निसर्ग हा मानवाचा सखा
निसर्ग हा मानवाचा सखा
महाराष्ट्र हा शूरवीरांची आणि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.जेष्ठ संत तुकाराम महाराज ह्यांनी आपल्या मधुर वाणीतून समाजास प्रबोधनात्मक उपदेश दिला तो म्हणजे" वृक्षवल्ली आम्हा सोयरे" कारण मानवास निसर्गासारखा मित्र मिळाला आहे. एक प्रकारे मानवाला जन्मच दिलेला आहे. त्यास जगण्यास हवा,पाणी,धान्य आणि जीवीत राहण्यासाठी भरपूर ऑक्सिजन दिलेले आहे निसर्ग हा खूप मोठ्या मनाचा आहे तो कधीच काहीही मानवाकडे अपेक्षा करीत नाही. आपल्याकडे असलेले सर्व सुख तो मानवाच्या ओंझळीत निसंकोचपणे देतो म्हणून तर,निसर्ग हा खऱ्या अर्थाने मानवाचा आत्मा आहे हे विसरता कामा नये. जो आपला मार्गदर्शीत आहे त्यापासून ज्ञान मिळते आणि अंधारातून प्रकाशाकडे मार्गगमन होते तो आयुष्यात आपला गुरू असतो मग निसर्ग म्हणजे काय!तर मानवाच्या सभोताली सूर्य,चंद्र,झाडे,पशु-पक्षी आणि अथांग समुद्र हाच खरा निसर्ग.ह्या निसर्गाने मानवास खूप काही दिलेले आहे जसे की,आनंदी राहण्यासाठी वृक्षा पासून सावली,फळे,फुले ,किलबिलणारे पक्षी अशा निसर्गरम्य वातावरणात माणूस नेहमी उत्साही राहतो.एक प्रकारे मनास रमणीय करण्याचे हे जणू साधनच आहे.असा हा निसर्ग मानवास एक माणूस म्हणून जगण्यास शिकवितो.निसर्गाचे नाते हे असेच पूर्वजांपासून टीकून ठेवलेले आहे.
निसर्गाने एक सुंदर अदभूत जणू स्वर्ग ह्या पृथ्वीवर साकारलेले आहे हिरवीगार झाडे,रंगीबेरंगी फुले,स्वादिष्ट फळे,संगीत ध्वनी सारख्या नद्या,छोटे झरे,उंच डोंगर-दऱ्या,मधुर आवाजात गाणारे पक्षी,प्राणी आणि मंद वारा हे सर्व ह्या देवरूपी निसर्गाची रूपे आहेत.मानवास आनंदी ठेवण्यासाठी ह्या परमात्म्याने निसर्गाची निर्मिती केलेली आहे हेच खरे सत्य आहे.कारण निसर्ग हा नेहमी वेगवेगळ्या रूपाने म्हणजेच देवपूजेच्या फुलांपासून ते आहारापर्यंत मानवाच्या सोबतच राहिलेला आहे.पर्यावरणात वावरणाऱ्या जीवसृष्टीसाठी पर्जन्याचे निर्मिती सुध्दा निसर्गानेच केलेली आहे. आज मानवाने अशा निस्वार्थी निसर्गाचे अस्थीत्व टिकून ठेवण्यासाठी मानवाने कोणत्याही उपाययोजना राबविल्या नाहीत हे दुर्दव्यच म्हणावे लागेल कारण,आज पहाता ह्या मानवाने निसर्गाला संकटात टाकले आहे.खरे म्हणजे निसर्ग आणि मानव हे वसुंघरेची लेकरे असली तरी, ह्या स्वार्थी मानवाने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी निसर्गाचा दुरूउपयोग करून अमाप पैसा कमविले म्हणजे निसर्गाला जमिनदोस्त करून पर्यावरणाचा दुर्वास केला त्याने जंगल तोड करून औद्योगिक क्षेत्रात पाऊल ठेऊन कारखाने,गगनचुंबी इमारती शहरात,गाव-खेड्यापाड्यात उभ्या केल्या.प्रदूषणाचा जराही विचार न करता स्वतः बुद्धिमतेने अमाप पुंजी कमविण्याकडे लक्ष केंद्रित केले. कारखाने उभारल्यामुळे दूषित पाणी नदी, नाले, समुद्र ह्यात सोडण्यात आले.उंच उंच इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात जंगल तोड केली अशा गोष्टींमुळे आज देशात लोकसंख्या वाढल्यामुळे हाच माणूस स्वच्छ हवेस वंचित झाला आहे हेच सत्य आहे. निसर्गाने दिलेल्या पाण्याचे अपव्यय वापर करून त्याचा दुष्परिणाम हाच मानवास भोगावे लागत आहेत. मानवाच्या स्वार्थीपणाला पंख फुटल्यामुळे सदर हा दूरदृष्टी न पाहता फक्त निसर्गाचा विध्वंस करतांना दिसत आहे.
आज पहाता ह्या मानवाच्या अशा क्रूरबुद्धीच्या स्वभावामुळे आज जंगले राहिले नाहीत वन्य प्राणी मानवाच्या वस्त्यात घुसून त्यास जखमी करीत आहे, पक्षांची घरटे नाहीसे झाली आहेत, महाराष्ट्रत पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी वर्ग कुटुंबासवेत कर्जापोटी आत्महत्या करीत आहेत, विहिरी-नद्या-नाले पाण्याविना ओसाड पडलेली आहेत, देशाच्या आर्थिक परिस्थिती लयास गेलेली आहे इत्यादी हृदयद्रावक परिणाम देशांच्या राज्यात दिसून येत आहे. मग सांगा खरा दोषी कोणीतरी, यापुढे पर्यावरण संवर्धन करणे जास्तीच जास्त वृक्ष लावून त्याची काळजी घेणे खूप जरुरीचे आहे. अन्यथा निसर्ग आणि मानवाचे असलेले नाते संपुष्टात येईल.
करू या निसर्गाचे संवर्धन
आयुष्यात एक वृक्ष लावून
समतोल ठेवू या, पर्यावरण
-------💐💐---------------
