STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational Others

2  

Vasudha Naik

Inspirational Others

बोलक्या भिंती

बोलक्या भिंती

1 min
19.5K


जून मध्ये शाळेच्या नवीन वर्षाला सुरूवात होते. मुले नवीन, वर्ग नवीन, शिक्षक नवीन.

मुलांना वाटते बाई कशा असतील? बाईंना वाटते मुले कशी असतील?

दोघेही उत्सुक असतात. वर्गात जातात,ओळख होते. मुलांची नावे विचारून घेतली जातात. शिक्षक आपली ओळख करून देतात.

आता वर्गअध्यापन,अध्ययन प्रक्रिया. जर भिंती बोलक्या असतील तर........

अध्यापनात खूप फरक पडतो. ज्ञानरचनावादी शिक्षणप्रक्रियेत बोलक्या भिंतीना फार महत्त्व आहे.

भिंतींवर छोट्या गोष्टींची चित्रमय कथा असावी. पाढे लेखन असावे. नकाशा असावा. तालुका, जिल्हे यांची नावे असावीत. कविता असाव्यात. शब्दभांडार असावे. जेणेकरून विद्यार्थी लक्ष देऊन त्याचे वाचन करेन आणि हसत खेळत मुले अध्ययन करतील.

बोलक्या भिंतीमुळे शिक्षकाचे बोलण्याचे कामही कमी होते. मुलांच्या नजरेसमोर सतत एखादी गोष्ट असेल तर त्यांच्याही नकळत काही अभ्यास सुखकर होतो.

भिंतीवर स्वतः तयार केलेले चार्ट पण लावू शकतो. विविध रंगसंगतीचा वापर करून केलेले साहित्य प्रभावी ठरते व सत्रानुसार त्याचा अध्यापनात वापर होतो.

"असतील बोलक्या भिंती शाळेत,तर मुले होतील हुशार आपल्याही नकळत...."

प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांनी बोलक्या भिंतींचा वापर करावा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational