्ता गावचा सरपंच झाला तर ते काही विशिष्ट आणि वेगळं काही नाही हीच तर समाजानं त्याच्या कामाची दिलेली पोचपावती म्हणावी लागेल असाच तळमळीचा आणी कर्तृत्ववान कार्यकर्ता सरपंच नामदेव याच्या जीवनाशी निगडीत ही कहाणी थोडीशी स्पष्ट थोडीशी अस्पष्ट पण आहे ही वास्तविकतेचि किनार असणारी .       


नामदेव तसा हुशार आणी तळमळीचा कार्यकर्ता प्रत्येक हाकेला ओ देणारा आणी प्रत्येकाच्या मदतीला धावणारा असा हा साच्यां कार्यकर्ता होता. त्यामुळे गावात त्याच्या नावाचा तसा दबदबा निर्माण झाला होता एक प्रेरणादाई कार्यकर्ता म्हणून लोक त्याच्याकडे पाहत होते. गावात यावेळी मात्र इतकं तन्मयतेन काम करणारा दुसरा कोणी व्यक्ती नव्हता त्यामुळं गावानं नामदेवला पंचायतीच्या निवडणुकीत उभा केलं आणी निवडूनही आणलं फक्त निवडून आणलं नाही तर गावचा सरपंच हा मानाचा बहुमान ही बहाल केला. त्याने आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती असेल किंवा त्याच्या मदतीला दिलेला हात असेल;पण प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की नामदेव सरपंच असावा. आणी झालाही. नामदेवाच्या हाताखाली गावगाड्याचा संसार अतिशय सुंदरपने चालू लागला. पण चागल्या चालनारया गावगाड्यात विघ्न जर आलं नाही तर ते गाव तरी कसलं. जितका माणूस मोठा तितके त्याचे शत्रू अधिक असं म्हणतात ते बरोबरचं आहे. गावात जशी प्रगती होत होती ; तश्या वाद विवादाच्या फैरी ही झडत होत्या. त्यात शेतीचा वाद, जमिनीचा वाद, राजकीय वैमनस्य, यातून अनेक वादविवाद गडात गेले. चागलं चालणं किंवा एखाद्याची भरभराट होणं ही फार चांगली गोष्ट आहे. पण हे सर्वाना बघवण दुरापास्त आहे. असंच राजकारणात आणी समाजातही होत असतं नामदेवाच सर्व काही ठीक चाललं होतं आणी गावगाडा हाकत असताना अनेक विरोधकही निर्माण झाले होते. हा संघर्ष धगधगत होताच; यातच गावच्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित केली होती.


ग्रामसभेच्या कामकाजासाठी गावातील सर्व प्रतिष्ठीत मंडळी, गावकरी ग्रामपंचायतच्या चौकात एकत्र जमले होते. या गर्दीत माणसांची गर्दी होतीच पण या सर्व माणसांच्या गर्दीत माणुसकीची जाणीव असणारी माणसे फारच कमी होती याची जाणीव कांही क्षणातच होईल याची अपेक्षा कोणीही केली नव्हती. गावच्या रहाटगाडग्यात एखादा सर्वसामान्य माणूस कसा पिंजून जातो याचं उदाहरण इथे पहावयास मिळालं. ज्या गावानं नामदेवाला सरपंच केलं होतं तेच गाव आता नामदेवाच्या जिवावर उठलं होतं. त्याचा जणू जीवच घ्यायच्या प्रयत्नात होत. गावाच्या चौकात ग्रामसभा चालू असताना सभेत जमिनीच्या वादातून दोन गटात शाब्दिक चकमकीच्या फैरी झडल्या शब्दांना जशी धार चडत गेली तश्या अनेक मनांच्या चिंधड्या चिंधड्या होऊ लागल्या अनेकांच्या वर्मावर आपसूक घाव बसू लागले. आणि यातूनच शब्दांच चालू झालेलं द्वंद्वयुद्ध शस्त्रांच्या सहाय्याने लढलं जाऊ लागलं बघता बघता अनेकांनी सरपंचाना अक्षरशा बेदम मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नामदेवाला कोणीतरी वाचवावं जमलेला घोळका फोडून कोणीतरी आत शिरावं आणि सर्वांना एका झटक्याशी बाजूला सारत त्याला बाहेर खेचावं हे क्रमप्राप्त होतं पण कोणीही पुढे येत नव्हतं. सर्वांनी बघ्यांची भूमिका करणं पसंत केलं होतं आणि बघताक्षणी नामदेवाच्या डोळ्यासमोर बार भरलेली बंदूक आली काठ्या कुऱ्हाडी आल्या. सर्वत्र आहाकार माजला आता रक्ताची होळी खेळणार काळाच्या जबड्यात नामदेव लुप्त होणार असं चित्र काही क्षण निर्माण होतं न होतं तोपर्यंत सर्व माणसातून एकच आवाज आला, "महादेव (दादा) याला वाचवलं पाहिजे."         


