arun gode

Inspirational

3  

arun gode

Inspirational

बिहारी मित्र

बिहारी मित्र

7 mins
295


     विज्ञान स्नातकची पदवी जे.बी.सायंस कॉलेज वर्धा मधुन पूर्ण केल्यानंतर विज्ञान पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मी विज्ञान संस्थान, नागपुर मधे दाखला घेतला होता. सुरुवातीला माझ्या सोबत जे माझे विज्ञान स्नातकचे मित्रा यांच्या पैकी कोणी पण माझ्या सोबत नव्हते. सर्व मित्र हे नविन असल्यामुळे थोडे से मन उदास होते. काही दिवसा नंतर माझी एक वर्गमैत्रीन पण आली. त्यामुळे थोडे बरे वाटले. ती जे. बी. सायंस कॉलेज वर्धाला व्दितीय वर्षा पासुन सोबत होती. त्या प्रचलित काळा प्रमाने आमची कधी-काळी बोल-चाल व्हायची. पण विज्ञान पदव्युत्तर शिक्षणासाठी जेव्हा तीने विज्ञान संस्थान, नागपुर मधे दाखला घेतला होता. तेव्हा मी तीच्या संपर्कात आलो नव्हतो. त्यामुळे ती जेव्हा माझे कडे माझे लक्ष्य नसतांना स्वतः बोलायला आली होती. तेव्हा मी एकदम हक्का –बक्का झालो होतो.


ती रुपाने फार गौरीपान असल्यामुळे, तीचे सर्वांच्या डोळ्यात सौंदर्य भरण्या सारखे होते. जेव्हा ती माझ्या सोबत हसून- हसून बोलत असे तेव्हा कदाचित वर्गमित्रांची झोप नक्कीच उडत असावी. माझी जे. बी.सायंस कॉलेज वर्धा मध्ये एक विशेष ओळख होती की मी मुलीन सोबत सामान्यता बोलचल करित नसो. जो पर्यंत कोणचीही मुलगी माझ्यासी स्वतः बोलत नव्हती तो पर्यंत. मी मुलीन सोबत बोलण्याचे टाळत असो. त्यामुळे बरेच मुलींना भ्रम होता कि माझे कोण्या मुली सोबत प्रेम संबंध असावे किंवा माझा प्रेमभंग झाला असावा.पण त्यांना जशी-जशी माहिती झाली, हा त्यांचा भ्रम दूर होत गेला होता. माझी आर्थीक परिस्थिति वडिलांना पेशन न मिळत असल्यामुळे फार चांगली नव्हती. माझ्या वडिल भावांचे लग्न झालेले होते. त्यामुळे त्यांचा स्वतःचा परिवार होता.त्यामुळे ते शक्य तितकीच मदत करायचे. वडिलांची इच्छा होती कि मी स्नातकची पदवी मिळाल्या नंतर, नौकरी वैगरे करुन लगेच आत्मनिर्भर व्हावे. घरातील ही समस्या असल्यामुळे एका नवजवान मध्ये जो जवानीचा जोश असतो. तो कुठे तरी दडी मारुन बसला होता. त्यामुळे अन्य मुलाप्रमाने मी जास्त फालतु कामा मध्ये सक्रिय राहत नव्हतो.


    आमच्या वर्गातल्या मुलींनी शेवटच्या वर्षि संक्राति निमित्याने तिळगुळाचा कार्यक्रम करण्याचे ठरविले होते. त्या पूर्ण तयारीने आल्या होत्या. आम्ही

काही मुले एका बाजुने उभे पाहुन त्यांचा झुंड आमच्या दिशेने वाटचाल करित आमच्या पर्यंत पोहचला होता. आम्ही सर्वांनी स्वतःला सावरुन कुतुहुलाने त्यांच्या कडे सर्वजन स्मित करत होतो.त्यांनी आमच्या कडे ,कॉलेजच्या मागच्या पटांगणात तिळ-गुळ चा कार्यक्रम करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला सगळ्यांनी एकमताने होकार दिला. एक मित्र म्हणाला या पुढे तुम्ही सगळ्या आमच्या सोबत गोड- गोड बोलणार. त्यावर त्या म्हणाल्या आम्ही तर नेहमीच गोड बोलतो. पण अरुण त्याचे आडनांव गोडे असुन गोड बोलने तर सोडुन द्या. थोडा-फार पण बोलत नसतो. आम्ही बोललो कि फक्त नेमक कामाच बोलतो. एक्जण गंमत करत म्हाणाला बरेच जण आपल्या नावा प्रमाने नसतात. सगळे जन हासयला लागले. मग मी गंमत करत म्हणालो तिळ-गुळ घेतल्यावर नांव घ्यावे लागेल. सर्वजन पेचात पडले. आता हा कोणाचे नांव घेणार?. मुला-मुली मध्ये कुतुहुल निर्माण झाले होते.


