Rutuja Vairagadkar

Romance

4  

Rutuja Vairagadkar

Romance

बोचणारा पाऊस भाग 2

बोचणारा पाऊस भाग 2

5 mins
403


बोचणारा पाऊस...भाग 2

आधीच्या भागात आपण पाहिले की,

अभिज्ञा आणि आर्यन कॉलेजमध्ये एकत्र होते, त्यांनतर एकाच कंपनीत जॉबला होते. आर्यनने अभिज्ञाला लग्नाची मागणी घातली, अभिज्ञाने नकार दिला पण आर्यन अडूनच होता, अभिज्ञाने होकार दिला, दोघांचं लग्न झालं, फिरायला गेले. ऑफिस जॉईन केलं,दोघेही सोबत जायचे- यायचे. एका रात्री त्यांच्या गाडीचा अक्सिडेंट झाला. अभिज्ञाला शुध्द आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती, आर्यन बद्दल विचारलं तर कुणालाच काही माहीत नव्हतं.

आता पुढे,


“अभिज्ञा रडत बसली होती, तितक्यात तिथे नर्स आली.


“मॅडम तुम्हाला डिस्चार्ज मिळालाय, तुम्ही आता जाऊ शकता.”


अभिज्ञाने इकडेतिकडे बघितलं, त्यानंतर खिडकीतून बाहेर बघितलं, तिला बाहेर अंधार दिसला.


“सिस्टर किती वाजलेत?”


“मॅडम आठ वाजलेत.”


“सिस्टर उद्या सकाळी गेले तर चालेल का? आता रात्र खूप झाली आहे आणि मी एकटीच आहे.”


“सॉरी मॅडम पण तुम्हाला बेड खाली करावा लागेल.”

अभिज्ञाने होकारार्थी मान हलवली आणि ती तिथून निघाली.

अभिज्ञा हॉस्पिटलच्या बाहेर पडली, पर्समध्ये पैसे चेक केले. 

ऑटो मिळेल या आशेने रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली. 

बराच वेळ झाला, तिला ऑटो मिळत नव्हता. तिला थकवा जाणवत होता. कसाबसा एक ऑटो येताना दिसला, अभिज्ञा त्या ऑटोसमोर जाऊन उभी राहिली, त्याने लगेच ब्रेक लावला.


“ओ मॅडम मरायचं आहे का?”

“नाही दादा, बराच वेळ झाला मी उभी आहे, ऑटो मिळत नव्हता म्हणून.”

“ठीक आहे, ठीक आहे बसा.”


अभिज्ञा ऑटोमध्ये बसली, काही वेळानंतर ती तिच्या घरी पोहोचली.

गेटजवळ उतरली. अभिज्ञामध्ये चालण्याचही त्राण उरलेलं नव्हतं. 

कशीबशी दारात पोहोचली. ते सासुच लक्ष गेलं.

ती उंबरठा ओलांडणार तीच सासू ओरडली.


“कलमूहिनी खबरदार, एक पाऊल समोर टाकलस तर याद राख. माझ्या मुलाला गिळलंस, आता इथे काय करायला आलीस?”

त्यांचं बोलणं ऐकून अभिज्ञाला धक्काच बसला.

“आई, अहो काय बोलताय तुम्ही? जे काही घडलं तो एक अपघात होता, त्यात माझी काहीच चूक नाही.” 


“चालती हो, चालती हो माझ्या घरातून, एक पाऊलही समोर टाकायचा नाही.” असं म्हणत अभिज्ञाच्या सासूने तिला ढकललं आणि दार लावून घेतला.


अभिज्ञा उठली,दारावर थापा मारू लागली.

“आई असं करू नका, मला आत घ्या आई. इतक्या रात्री मी कुठे जाऊ. आई बाबा ही नाहीत.”


“जा मर कुठेही जाऊन.” आतून आवाज आला.

हे ऐकून अभिज्ञा सुन्न झाली.

ती तिथून बाहेर पडली, आता बऱ्यापैकी रात्र झाली होती, हवेत गारवा आलेला होता. थंड वारा तिच्या शरीराला भेदून जात होता. ढग दाटलेले होते. अभिज्ञा रडत रडत बेभान होऊन चालत सुटली.

तिचे दुःख ढगांना बघवलं नसावं म्हणून तिच्या सोबतीला तो ही आला. ओलिचिंब झालेली अभिज्ञा रस्त्याच्या कडेला एका टपरी जवळ बसली.

बराच वेळ ती रडत बसली होती, काही वेळाने रस्त्यावरून एक गाडी जाताना दिसली, ती गाडी सुसाट समोर गेली आणि काही क्षणात पुन्हा मागे आली. 

गाडीवरून एक तरुण उतरला. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तो त्या दिशेने पाऊल टाकत होता.


अभिज्ञाच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला तशी दचकून ती उभी झाली.


समोरच्या चेहऱ्याकडे बघून ती घाबरली.

“घाबरू नका, तुम्ही अडचणीत आहात का? तुम्हाला मदत हवी आहे का? हे बघा, मी इथून जात होतो तेव्हा अचानक माझं तुमच्याकडे लक्ष गेलं. कोण आहे बघावं म्हणून मी तिथून माघारी आलो. मीच बोलतोय तुम्ही काही बोलतच नाही आहात.”

“मी,ते ते ते मी.” अभिज्ञाला काय बोलावं कळत नव्हतं.

“इट्स ओके.. तुम्हाला काही सांगायचं नसेल तर ठीक आहे पण मला वाटत आता या वेळी तुम्ही इथे असणं योग्य नाही. तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. नाही म्हणजे रात्र खूप झाली आहे म्हणून म्हणतोय.”

