STORYMIRROR

Rajendra Sawant

Children Stories

3  

Rajendra Sawant

Children Stories

ऑनलाईन शिक्षण - शाप की वरदान

ऑनलाईन शिक्षण - शाप की वरदान

5 mins
388

आज संपूर्ण देशांच्या राज्यात कोरोना सारखी महामारी पसरलेली आहे.हि अदभूत परिस्थिती आल्यामुळे प्रत्येक राज्यातील मानवी मनाचे खच्चीकरण झालेले दिसून येते. सदर ह्या संसर्ग महामारीने देशात बहुसंख्येने बालकांपासून ते वृद्धांपर्यंत झळ बसून कित्येक माणसे मृत्यूमुखी पडलेले आहेत हे सर्व प्रसारण माध्यम,वृतांतून नेहमी पहावयास व वाचनास मिळते.आज देशांच्या राज्यांचा कायदा आणि सुव्यवस्थाही कोलमडलेला आहे.संपूर्ण देश ह्या महामारीला हतबल झालेले दिसून येते.आज पहाता राज्यांची अर्थव्यवस्था लयास जाऊन गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. देशात ह्या कोरोना विषाणूमुळे हाहाकार झालेला दिसून येतो. शासनाने आखलेल्या सक्तीच्या निर्णयामुळे कित्येकदा राज्यात लॉकडाऊन झाले. त्यामुळे खाजगी कंपन्या,सरकारी कार्यलये, शाळा,महाविद्यालये,मंदिरे पूर्णतः बंद झाले.देशात अनेकांचे रोजगार गेले कुटूंब उध्वस्त झाले.अशा संकटमय परिस्थितीत शासनाने वेळोवेळी वैद्यकीय उपाययोजना राबवून ती आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्नही केला.


हे सर्व पहाता शाळा,महाविद्यालये पूर्णतः बंद केल्यामुळे देशांच्या राज्यात प्राथमिक शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणावर फार मोठे परिणाम झाले.शिक्षण संस्थेतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. खाजगी शिक्षण संस्थानांवर तर,संकटच ओढावले कारण विद्यार्थ्यांकडून येणारी ट्यूशन फी बंद झाली. यामुळे शिक्षकवर्ग,शिक्षकेतर वर्ग यांना वेतनापासून वंचीत रहावे लागले.राज्यात विद्यार्थी वर्ग,पालक वर्ग यांना मोठा प्रश्न पडला.पालकांनाहि चिंता वाटू लागली.एकतर कोरोना सारखी महामारी दिवसेंदिवस वाढत होती कित्येकजण ह्या संकटास तोंड देत होते.त्यामुळे शाळेत विद्यार्थांना पाठविणे म्हणजे जोखमीचे व खूप अवघड होते.शिक्षणाची ही बाब खूप गंभीर झाली होती.प्राथमिक शाळेचे विद्यार्थी,कॉलेज तरुणवर्ग शिक्षणा पासून वंचित ठेवणे ही गोष्ट डोईजड होती.


त्यासाठी शासनाने दखल घेऊन शिक्षण विभागात परिवर्तन करून एकमतांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन शिक्षणाबद्दल एक धोरण अंमलात आणून ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण सर्वत्र राबविण्याचे ठरविले आणि त्यानुसार परिपत्रक काढून पूर्ण राज्यात सूचित करून ऑनलाईन शिक्षणपद्धतीची संकल्पना राबविण्याचा वटहुकूम काढला.शासनाच्या निर्णयामुळे ऑनलाईन शिक्षण घेणे हे विद्यार्थी, शिक्षक वर्गांना आणि पालक वर्गांना जिखरीचे होऊ लागले.कारण जरी ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण काळानुसार बदलले असले तरी,आर्थिक अडचणीही खूप होत्या.अशा शिक्षण पद्धतीत हे शाप की वरदान हा ज्वलंत प्रश्न उभा राहिला.त्याचे विश्लेषण करायचे म्हटले तर,असे दिसून येते की,


ऑफलाईन शिक्षणात विद्यार्थी वर्ग शारीरिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या शिक्षण घेऊन सकारात्मक वाटचाल करून कौशल्यवाण बनतो. महाराष्ट्र राज्यात दरवर्षी जून व विदर्भात जुलै महिन्यात शाळा सुरू होतात त्यामुळे सर्वांगी निरीक्षण केले तर,विद्यार्थी वर्गांसमोर एक स्वप्न आणि उत्सुकता असते.ती म्हणजे नवीन शिक्षक,नवीन मित्र,नवीन पाठ्यपुस्तके,गणवेश इत्यादी गोष्टी मनात बाळगून विद्यार्थी शाळेत येतो.पण,ऑनलाईन शिक्षण पद्धतीत तो ह्या गोष्टींना अपवाद असतो. त्यास घरी राहून टॅप,अँड्रॉड मोबाईल समोर बसून तासंतास शिक्षणाचे धडे शिकावे लागतात.त्यामुळे त्याच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो उदा-डोळ्यांचा त्रास,शरीर दुखणे,गुणवत्ता व मानसिकतेत प्रभाव पडणे इत्यादी वेदनाशील त्रास विद्यार्थी वर्गास सहन करावे लागते.


ऑफलाइन शिक्षणात मात्र ह्या गोष्टी अपवाद असतात नियमित शाळेत गेल्यामुळे वर्ग शिक्षकांसोबत जवळीक आणि संवाद त्यातून त्यांच्या शंकेचे निरसन त्वरित होते.परंतु ऑनलाईन शिक्षणात फक्त विद्यार्थी स्क्रीन पाहून फक्त श्रवण करतो.एखादी समस्या उद्धभवली तर,त्यांचे समाधान त्यास त्वरित मिळत नाही.ही मोठी शोकांतिका ऑनलाईन शिक्षण पद्धतीत आहे. काळानुसार बदलणे हे जरी,दुरदृष्ट्या विचार केला तरी,पूर्णतः विचाराधीन होऊनच शिक्षणाचे धोरण आखणे खूप महत्वाचे आहे. कारण विदयार्थी हा शाळेतच घडतो.शाळेत त्यास सर्वांगी सुविधा मिळतं असतात उदा- मैदानी खेळात रमतो,कलाकौशल्य,स्पर्धा ह्या गोष्टींत सक्रियेतेने सहभाग घेऊन त्याचा आत्मविश्वास वाढतो. आणि शारीरिक दृष्ट्या त्याची प्रगती होऊन विद्यार्थी सकारात्मक ध्येय जीवनात पहातो हे मात्र सत्य आहे.त्यामुळे अशा डिजिटल ऑनलाईन शिक्षण पद्धतीला शापच आहे असे म्हणावे लागेल.


ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी स्क्रीनच्या माध्यमातून कृतिशील शिक्षण चित्ररूपी पाहू शकतो आणि त्याचे आकलन करू शकतो.परंतु ऑफलाईन शिक्षणात हे शक्य नसते.आज शासनाने राबविलेल्या धोरणामुळे विद्यार्थी तंत्रज्ञानाजवळ जाऊन कार्यक्षमता व बौद्धिकक्षमता वाढू शकतो परंतु शारीरिकदृष्ट्या विकसित होऊ शकत नाही ही गंभीर समस्या आहे.फक्त पालकवर्ग ऑनलाईन शिक्षणपद्धतीत जबाबदारीने आपल्या पाल्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून पाल्याच्या गुणांचे मूल्याकन करू शकतात.आज ऑनलाईन शिक्षणपध्दत ही काळाची गरज आहे.त्यामुळे देशाची आर्थिकबाब आवाक्यात येऊ शकते. शिक्षणावर होणार शासनाचा अनाठायी खर्चात घट येऊ शकते परीक्षा ऑनलाईन पद्धतीत घेतल्यामुळे परीक्षेचा

निकालसुद्धा ऑनलाईन पद्धतीत दिला जातो आणि शिक्षण संस्थेत एक बद्दल घडून येतो इत्यादी गोष्टीतून विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढते. अशा पद्धतीचे ऑनलाईन तंत्राचे शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थी वर्ग शिक्षणापासून वंचित रहात नाही हेच उद्धिष्ट ठेऊन आज शासनाने शिक्षणक्षेत्रात ऑनलाईन शिक्षण धोरण अंमलात आणलेले आहे.


हे जरी वरदान समजले तरी ह्या ऑनलाईन शिक्षणपद्धतीला विद्यार्थीवर्ग सक्षम आहेत का हे सिद्ध होत नाही तरी ह्याचे अवलोकन करणे फार गरजेचे आहे.आपण थोडा विचार केला तर,नववी ते बारावी वर्गातील मुले सक्षम असू शकतात ते चांगल्या पद्धतीत ऑनलाईन शिक्षण घेऊही शकतात पण,पहिली ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थाना ऑनलाईन शिक्षणपद्धत अडचनच होऊ शकते म्हणून अशा शिक्षणास झालेली उत्क्रांती किंवा वरदान कसे म्हणू शकतो कारण अशा पद्धतीच्या शिक्षणास दोन बाजू म्हणजे शाप आणि वरदान ह्या दोन्हीहि गोष्टीचे जर मूल्याकन केले तर,परिणामकारक दिसून येतात ते म्हणजे, देशांच्या राज्यात मध्यमवर्ग आणि उच्च वर्ग जरी एकोपाने रहात असले तरी,त्यांच्या राहणीमानात दोन घटक आहेत ते म्हणजे ग्रामीणभाग व शहरीभाग आणि शिक्षणपद्धत जरी समान असली तरी, आर्थिकदृष्ट्या खूप विभिन्नता दिसून येते कारण, ग्रामीणभाग हा मागासलेला वर्ग आहे आणि शहरीभाग थोडा उच्च दर्जाचा म्हणून मानला जातो.