आमचा झुंड ठरवलेल्या जागेकडे कुच करत होता.माझे मित्र माझ्या सोबत झेडकाणी करत, एका- एका मुलीचे नांव घेत होते तीच्या कडे बघत असे. मुलीन मध्ये पण अशाच प्रकारची चुळबुळ चालली होती.शेवटी आम्ही सर्वजन एका जागी एका-मेका समोर बसलो. काही वर्गात गायक व जोकर पण होते. त्यांचा वापर या कार्यक्रमाला यादगार बनावण्या साठी करण्याचे मी ठरविले होते. त्यांना प्रेरित केले. एका मुलाने आणी एका मुलीने माझ्या आग्रहामुळे फार सुंदर गाणे म्हटले. मी कार्यक्र्माचे संचालन करता- करता मध्ये-मध्ये विनोद करत असो.त्यामुळे वातावरण एकदम खुपच रोमांटिक झाले होते. शेवटी तिळ-गुळ वाटन्याची वेळ येवुन ठेपली. सर्वानी मला नांव घेण्यासाठी बाध्य केले होते.त्या सर्वांच्या भावनांचा आदर करित मी नांव घेणे सुरु केले. “संक्रातीचे तीळ-ग़ुळ खातो समजुन खाऊ,मला नाही बायको, तर मी नांव कोणाचे घेवू.


हे उखाने म्हटल्यानंतर सगळेच खुश झाले होते. तेव्हा एक मित्र गंमत करित म्हणाला ,त्यासाठी पोरगी पटवावी लागते. तीच्या प्रेमात पडावे लागते.तेव्हा बायको मिळते. उत्तर देतांना मी एक शेर म्हटला. हर दिल में एक आस होती है. एक आस एक राज होती है. नहीं अभी मुनकिन ताजमहल बनाना,लेकिन ये सच की हर दिल में एक मुमताज होती है. पुन्हा एका मित्राने कॉमेंट्स करतांना म्हटले, जॉनी जरा उसका नाम तो बता. मी विषय बदलविण्या साठी भाष्य केले.वक्त से पहिले अगर मुमताज ढूंढी तो बिना ताजमहल के मुमताज मुहताज हो जाती है.फिर लैला-मजनु की कहाणी दोहराती है. इसलिए पहिले मैं ताजमहल बनाऊंगा फिर मुमताज ढूंढूगां ! फिर हम सब अंतिम परिक्षा के बाद बिछड गये थे. फक्त जुन्या पैकी रोहणी माझा सोबत शिकत होती. तीच्या मनात काय होते, हे मी कधी समजुन घेण्याचा प्रयत्न केला नाही. कधी-कधी वर्गमित्र म्हणुन आम्ही एक-मेकाशी बोलत असो.याचे निरखुन परिक्षण माझा वसतिगृहातील बिहारी मित्र मोहनसिंग करित असे.तो मध्ये-मध्ये मला तीच्या विषयी बोलत असे. मी ते गंमतवर नेत होते.


      त्याने एक दिवस आपल्या लग्नाची खुश-खबरी मला सांगितली. हे ऐकुन मला धक्का बसला. मी त्याला म्हटले अरे अभी तो पढ रहे है. आप को अभी कोई जॉब नहीं मिला है.फिर भी आप की शादी हो रही है. ससुरालवाले आपको बिना जॉब के लडकी देने को कैसे तैयार हो गये है? अरे भाई, होनेवाली भाभी से पुराणा कोई लफडा है क्या ?. नहीं हमारे यहा ऐसेही शादी हो जाती है. बिहार में तो स्नातक और स्नातकोतर के लिए कई साल लग जाते है. वहा हमेशा दंगा-फसाद, बंद चलता रहता है.उसके कारण वहा नियमित परिक्षायें होती ही नहीं है. इसलिए मैं इधर पढने आया. इधर से डीग्रीयां लेकर जाने पर, उधार जॉब ही जॉब मिलेगें. फिर प्रथम वर्ष की परिक्षायें खत्म होने पर, मेरा मित्र दुल्हा बनने सासारम बिहार में चला गया था.उसने शादी में आनेका न्योता भी भेजा था. आर्थीक कारनामुळे मी जाण्याचे टाळले. फक्त एक औपचारिकता म्हणुन बधाई संदेश पाठवला होता.


   व्दितीय वर्षाचा अभ्याक्रम पुन्हा सुरु झाला. आम्हा दोघांनाही एटीकेटी आली होती. त्यामुळे प्रथम वर्षाचे सर्व विषय काढने आवश्यक होते. मोहनसिंग के प्रथम वर्ष का प्रतिश्त थोडा कम आया था. इसलिए उसने एक की जगह दो विषय लेने का निश्चय किया था. मला कोणत्या ही परिस्थिति मध्ये यावर्षि नौकरी लागने आवश्यक होते. कारण प्रथ्म वर्षाचा खर्च मोठ्या भावांनी केला आणी व्दितीय वर्षाचा माझा पेक्षा मोठा भाऊ करित होता. याच्यापुढे ते बहुतेक मला आर्थीक मदत करणार नाही असे वडिल वारंमवार सांगत असे. त्यामुळे नौकरी बघने नित्यांत जरुरी होते. त्यामुळे माझे लक्ष्य अभ्यासात कमी आणी नौकरी शोधण्यात जास्त होते.


    इकडे माझ्या मित्राचीही परिस्थिति बदलली होती. त्याला घरुन येणार पैसे बंद झाले होते. त्यामुळे तो फार चिंतित होता. कधी- कधी तो म्हणायंचा तुझे सब बाते कभी बताऊंगा. कसे तरी तो दिवस काढ्त होता. जेव्हा कधी थोडी मदत त्याला आवश्यक असे मी करत असो. मेसवाला बिहारी असल्यामुळे त्याच्या पैसाचा समस्या नव्हती. शेवटी अंतिम परिक्षा झाल्या बरोबर मला नागपुरातच सरकारी नौकरी मिळाली होती.मोहनसिंगच्या घरच्या परिस्थितिमूळे तो फार मेहनत करुन ही प्रथम व व्दितीय वर्षाचे काही राहिले विषय काढू शकला नाही. शेवटी त्याने बी.एड.साठी दाखला घेतला. व माझ्याकडून आर्थिक मदत मागत होता. तेव्हा मी त्याच्या शिक्षणाला मदत केली होती. जेव्हा तो बी.एडची परीक्षा देवून परत जात होता. तेव्हा तो मला भेटायला आला. मी केलेल्या मदती साठी आभार व्यक्त करत होता.शेवटी मी त्याला विचारले अर मोहन तुम्हारे पास जाने को पैसा है की नहीं ? हे विचारल्या वर त्याच्या डोळ्यातुन अश्रु निघाले होते. उसने कहा घर से पैसे आयें है. चिंता की कोई बात नहीं है. मैं तेरे पैसे लौटाने और तुझसे जाने के पहिले मिलने आया हूं. अब परिणाम आने पर ही आऊंगा. और सब डिग्रीयां गले में लटाका के बिहर लौट जाऊंगा. त्याने पूर्ण हिशोब लिहून ठेवला होता. आणी मग त्याने मला त्या काळात जवळ-जवळ बाराशे रुपये वापस केले होते. ऐवढे पैसे पाहुन मी त्याला म्हटले अरे तु क्या ब्याज के साथ लौटा रहा है क्या.? अबे मै तुझे बनीया लगता हूं क्या ?. दोस्ती के नाम पर कालिक पोतेगा क्या? इतने सवालों की छडी लगाने पर, फिर उसने कहा अरे ये आपका मूल है. ब्याज तो दुबारा मिलने पर दुगां ! वो पैसे उसने मेरे हाथ में थमायें. उस में से 200 रुपये मैंने उसे भाभी के लिए मेरे तरफ से तोफा देने के लिए दिये. मै तेरे शादी में नहीं आ सका. इसलिए अभी दे रहा हूं.


   वैसे बिहारीयों के बारे में आम देशवासियों में कुछ अच्छा विचार नहीं है. कुछ गिने-चुने बिहारीयों ने आम बिहारियों की साख खराब की है. लेकिन ये मेरा बिहारी दोस्त बहुत ही सुलझा हुआं इंसान था. जिसने नई जगह बिना पैसे से लग-भग एक-दोन वर्ष निकाले. कदाचित त्याच्या जागी जर विदर्भातला माणुस अस्ता तर टिकला नसता. कठीण परिस्थिति वर मात करने हे बिहारी लोकांपासून शिकावे.


     निरोप घेताना तो सारखा म्हणत होता, मी पुन्हा आलो म्हणजे भेटू. तुझ्या सोबत खूप काही बोलायचे व काही सांगायचे आहे. नंतर माझी बदली भोपाळला झाली. तो कदाचित भेटायला आला असवा. तो आलाच होता. जेव्हा मी नागपूरला कार्यालयत गेलो होतो. तेव्हा त्याच्या विषयी काही सहयोगी बोलत होते. पण भेट होऊ शकली नाही. ते गाणे मला अजुन ही आठवते. अभी मत कहो अलविदा मेरे दोस्त. न जाने किसी मोड पर फिर मुलाखत हो. आज ही त्या क्षणाची मी सारखी वाट पाहत बसलो आहो. मोहन आणि रोहिणीची कधी तरी भेट होईल. कदाचित ती, मी केव्हा ताजमहल बनवतो याची वाट बघत असावी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational