हृदयातील बाबा
हृदयातील बाबा
आयुष्यात आपण लहानापासून जगत असतांना बाबा नावाच्या वादळास आपण कधीच पहात नाही हे आपले दुर्दव्य म्हणावे लागेल.आईने जन्म दिला नऊ महिने पोटात सांभाळ करून आपणास जन्म देऊन ह्या जगात आणले म्हणजे आई ही सर्वश्रेष्ठ आणि प्रेमाचा झरा असे सूत्र प्रत्येकांच्या मनात ठासून भरले आहे.ह्या उलट ज्या बाबांनी लहानापासून आपले सर्व हट्ट पूर्ण करण्यास आयुष्य पणाला लावले त्याला मात्र आपण नेहमी विसरतो ही मोठी शोकांतिका म्हणावे लागेल.अहो बाबा हा फक्त पडद्या मागचा कलाकार आहे तो फक्त अंधारात वावरतांना दिसतो पण,आई हे दैवत आहे तिचे प्रेम म्हणजे दुधावरची साय आहे कधी तरी,बाबा ह्या दैयतावर का बोलू नये आपला जन्म झाल्यापासून बाबा सतत राबत असतो स्वतः इच्छा -आकांशा बाजूला ठेवून फक्त मुलांचा व कुटुंबाचा विचार करतो मुलांनी कधी यश संपादन केले तर,देवा जवळ जाऊन गुपचूप रडतो व आभार व्यक्त करतो असा बाबा कोणी कधी पाहिला आहे का आपणास बाबा फक्त रागावतांना दिसून येतो त्यामागे पण,काही स्वप्न,उद्धिष्ट असतात हे कोणी पाहिले आहे का?खरंच आपण किती निष्ठुर आहोत की,स्वतःच्या बाबास आपण ओळखू शकत नाही.जेव्हा मुलीचे लग्न होते त्यावेळस निरोप घेतांना त्याचे हृदय किती भरून येते ह्याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही.मित्रांनो हृदयातील बाबा हा खरा आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे फक्त त्यांना ओळखा.
