चालाकी
चालाकी
संपत्तीचा मोह किती वाईट असतो.त्याचे दुष्परिणाम परिवारातील रक्ताच्या सदस्यांना कसा भोगावा लागतो. याचे हे जीवंत उदाहरण या कथेत आपल्याला बघायला मिळेल. एक संपान्न कुटुंब होते. कुटुंब प्रमुख पदवीधारी शिकलेला होता. चांगली सरकारी नौकरी मिळाली होती.चांगल्या संपन्न भाऊ नसलेल्या मुलीशी लग्न झाले होते. मुलीला भाऊ व वडिल नसल्यामुळे तीच्या हिस्याची जमिन त्याला मिळनार होती. मागे-पुढे ती त्याच गृहस्थाला सांभाळची होती. फार चतुरपणा आणी चालकी अंगात भरली असल्यामुळे त्याने ती नौकरी सोडुन सासुरवाडीच्या जवळ असणारया शाळेत नौकरी करने सुरु केले होते. आणी आपली, सासुरवाडीची शेति, सोबतच नौकरी पण सुरु होती. त्यामुळे हाती पैसाच-पैसा होता.संसार फार सुखात चालला होता. प्रकृतीच्या कृपेने परिवारात तीन मुली व दोन मुले असा खटला होता. कुटुंब प्रमुख फार चतुर असल्यामुळे त्याने आपल्या मुली व पत्नीला समाजात कसे स्वार्थी लोक जगात असतात याचे सारखे उदाहरण् देत राहत असत. जवाई म्हटले की तो फार स्वार्थी असतो.असा समज, दूरदृष्टि ठेवुन पत्नीला व मुलींना पटवुन देत असे.याच्या मागचे राजकारण वारसा हक्का मुळे पत्नी कडिल असलेली संपत्ती वर कायदाने मुलींचा पूर्ण हक्क असतो. तो कसा टाळता येईल याच प्रयत्नात गडी होता.कारण समाजात व नातेवाईकात या बद्दल चर्चा होत असे.
आता मोठी मुलगी लग्णाला आली होती. तीचे लग्न करायचे होते.मुलगा जवाई पाहने सुरु होते. मध्यस्थी गृहस्थ निरोप आणत होते. अचानक एका लग्नजोड्याचा संपर्क मुलीच्या वडिला सोबत आला.सुदैवाने त्याने एक आपल्या नात्यातील मुलगा सुचविला होता. तो लग्नजोड्या दोन्ही पार्टीचा विश्वासू होता. मुला विषयी ऐकुन ते प्रेरित झाले होते. लग्नजोड्याने प्रस्ताव दिला की आपण मुलाच्या घरी जावुन त्याच्या वडिलांची भेट घेवु. आणी ते दोघेच घरी भेटायला आले. लग्नजोड्या नात्यात असल्यामुळे ,मुलाच्या वडिलांनी सांगितले की मुलगा भोपाळ वरुन आला आहे.उद्या तो भोपळला वापस जाणार आहे. तो आज वर्धेला गेला आहे. आणी संध्याकाळी अहमदाबाद गाडिने येईल. तुम्ही मुलाला बघु शकता.
मध्यस्थी मुलाचा मावस भाऊ होता.त्यामुळे तो त्याला भेटण्याच्या निमित्याने स्टेशन वर आला होता. त्यांनी मुलाला बघीतले. व मावस भावाने उद्या तु मुलगी बघुन घे असा आग्रह केला होता.तसे वडिलांनी सहमती दिली होती. आणी नंतर मुलगी बघुन मुलगा वापस भोपाळ ला निघुन गेला होता. वडिलांना मुलाला तु इतक्या दूर पर प्रांतात एकटा राहतो.आणी मला आताच हृदयविकाराचा झटका येवुन गेला आहे. फ्क्त तुझेच लग्न करायचे राहिले आहे. मी हयात असतंनी लग्न झाले तर बरे होईल. तुला जर मुलगी पसंद असेल तर लग्न करायला काही हरक्त नाही. तुझ्या वडिल भावला पण मुलगी पसंद आली आहे. आणी मित्र पण सांगत होता कि काका मुलगी छान आहे. वडिलांचे सारखे पत्र येत होते. शेवटी मुलाने होकार दिला.आणी लग्न झाले. मुलाला केंद सरकारची नौकरी, घर-दर व शेति असल्यामुळे सासरे खुप खुश होते. दुसरे म्हणजे तो जीवन भर फिरतच राहणार होता. जवळ –पास येण्याचे काही कारण व संधी दिसत नव्हती. त्यामुळे आपल्या शेतीची चिंता करण्याचे विशेष कारण नाही.पहिले टार्गेट यशस्वी झाले होते.