'तात्यासाहेब म्हणाले'  भगवान शंकर महादेवान आपला तिसरा डोळा उघडावा आणी समोर चाललेला अन्याय एका कटाक्षात संपून टाकावा जणू काही त्याच अविर्भावात दादा पुढे गेले सर्वांना बाजूला सारत नामदेवावर हात घातला आणि त्याला बगलेत घेऊन म्हणाले, "जर कोणी याला हात लावला तर याद राखा, एकटा बघून त्याचा जीव घेताय होय रे ! "असं म्हणतच सर्व घोळक्यातून नामदेवला दादांनी बाहेर काढले त्यातच त्यांच्या पंजीचा पंचा टारकन फाटत गेला; पण खाली न बघता त्याला बाहेर काढून पाराच्या काट्यावर बसवलं आणि जणू सर्वांना आव्हानच केलं की याला गोळी घालण्याअगोदर मला गोळी घालावी लागेल असेल हिम्मत ज्यांच्यात त्यांनी घाला गोळी या पुढं? कोणीही पुढं आलं नाही. दादांच्या शब्दात वजन होतं; केलेलं निस्तरायची ताकत होती, हल्ला परतवून लावण्याची धमक होती म्हणूनच हा सर्वसामान्य माणूस पुढं गेला.      


डोक्यावर गांधी टोपी अंगात तीन बटणाचा शर्ट कमरेभोवती गुंडाळलेली पांढरीशुभ्र पणजी; साधारण सहा फूट उंची असणारा दादा ठसकेबाज शब्दांचा मारा करणारा तत्वज्ञानी माणूस होता. त्यांच्या शब्दाला किंमत होती आणी म्हणूनच कोणी पुढं आलं नसावं त्याला तसाच उचलला खांद्यावर घेतला आणि थेट त्याच्या घराच्या दिशेने पाउले टाकली. अंगावरील शर्ट रक्ताने लाल भडक झाला होता शर्टाच्या रंगाबरोबर आजूबाजूच्या वातावरणानही रंग बदलला होता. सर्व वातावरण भडक झालं होतं काहीतरी विपरीत घडणार याची प्रत्येकाच्या मनात हुरहूर लागली होती चालता चालता दादांनी हाक मारली, "नामदेवा ये नामदेवा" नामदेव शांतच होता डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. शरीरावरील कपड्यांनी लाल रंग परिधान केला होता झपाझपा पावले टाकत दादा घराच्या दिशेने जात होते. आजूबाजूचे लोक सर्व घटना पाहत होते काहीजण त्यांच्या पावलावर पाउल टाकत बरोबर जात होते. घराजवळ येताच सर्व लोक जमा झाले दादांनी त्याला खाली ठेवलं. नामदेवाची बायको शांता दारातच उभी होती. दादा म्हणाले, "हा घ्या तुमचा मालक." नामदेवला बघताच शांताच्या चेहऱ्यावर अशांतता पसरली. डोळ्यातील पाण्याच्या थेंबाने धारेचे स्वरूप धारण केले. ती त्याच्याकडे बघतच कडाडली, "कशाला पाहिजे ते राजकारण सोडून द्या ते" आणि धाय मोकलून रडू लागली. तिच्या डोळ्यातील पाण्याच्या धारा थांबण्याचे नावच घेईनात. त्यांनी जणू काही वर्षावच केला आपल्या मालकाची ही अवस्था पाहण्यासारखी नव्हती. रक्तबंबाळ झालेलं शरीर पाहून त्याने केलेले समाजकारण तिच्या डोळ्यात साठू लागलं. आयुष्यातील महत्वाचे क्षण घरासाठी, कुटुंबासाठी न देता गावाच्या कल्याणासाठी खर्च केले त्याचं हे फळ मिळालं, असं म्हणतच ती रडू लागली. "राजीनामा द्या" रडतच ओरडली.         