कारण मध्यम वर्गात वार्षिक उत्पन्न कमी असल्यामुळे ग्रामीण भागातील गरीब,कष्टी कुटुंब मोठ्या किंमतीचे मोबाईल,टॅप,इंटरनेट घेणे त्यांना परवडत नाही.समजा घरात दोन ते तीन मुले वेगवेगळया इयतेत शिकत असतील तर,एवढे अँड्रॉड मोबाईल घेणे परवड नाही ही वस्तुस्थिती ह्या वर्गात आहे परंतु ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहेत त्यांना इंटरनेट मिळण्यासाठी डोंगरासारख्या उंच ठिकाणी जाऊन ऑनलाईन शिक्षण घेण्याचे ते प्रयत्न करतात.त्यात ग्रामीण भागात वीज खंडित मोठ्या प्रमाणात होते. ग्रामीण कुटूंबात पालकवर्गात अशिक्षितपणा जास्त असल्यामुळे पाल्यांच्या शंकेचे निरीसनही करू शकत नाही ही ज्वलंतबाब ग्रामीण भागात दिसून येते तरी,शासनाने ह्यासाठी चांगल्या उपाययोजना राबवाव्यात अन्यथा ग्रामीणभाग शिक्षणापासून वंचित राहील.यात शंकाच नाही.पण


शहरी भागात उच्च राहणीमान जास्त उत्पन्न असल्यामुळे अशा समस्या कमी प्रमाणात दिसून येतात. कुटुंबात उच्चशिक्षित वर्ग असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणपद्धत उत्तम राबवली जाते.कारण शहरात वास्तव्यात असलेल्या कुटुंबात अँड्रॉड मोबाईल, लॅपटॉप उपलब्ध असते कारण त्यांच्या दैनंदिन उपभोगात असलेल्या ह्या वस्तू आहेत तसेच इंटरनेट सुविधा सुद्धा सहज मिळते. त्यामुळे शहरी भागात ऑनलाईन शिक्षणपद्धत सर्वश्रेष्ठ आणि लाभदायक ठरते म्हणजे त्यास ऑनलाईन शिक्षण घेणे एक वरदान असू शकते.


परंतु शहरातील विद्यार्थी ध्येय, आत्मविश्वास, कलाकौशल्यापासून अपवादच ठरतात म्हणून शाळेत घेतलेले शिक्षण हेच खरे योग्य असून कीर्तीवान आणि समृद्धीवान आहे.असे म्हणणे गैर नाही म्हणून शासनाने पुनश्च विचारमय होऊन ऑनलाईन शिक्षणपद्धतीत अभ्यासूवृत्ती ठेवून ऑनलाईन शिक्षण घेण्यास विद्यार्थी वर्ग किती सक्षम आहेत हे प्रथम टाळा करून त्यातून किती फायदा व तोटा आहे हेही पहाणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे योग्य निर्णय अंमलात आणल्यास देशातील कुणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. अन्यथा इंटरनेट कंपन्या ऑनलाईन शिक्षणपद्धतीचे फायदा घेऊन शिक्षणाचे व्यवसायीकरणं करून विद्यार्थी व पालकवर्गास आमिष दाखवून कमी किंमतीचे ऑनलाईन शिक्षणाचे पॅकेज देऊन अमाप पैसा कमवू शकतात तरी, शासनाने दूरदृष्टी ठेऊन ही बाब गांभीर्याने घेऊन ऑनलाईन शिक्षण संकल्पना देशाच्या राज्यात राबवितांना प्रथम विचारमय होऊन नंतरच योग्य मार्ग काढावा. तात्पर्य असे की,ऑनलाईन शिक्षणपद्धत म्हणजे शापच आहे आणि वरदान जरी असले तरीही जबाबदारीच आहे.🌹🌹


नकोत अव्हेरणा त्या शिक्षणाची

नकोस परिवर्तन,त्या धोरणांची

सकारात्मक ऊर्जा, असे ध्येयाची

घडतील शिलेदार भारत देशाची

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


Rate this content
Log in