दुस-या मुलीचे लग्न करण्याचे ठरविले.मुलगी सुंदर असल्यामुळे नौकरी व जमिन –जायद वाले मुले सहज मुलगी करायला होकार देत असे.पण चतुर घर प्रमुखाच्या डोक्यात काही वेगळेच चालु होते. दुसरा जावाई पाहतांना तो चांगला श्रीमंत जमिनदार बघायचे ठरविले होते .योजने प्रमाने असा योग आला. होता. घरातील व नातेवाईकांनी या संबंधाचा विरोध केल.कारण मुलगी सुंदर असल्यामुळे तीला चांगला इंजिनिअर मुलगा भेटु शकला असता. आणी ती शहरात राहिली असती. पण त्यांच्या डोक्यात काही वेगळेच चालु होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला व पत्नीला समजावले कि हे सर्वजन तु श्रीमंत घरी पडत आहे.त्यांना तुझा हेवा वाटतो.म्हणुन विरोध करित आहे. शेवटी मुलगी व आई लग्नासाठी तयार झाली. व लग्न झाले. तिस-या मुलीला पण चांगला प्राध्यापक व शेतिवाडी वाला पति मिळाला.
सासरे आपल्या योजने प्रमाणे आपले पाऊल उचलत चालले होते.ते आपल्या आखलेल्या योजनेत सफल होत चालले होते. आपल्या मुलींना आणी पत्नीला ते हे पटवुन देण्यात यशस्वी झाले कि त्यांच्या सासुला मुलगा नसल्यामुळे वडिलोपार्जित जमिन तीने आपल्या मुली दिली. आता परिस्थिति वेगळी आहे कारण तुम्हाला दोन भाऊ असल्यामुळे ती जमिन आता आमच्या कडे असायला पाहिजे. असा मुद्दा ते बरेच वेळा मोठा जवाई व इतरानं समोर अप्रत्यक्ष पध्दतीने ठेवण्याचा प्रयत्न करितं असे.
मोठा जावई हा सामंतवादी विचारधारा विरोधी व समानतेचा पक्षधर होता. त्यामुळे त्याने कधी त्यांचा विचाराचे समर्थन केले नाही. त्याला पण एक मुलगी व एक मुलगा होता. त्याकडे पण सिमित जमिन होती. नौकरी मुळे तो त्याकडे लक्ष्य देत नव्हता. पण नियमा प्रमाने संपूर्ण वडिलोपार्जित मालमत्ते वर सर्वांचा समान अधिकार असतो. कमित- कमि त्यांनी आपल्या सगळ्या नातिंना कायदा प्रमाने पूर्ण जमिन न देता काही तरी आपल्या नातीना त्यांच्या भविष्याचा विचार करुन, मन मोठे करुन दिले पाहिजे असे मोठ्या जवायाचे ठाम मत होते.कोणाच्या जीवणात केव्हा काय उथल-पुथल होईल हे सांगता येत नाही. शेवटी अचल संपत्ती साथ देते.
मधल्या मुलीचे सासरे चौविस तास अंग्रेजी दारु पिवुन राहत होते. ते चैन स्मोकर होते. अपार संपती असल्यामुळे फारसा फरक पडत नव्हता. नंतर त्यांचया दुस-या मुलाचे लग्न झाले. म्हणतात कि त्याचे शेजारच्या मुली बरोबर प्रेम होते.पण कुटुंबियानां तो संबंध पसंद नव्हता. त्यामुळे त्याचे लग्न दुस-या ठिकाणी ईच्छे विरुध्द करण्यात आले होते. पण नंतर त्याला पण दारुचे व अन्य नशिले पदार्थांची लत लागली. लतेचे प्रमाण इतके वाढले की शेवटी त्याने आत्महत्या केली. त्याला एक मुलगा पण होता.काही काळा नंतर दारु व सिगारेटच्या वाढत्या प्रमाणे तीचे सासरे पण मरण पावले. मध्यंतरीच्या काळ्यात तिला एक मुलगी झाली.पण दुरदैवाने ती स्वस्थ नव्हती. तीच्या हृदयाला शुध्द व अशुध्द रक्ताचे सयुक्त एकच कप्पा होता. त्यामुळे ती नेहमीच आजारी असायची. डॉकटरांनी सांगितले की जसे- जसे तीचे वय वाढेल तसे- तसे तीचा त्रास वाढत जाईल. आणी त्यामुळे तीचा वाढत्या वया सोबतच मृत्युची शक्यता वाढेल. नंतर तीला एक स्वस्थ मुलगी व मुलगा झाला. पण तीच्या पतिला तीव्र हृदयविकाराचा झटका आला.