"नाही द्यायचा, अजिबात नाही; दादा म्हणाले "कशासाठी द्यायचा राजीनामा यासाठी? अजिबात नाही! तू काही काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्या पाठीशी काही होत नाही."         


शांताला धीर आला डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली " आज माझ्या कुंकवाचा धनी वाचवलास , माझं कुंकू वाचवण्यासाठी भावासारखा धाऊन आलास " माझ्या चार बहिणींच्या पाठीवर तू माझा पाचवा भाऊ झालास " आजपासून तू माझा भाऊ आणी मी तुझी बहिण 'आणी त्या क्षणापासून दादा शांतेचा खरोखर दादा झाला नामदेव यातून व्यवस्थित बराझाला दोन कुटुंबातील प्रेम वाढले घरी येणे जाणे होऊ लागले. आता भावाची कमतरता संपली होती सौभाग्याचं लेणं कपाळाच कुंकू ज्याच्यापाई वाचलं आणी भरल्या घराला अवकळा येण्यापासून वाचली ती या दादामुळंच; आणि नावाचा दादा आता खरोखरीचा दादा झाला होता. रक्षाबंधनाचा दिवस जवळ आला होता. शांता नामदेवला म्हणाली, अहो माझं एक काम आहे कराल का? कोणतं? नामदेव म्हणाला, मला एक चांदीची राखी आणून दयाल का?        

कशासाठी नामदेव म्हणाला?         

दादाला बांधायची आहे. रक्षा बंधनाच्या दिवशी


चांदीची राखी घरी आली रक्षाबंधनाचा दिवस उजाडला व राखीने दादांच्या मनगटावर जागा घेतली. ओवाळणी म्हणून दादांनी बहिणीसाठी साडी घेतली पण साडी पाहून शांता म्हणाली, 'मला तुमच्याकडून ओवाळणी नकोय 'माझ्या कुंकवाचं रक्षण करून तू मला फार मोठी ओवाळणी दिली आहेस त्या ओवाळणीएवढी मोठी ओवाळणीया जगात कोठेही मिळणार नाही. हे शब्द कानावर पडताच दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भाऊ बहिणीच्या नात्याची वीण त्या धाग्याने घट्ट बांधून ठेवली कधीही न तुटण्यासाठी. असेच दिवस जात होते. एक दिवस दादा शांताच्या घरी गेले होते. सायंकाळची वेळ होती बोलता बोलता शांता म्हणाली "दादा तुला एक विचारायचं आहे?           

विचार की           

माळावरची आमची जमीन तू करशील का? अशीच या वादात पडून आहे.           

का बरं? कोणीही ऊस बाहेर काढायला वाट देत नाही दुसर धान्य केलं तर तेही बाहेर काढता येत नाही. वर्षानुवर्षे वाट नसल्याने जमीन पडून आहे आम्हाला हे सर्व जमत नाही तर ती जमीन तू पिकव आम्हाला त्यातून तू काहीही देऊ नकोस पण सोन्यासारखी जमीन पडून रहायला नको.           

