मित्र माझा सखा
मित्र माझा सखा
बालपण खूप निरागस असते त्यात ह्या मनाच्या स्थितीला कोणतेही बंधन नसते बाळपणात खूप मौज मस्ती,आनंद आणि ह्या सोबत रुसवे-फुगवे आणि भांडण सुद्धा इत्यादी गोष्टीतून आपला जिवलग मित्र भेटतो मग काय दिवसभर त्याच्याशी सोबत रहायचे,खेळायचे आणि शाळेत ही जायचे एवढेच काय तर व्यक्तीत सुखें-दुःखे ही शेर करायचे असा आपला जिवाभावाचा सखा म्हणजेच मित्र
लहापनी माझाही एक सखा मित्र होता आमचेही ऐक मेकांवर खूप प्रेम होते विशेष म्हणजे आम्ही दोघेही संस्काररुपी मित्र होतो.आमची मैत्री एकमेकांच्या विश्वासावर असे.त्यामुळे इतरत मित्रांना आमच्या दोघांचे खूप कौतुक असे विशेष म्हणजे आम्ही दोघे जरी मित्र असलो तरी दोघांचे स्वभाव तसे भिन्नच हिते
मी खूप रागिष्ट होतो पण माझा मित्र खूपच शांत आणि विचाराधीन होता तो नेहमी मला मार्गदर्शन करीत असे तो माझ्या अंगीकृत कलांना नेहमीच प्रोत्साहन देत असे संगीत,नाट्य,साहित्य,आर्ट्स इत्यादी कलेत तो मला शालेय,राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्यास सांगत असे त्याला नेहमी वाटत असे माझा मित्र खूप कला क्षेत्रात मोठा व्हावा.
आमच्या घरची परिस्थिती थोडी बिकट होती त्यामुखे चित्रकला स्पर्धेत सहभागी होयचे म्हटले तरी,रंगपेटी हवीच पण,माझा सखा मित्र माझ्यासाठी नवीन रंगपेटी घेऊन येत असे आणि मला पूर्ण तयारीनशी स्पर्धवत भाग घ्यावयास लावत असे जेव्हा मला स्पर्धेत क्रमाज होत असे तेव्हा त्याच्या आनंदास पाराच उरत नसे
आज असे मित्र मिळणे खूपच कठीण आहे
माझं थोर भाग्य की,असा मित्र मला आयुष्यात लाभला.
आज माझे वय साठवर्षे झाली आहे माझ्या मित्राच्या प्रेरणेने आणि कौतुकाने आज मी महाराष्ट्र् राज्यात संगीत,नाट्य, साहित्य,आर्ट्स आणि सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय,राज्यस्तरिय पाचशेहून सन्मान पुरस्कार मिळवले पण,माझा बालपणाचा मित्र जवळ नाही दहावी पर्यंत आम्ही दोघेही एकत्र शिकलो नंत तो गावी गेला मी पुढे शिक्षण घेऊन पदवीधर झालो सरकारी नोकरी मिळाली पण, माझा सखा कुठे आहे, कसा आहे हे आज पर्यंत समजले नाही तो कुठेही असो फक्त सुखी असो हीच देवा चरणी प्रार्थना.