तिच्या कठीण परिश्रमामुळे व इंतरांच्या मदतीमुळे ते संकट तेव्हा टळले. लहान पणी चुकिच्या मित्रमंडळीच्या संगतिने तीच्या पतिला सिगारेटची संगत लागली होती. तीचे सासरे सारखे सिगारेट ओढत असल्यामुळे हानिकारक वातावरणात त्याची वाढ झाली होती आणी त्यालापण सिगारेट ओढण्याची सवय असल्यामुळे हृदया वर त्याचा वाईट परिणाम झाला असवा. प्रथम हृदयविकाराच्या झटक्या नंतर त्याने सिगारेटचा त्याग केला.तरी त्या नंतर आल्यालेल्या हृदयविकाराच्या झटक्याने अवघ्या लग्नाच्या चौदा वर्षा नंतर मृत्यु झाल.आता घरात कोणी पुरुष उरला नव्हता. त्यामुळे विशेष चिंतेचा विषय होता. आता समोर ऐवढी शेति कोण आणी कसी बघणार कारण मुले लहान होती.या प्रसंगी सर्वात दोषी असणारे मुलीचे वडिल कोणाशी नजर मिळू शकत नव्हते. त्यांची मुलगी या सर्व घडामोडी साठी स्वतः वडिलांना दोषि मानत होती. त्यांना आपली चूक झाली हे कळले तरी त्यांनी मी चुकलो असे सार्वजनिक उदगार कधी जवळच्या लोकांन पाशी काढले नाही. हादसे कोणाही सोबत होवु शकतात. आपण काही गोष्टि जर मुदामुन केल्या तर त्याच्यामुळे आपल्याच मुला-मुलींचे जीवन धोक्यात पडते.
मुलाना वाईट संगत लागु नये म्हणुन त्या दोघींनी नागपुरला मुलांना शिक्षणासाठी ठेवण्याचे ठरविले होते. त्यांचा नागपुरला पण एक सिविल लाईन मध्ये फ्लाट होता. कधी काकु तर कधी आई व आजी सोबत राहत असे. जसे- जसे तीचे मोठ्यामुलीचे वय वाढत चालले होते. तसा- तसा तिच्या म्रुत्युचा धोका वाढ्त चालला होता.शेवटी वयाच्या बाराव्या वर्षी तीचा मृत्यु झाला. काही काळ्या नंतर लगेच आजीला कँन्सर झला , अडचनी काही पिछा सोडत नव्हत्याच.बरेच दिवासाच्या आजार पणा नंतर आजी पण मरण पावली होती. लगेच तीच्या नंदेने नागपुरचा फ्लाट आम्हाला देवुन टाका असी मागणी धरली.कदाचीत आजीने असे आश्वासन दिले असावे. वहिनी व नंदेचे संबंध फारच वाईट झाले.एक तीचा सासरचा आधार होता तो पन टुटला होता.शेवटी काही वाटा-घाटी करुन समस्याचे निवारन झाले.
त्या नंतर तीच्या वडिलांचा पण दीर्घ आजारामुळे मृत्यु झाला.कदाचित आपण केलेल्या चुकिचे ते स्वतः आत्मचिंतन करत असावे, त्याची खंत त्यांना मानसिक त्रास देत असावी.पण आपण चुकलो असे मान्य करण्याची त्यांनी तयारी केली नाही. त्यामुळे ते आजार पणा मुळे सारखे अशकत होत गेले.पण त्यांनी आपला स्वार्थ सोडला नाही. शेवट पर्यंत त्यांनी मोठे मन करुन आपल्या मुलींना काही दिले नाही. समाजात जी चुकिची मुला-मुली मध्ये भेद-भाव करण्याची मानसिकता आहे ती कायदाने संपणार नाही.या साठी तसे लहान पणा पासुन मुलां-मुली वर संस्कार करने आवश्यक आहे. कथेतील घर प्रमुख एक शिक्षक असुन असे करु शकला नाही. जेव्हा त्या व्यक्तिने प्राण त्यागले, तेव्हा तो या जगातुन काही सोडुन जाण्याच्या अवस्थेत नव्हता.मेला नंतर त्यांची जमा करुन असलेले हात-पाय मृत्यु नंतर सरळ करावे लागले. जे झाले ते चांगले झाले नाही. त्यांचा मृत्युमुळे जो काही नैतिक मानसिक आधार थोडा फार होता. तो पण तीचा सामाप्त झाला होता.
मुले-मुली आता बरेच मोठी झाली होती. पुतण्याला एक आधुनिक व सर्व सोईयुक्त गॅरेज लावून दिले आहे. तिचा मुलगा आपली शेती बघतो. आत्या मागच्याच वर्षी तिने आपल्या पुतण्याचे लग्न केले. सध्या तिच्या मुलाला कोरोना झाला व तो त्यातुन बरा झाला. तिला व तिच्या जावूसोबत एकामागे एक सारखी संकट येत गेली. त्या दोघीही संकटाला सारख्या मात देत आल्या आहे. हे सगळ बघता आपण हे नक्कीच म्हणू शकतो की त्या दोघीही मुलांच्या सुपरमॉम आहे.