अभिज्ञाने काहीही न बोलता होकारार्थी मान हलवली. तिच्याकडे सध्या दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. 


ती त्याच्या गाडीत बसली. गाडी सुसाट सुटली. गाडीच्या स्पीडमुळे अभिज्ञाला तो एक्सीडेंट आठवला आणि ती कानाला हात लावून जोरात किंचाळली.

ती किंचाळताच त्याने गाडी थांबवली.

“काय झालं? तुम्ही असे का किंचाळलात?”


अभिज्ञाने जोरजोरात श्वास घेतला, बाजूला ठेवलेल्या बॉटलचं पाणी प्यायली.

“मी ठीक आहे, तुम्ही चला.”

गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर येऊन थांबली.

दोघेही उतरले, आता गेले. आत कुणीही नव्हतं.

अभिज्ञाने संपूर्ण बंगल्यावर नजर फिरवली. बंगला अगदी निर्जन होता. 

त्याने तिच्यासाठी टॉवेल आणला,

“तुम्ही केस पुसून घ्या. मी चहा आणतो.”

“एक्सक्युज मी, तुमचं नाव?”


“अरेच्या मी नाव तर सांगितलंच नाही, 

हाय मी अभिराज.” त्याने हात समोर केला.


“हाय मी अभिज्ञा.”

अभिज्ञाने त्याच्या हातातलं टॉवेल घेतला आणि केस पुसू लागली.

काही वेळाने तो कॉफी घेऊन आला.

“गरमागरम कॉफी.”

“थँक यु. घरी कुणीच दिसत नाही आहे.”


“नाही सगळे बाहेरगावी गेलेत.”

“ओह.”

दोघांनी कॉफी घेतली.

“तुम्ही वरच्या खोलीत आराम करा, मी इथे खाली थांबतो.”


“नाही नको, मी इथे बरी आहे.”


अभिज्ञा थोडी अवघडली.

ती सोफ्यावर लेटली. आणि तिला झोप लागली.

सकाळी, तिला त्याच्या हाकेने ती उठली.

“गुडमॉर्निंग अभिज्ञा.”

तिने हलकं स्मितहास्य दिलं.

“मी तुम्हाला काही विचारू शकतो का?” 

तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला.

“नाही म्हणजे इतक्या पावसात भिजत बसलेल्या होत्या म्हणून विचारलं.”

अभिज्ञा गप्पच होती.

“इट्स ओके, तुम्हाला नसेल सांगायचं तर ठीक आहे. आणि हो माझं सांगायचं राहून गेलं तुमचा फोन वाजत होता.”


तिने लगेच मोबाईल चेक केला तर तिच्या आईचा फोन येऊन गेलेला पण तिला आता कुणाशीही बोलायची इच्छा नव्हती.

 बराच वेळ ती खिडकीत बसून होती.

अभिराज बाहेर जाऊन आला.

“अभिज्ञा तुमच्यासाठी कपडे आणलेत, तुम्ही फ्रेश होऊन जा.”

अभिज्ञा फ्रेश झाली.


“मी निघते आता आणि थँक यु, तुम्ही माझी खूप मदत केलीत.”


“कुठे जाणार आहात.”

ती काहीही न बोलता तिथून निघाली.

त्यांनतर अभिज्ञा तिच्या मैत्रिणीकडे राहू लागली, तिने जॉब चेंज केला. हळूहळू ती सावरायला लागली. अध्येमध्ये अभिराज तिला फोन करायचा. तिच्याशी बोलायचा. तिलाही त्याच्याशी बोलून थोडं रिलॅक्स फिल व्हायचं. कधीतरी त्यांची भेटही होत असे. 

हळूहळू त्यांच्यात मैत्री व्हायला लागली. अभिराज रोज तिला भेटायला लागला.

एक दिवस अभिज्ञा ऑफिसला गेलीच नव्हती, अभिराज तिला फोन न करताच तिच्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा कळलं की ती आलीच नाही, तो लगेच तिच्या रूमवर गेला.

बघतो तर काय अभिज्ञा तापाने झोपली होती, तो लगेच तिला हॉस्पिटलला घेऊन गेला. जवळ जवळ पंधरा दिवस अभिज्ञा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती टायफाईडचा ताप उतरत नव्हता. या काळात पूर्णतः तिची काळजी घेणारा फक्त अभिराज होता. घरी आल्यानंतरही चोवीस तास तिची काळजी घ्यायचा. 


“अभिज्ञा उठून बस, सूप आणलंय.”

“का करतोस इतकं माझ्यासाठी?”


“माहीत नाही.” असं म्हणत त्याने खिडकी उघडली, तसा वारा आत आला. अभिज्ञाचे केस उडून तिच्या चेहऱ्यावर येऊ लागले. 

अभिराजने हळुवार अलगद तिच्या गालावरच्या बटा बाजूला केल्या. त्याच्या स्पर्शाने तिला शहारलं. त्याचे हात तिच्या गालावर रेंगाळायला लागले.

बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली.

त्याने लगेच खिडकी बंद केली.

त्याने सुपचा चमच तिच्या तोंडाजवळ नेला. दोघांची नजरानजर झाली.


गोड आवाजात गाणं सुरू झालं.

“तू मला मी तुला

गुणगुनु लागलो, पांघरु लागलो

सावरू लागलो

नाही कळले कधी..

नाही कळले कधी

जीव वेडावला

ओळखू लागलो

तू मला मी तुला

नाही कळले कधी..

गुढ हुरहूर ही

श्वास गंधावला

ओळखू लागलो

तू मला मी तुला

नाही कळले कधी...


क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance