भयानक रात्र
भयानक रात्र


वर्ष 1990 चा अनुभव आहे आमचे कुटुंब टिटवाळा येथे वास्तव्यात होते त्यावेळेस टिटवाळा हा पूर्णतः ग्रामीण भाग होता त्यामुळे सभोताल झाडी-झुडपे मोठ्या प्रमाणात होती जणू जंगलच वाटत असे त्यात वीज खंडीतच प्रमाण खूपच होते. सायंकाळी टिटवाळा रेल्वे स्टेशन ते गणपती मंदिरा पर्यंत चालत येणे खूप भीतीदायक होते.ग्रामीण भाग असल्यामुळे सायंकाळी 6.30 वाजता खूपच अंधार होत असे त्यावेळेस खूप फार कमी प्रमाणात लोकवस्ती होती.त्यामुळे टिटवाळा खूपचं भीतीदायक दिसत असे आठवतो तो दिवस जून मधल्या पावसाचा अगदी रिमझिम पाऊस पडत होता..त्या दिवशी मी मुंबईच्या ऑफिसातून साडेपाच वाटता सुटलो आणि गायनाच्या कार्यक्रमाला दहिसर येथे गेलो मिसेसला माहीत नव्हते. कार्यक्रम रात्री 11 वाजता संपला आणि मी त्वरित दहिसरवरून निघालो आमच्या कार्यक्रमाची गाडी होती आम्ही सर्व कलाकार घरी जाण्यासाठी गाडीत बसून गाडी घोडबंदर रोडच्या दिशेने निघाली काही दीड तासात गाडी ठाणे रेल्वे स्टेशन जवळ पोहचली मी त्वरित उतरून टिटवाळा येथे जाणारी कसारा धीमी ट्रेनमध्ये बसलो ती शेवटची ट्रेन होती.
पाऊस खूप कोसळत होता विजा कडकडत होत्या कशीबशी एकदाची ट्रेन टिटवाळा स्टेशनात पोहचली त्यावेळेस घड्याळात
ठीक 1:50 मिनिटे झाली होती सदर ट्रेन मधून जमतेम 40 ते 50 प्रवासी उतरले.कारण वस्ती खूपच कमी होती स्टेशन बाहेर येऊन माझी जुनी दु चाकी गाडी होती ती घेऊन मी टिटवाळा घरी निघालो.कारण घर स्टेशन पासून
खूप दूर होते.
खूप वेळ झाल्या कारणाने घरचे कुटुंब खूप काळजीत असणार माझी मिसेस खूपच घाबरली असणार हे सतत मनात येत होते.गाडीवरून घरी पोहचत असतांना मनात काहूर आणि भीती वाटत होती एकतर नवीन क्षेत्र आणि अनोळखी जागा त्यात पाऊस सैरावैरा वाऱ्याच्या लहरीने जोशाने कोसळत होता मी माझी गाडी अगदी स्वतः ला सांभाळून चालवत होतो काही अंतरावर गेल्यावर गाडीच्या हेडलाईट समोर एक छोटा ब्रिज दिसला रस्त्यावर दुतर्फा लाईट नसल्यामुळे काही स्पष्ट दिसत नव्हते.ब्रिजवर पूर्णतः अंधारच होता आणि पाऊस धो धो कोसळत होता तो सुसाट वारा पसरलेला वृक्षांचा पाळा-पाचोळा आणि आकाशात कडकडणार्या विज
ा क्षणातच प्रकाश देत होत्या माझी अवस्था खूपच विलक्षणीय झाली होती.माझी नजर सभोवताल गर गर फिरत होती परंतु......
रस्त्यावर कोणीही नजरेत व्यक्तीही दिसत नव्हती नुसता फक्त रातकिडे आणि बेडकांचे कर्कश ओरडण्याचा आवाज येत होता असे वाटत होते कधी घरी पोहचतो तेवढ्यात ब्रिजवर डोळ्या समोर एक मनुष्याचा हात दिसला तो मला खुणावत होता म्हणजे त्यास लिफ्ट पाहिजे होती मला चेहरा पूर्ण दिसला नाही मनात आले की,या अनोळखी व्यक्तीला सोबतीला घेऊ आणि मी अलगद गाडी त्या हाता जवळ नेली तेवढ्यात ज्याचा हात होता तो मला म्हणाला"कहां जा रहे हो" म्हणजे तो हिंदी भाषित होता.मी म्हटले 'घर जा रहा हूं' तो म्हणाला "मुझे बहोत आगे जाना है" बरसात बहोत हो रही है"मी म्हणालो "मेरी गाडी आगे नही जायेगी आगे मै राईट मोड जाऊन गा''तो म्हणाला"ठीक है"तो माझ्या पाठी मागे बसला मी गाडी स्टार्ट केली पावसाने आम्ही दोघेही खूप भिजत होतो कशी बशी मी गाडी चालवत होतो .गप्पा मारण्याचा मी त्याच्याशी प्रयत्न केला पण ती व्यक्ती एकही शब्द माझ्याशी प्रवासात बोलली नाही पुढे मी राईट टर्निंगला गाडी थांबवली आणि त्यास म्हटले"भाई साहब उतर जावो"तो काहीच उत्तर देईना मी पुन्हा विनंती केली तरीही काहीच उत्तर देईना मग मी पाठी थोडं वळून पाहिले तर,गाडीवर बसलेली व्यक्ती नाहीशी झाली होती गाडीच्या सीट वर कुणीच नव्हते.काय करावे सुचेना एकतर धुवादार पावसाने पूर्ण भिजलो होतो अंगाची थरकाप उडाली हातपाय लटपटू लागले मी कसेबसे मनास घट्ट करून गाडी स्टार्ट केली एवढ्या गतीने चालवली की थेट घर गाठलं गाडी बिल्डिंग खाली पार्क करून धावत घरी आलो दारात येताच मिसेसने दरवाजा उघडला अंग पूर्ण तापाने फणफणले होते पूर्ण शरीर थरथरत होते.मिसेस मला पाहून घाबरली तिने प्रथम कोरडा टॉवेल अंग पुसण्यास दिला आणि म्हणाली काय झाले मी पूर्णतः स्तब्ध होतो ती वारंवार जाणून घेण्याचा खूप प्रयत्न करीत होती.मी काहीच न बोलता फ्रेश होऊन त्वरित झोपी गेलो रात्रभर तो सतत क्षण डोळ्या समोर दिसत होता मग,मिसेसने जाणले की,हे कुठे तरी घाबरले असावेत कसाबसा स्वतः ला सावरत मी तसाच झोपी गेलो. असा हा पावसातला खूप भयानक प्रसंग जीवावर बेतला होता.