दादा म्हणाले मी करतो ती जमीन आणि तिसरा हिस्साही तुला देतो बघू कोण देत नाही वाट आणि दादांनी जमीन कसली ऊस लावला डोलदार ऊस पाहून मन प्रसन्न झाले. ऊसाचं पीक जोमानं आलं. काढणीचे दिवस जवळ येत होते. पीक बाहेर कसं काढायचं हा प्रश्न होता. पण तो ही दादाने शिताफीने सोडवला. शेजाऱ्यांच्या मनातील तेढ दूर करून आपला ऊस समजून त्यांना मदत करण्यास सांगितले आणि ज्यांनी विरोध केला त्यांच्यातून जबरदस्तीने वाट काढून त्यांनाही पद्धतशीर अडवण्याचे प्लॅनिंग केले व ते यशस्वीही केले. ऊस बाहेर आला कारखान्यात पोहोचला बिलही जमा झाले. भरघोस उत्पन्न मिळाले. आपल्या खात्यावरील पैसे काढून त्यातील तिसरा हिस्सा दादानं बहिणीला नेऊन दिला. पण ती तो घ्यायला तयार होईना. पण भावाकडून बहिणीला दिलेली भेट स्वीकार कर असं म्हणत तिला तिसरा हिस्सा देऊन टाकला.       


आता पडलेल्या जमिनीचा प्रश्नही मार्गी लागला होता गावातील संघर्षही कमी झाला होता दिवस पुढं पुढं जात होते तसंच वातावरणही बदलत होतं. अश्यातच एक दिवस शांता आजारी पडल्याचा निरोप दादाजवळ आला. अनेक दवाखाने डॉक्टर पाहून झाले गुण काही येत नव्हता आजार वाढतच जात होता पैसा अमाप खर्च केला पण गुण काही केल्या येईना. रक्षाबंधनाचा सण जवळ येत होता. शांता नामदेवला म्हणाली "आहो बाजारात गेलात की एक चांदीची राखी घेऊन या पुन्हा जायला मिळेल न मिळेल रक्षाबंधनाचा सण जवळ आलाय घेऊन या हं?          

नामदेवाने होकार दिला.  


सांगितल्याप्रमाणे बाजारातून राखी खरेदी करून आला. शांताने एकवार तिच्याकडे निरखून पाहिलं वर्षानुवर्षे ही राखी दादाच्या हातात बांधतेय पण यावेळी ती इच्छा पूर्ण होईल का? मनातल्या मनात विचार येऊन गेला. एक दिवस दादांना निरोप आला शांता कराडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये एडमिट आहे. चार दिवस झालं अन्नपाणी खाल्लेलं नाही डोळेसुद्धा उघडलेले नाहीत. तुम्ही बघून जावा. दादांनी चटकन कपडे बदलले कराडची एसटी पकडली आणि दवाखाना गाठला. दवाखान्यात सर्व कुटुंब पै-पाहुणे जवळच बसले होते. दादा जवळ जाताच सर्वांचे चेहरे करुणामयी नजरेने त्यांच्याकडे पाहू लागल्यासारखे जाणवत होते. सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. हुंदका आवरत सांगत होते; चार दिवस अन्नपाणी नाही, डोळेसुद्धा उघडले नाहीत काय करावं तेच कळत नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची नीरव शांतता पसरली होती. जणू तिच्या जगण्याची आशा संपली होती आणि शेवटचे काही शब्द कानावर पडतील. ती पुन्हा एकवार सर्वांच्याकडे पाहील, बोलेल याची किंचितही आशा मनात उरली नव्हती.


