बिन साखरेचा पुडा
बिन साखरेचा पुडा
दोन दिवसावर मानसीचा साखर पुडा होता तयारी जय्यत तयारी चालू होती जो जो तो तयारीत मग्न होता. डेकोरेशन पासून कॅटरिंग पर्यंत ची मोठी लिस्ट होती घरात हि नातेवाईक ची गडबड चालू होती नवरीबाई आपल्या पेहराव्यात आणि मेकअप च्या गोष्टीत बिझी होती थोडक्यात काय तर सोहळा चांगला पार पाडावा ही धडपड
साखरपुडयाचा दिवशी घर सजावटीने सजून गेलं होत
"अगं सुमे मानसी कुठे आहे तिची साडी वैगरे आताच काढून ठेव उगीच गोधळ नको "?
"अहो आई मानसी बाहेर गेली आहे "
"बाहेर? अगं आज साखर पुडा आणि बाहेर गेली "
"अहो ती ब्युटी पारलौर मध्ये गेली आहे येताना लेहंगा पण टेलर कडून आणणार आहे "
"म्हणजे ती साडी नाही नेसणारं "
"नाही आज कालची फॅशन आहे ना मग काय करणार "
"काय आज कालच्या मुली आमच्या वेळी कुठे होते ब्युटी पारलौर कि कुठे लेहंगा"
"अगं आई काळ बदला चल सुमा आपली तयारी करूया "
सगळी तयारी झाली होती घर गजबजले होते नवरी बाई पण मस्त नटली होती मोररूपी साखरेचा पुडा हि शोभत होता.. नवरे मंडळी आली नवरा मुलगा सुमित हि शेरवान्वीत उठून दिसत होता सगळेच मस्त जोडी आहे, असेच म्हणत होते. फोटोग्राफर ने फोटो शूट सुरु केले दोघाचे मस्त फोटो त्याने टिपले मानसीच्या चेहऱ्यावर आंनद ओसंडून वाहत होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकांत बुडलेले स्पष्ट दिसत होते.
कोणी तरी व्यसकर आजी ने आवाज "चला साखर पुड्याच्या रीती चालू करा "
मानसीच्या सासर कडून साडी आणि नारळाने आणि इतर वस्तुंनी तिची ओटी भरली केली फुलाची एक माळ हि मानसीच्या माथी शोभली.
सासरची साडी नेसून परत मानसी आली तर टेबलावर मोर रूपी पुडा आणि देवमासाच्या रूपाचा पुडा शोभा वाढवत होते
सुमित ने मानसीला रिंग घातली
मानसीने सुमितला रिंग घातली
टाळयांचा कडकडाट झाला
सुमितने मोर रूपी पुडा तर मानसी ने देवमासा पूडा हातात धरला.
सुमितने मोराची चोच वाकडी केली पण त्यातून साखर काही पडेना सगळेच एकामेकाकडे पाहू लागले. परिस्थिती सांभाळण्यासाठी मानसीने देवमासाचे तोंड वाकडे केले, त्यातून हि साखर पडली नाही.
कोणी तरी मग घरातून प्लेट मधून साखर आणली आणि ती साखर पुडयाची ती रीत संपन्न केली.
दोन्ही बाजूनी लक्षात आले सगळ्या गाजावाजात पुड्यात साखर भरायला मात्र विसरले.
मोर रूपी सुबक आणि पाणी दार अशी देवमासाचा पुडा सभारंभाला उठून दिसत होता मात्र साखरेचा पुडा बिन साखरेचा निघाला.