सर्वांकडे एकवार पाहून दादा म्हणाले, 'काही होत नाही.' उठेल ती आता खाईल थोडंफार; काळजी करू नका आणि आवाज आला, 'शांता ये शांता काय झालंय तुला, उठ डोळे उघड थोडं खाऊन घे, दादा म्हणाला. हा आवाज कानावर पडताच शांताने शरीराची हालचाल केली, पापण्यांची हलकेच हालचाल झाली. पापण्या अलगद हळूवार उघडत शांताने समोर पाहिले. डोळ्यांच्याभोवती काळी वर्तुळ तयार झाली होती. दादाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर जशी गुलाब कळी उमलावी तसं हास्य उमललं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. डोळे उघडताच दादा म्हणाले उठून बस थोडं खाऊन घे. तिने हालचाल करताच तिच्या मानेभोवती हात घालून दादांनी अलगद उशीचा तक्का देऊन बेडवर बसवली. तसा सर्वांच्या जीवात जीव आला. वाळवंटात सूर्याच्या उष्णतेनं एखादं झाड करपत जावं आणि अचानक पाउस पडावा व त्याला टवटवी यावी तशी सर्वांच्या चेहऱ्यावर टवटवी निर्माण झाली.


दादांनी काय खाणार; फळांचा रस पिणार का? असं विचारलं तिनं होकारार्थी मान डोलवली. दादांनी आपल्या हातांनी तिला रस पाजला चहाबरोबर बिस्किटेही चारली; थोडं पोटात अन्न गेल्यावर शांता बोलू लागली. बोलताबोलता नामदेवला म्हणाली, अहो ती राखी आहे का इथे; ती द्याना इकडे. नामदेवाने राखी तिच्याकडे दिली तिच्याकडे एकवार निरखत दादाला म्हणाली हात पुढं कर; हात पुढं करताच तिने राखी दादाच्या हातात बांधली. रक्षाबंधनाचा सण जवळ आलाय परत बांधता येईल न येईल म्हणून आत्ताच बांधतेय म्हणत तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. सर्वांनाच गहिवरून आलं. आनंदाश्रूबरोबरच दुःखाचे अश्रूही वाहू लागले.     


दादा म्हणाले, तुला काही होत नाही. तू व्यवस्थित होऊन घरी येशील. अजून भरपूर दिवस तुला जगायचं आहे. मुला बाळांसाठी, कुटुंबासाठी, आम्हा सर्वांसाठी, काळजी कारु नकोस. असं म्हणताच शांता म्हणाली, दादा तू पहाटे चार वाजता येशील इकडे?

येईन की?

कसा येशील?

येईन कसाही पण येईन तुझ्यासाठी काळजी करू नकोस पण का?             

"कारण मी चार वाजेपर्यंतच आहे. बघ येता येतंय का."     

हे शब्द कानावर पडताच दादांच्या हृदयाचे ठोके वाढले. ते म्हणाले काही होत नाही तुला मी येतो सकाळी लवकर तू शांत बस पाहू. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आनंदावर विरजण पडले. बोलण्यातूनही शांताने सर्वांना अबोल केले. प्रश्नचिन्ह नजरेने पुन्हा सर्वजण एकमेकांकडे पाहात उभे राहिले. तेथील सर्व आवरून दादा रात्री उशिरा घरी परतले व झोपले; पण झोप काही केल्या लागेना सतत कानावरती तेच तेच शब्द पडत होते. उद्या पहाटे चार वाजेपर्यंत येशील ना? मी तोपर्यंतच आहे. कुशीवर कूस बदलत होती पण झोप काही केल्या लागत नव्हती. रात्री दोन वाजता उठून आवराआवर करून दादांनी दवाखान्यात जायची तयारी केली. दवाखाना गाठला.


पहाटेचे चार वाजले आणि वेळेप्रमाणे बहीण भावाला कायमची सोडून गेली. आपली कायमची आठवण देऊन. चांदीच्या राखीची. ही शेवटचीच राखी आठ्वणींचं घर काळजात कोरून ठेवून गेली कायमचीच. माणसाला मरणाची वेळ कळत नाही, असं सर्वजणच म्हणतात पण वेळ बजावून सोडून जाणारी बहीण पाहिल्यावर मात्र मरण समोर दिसतं हे वाक्य खरोखर पटतं.                                                                                 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational