STORYMIRROR

Kishor Powar

Horror Tragedy Thriller

3  

Kishor Powar

Horror Tragedy Thriller

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही

2 mins
200

          लहानपणीचे ते दिवस. प्रत्येकाच्या शालेय जीवनातील अविस्मरणीय असे काही क्षण हृदयाच्या एका कोपऱ्यात नेहमीच घर करून असतात.त्यातीलच एक प्रसंग आपल्यासमोर शब्दात मांडताना आजही हाथ थरथरतो आणि काळजाची धडधड वाढते.मी किशोर, मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या "सह्याद्रीच्या कुशीत वसले गाव चिमुकले माझे,आजार त्याच्या नावाने नाव आजरा शोभे" या उक्तीना शोभेसे अश्या निसर्गसंपन्न एका लहान गावात प्राथमिक शिक्षण शिकत असतानाचा प्रसंग.वय जेमतेम ११ वर्ष.

          आमचा राहता वाडा तसा मुख्यारस्त्यापासून १ किमीच्या अंतरावर.पावसाळ्याच्या दिवसात छोट्या मोठ्या डोंगरावरून खळखळून वाहणारे पाणी,वाऱ्याच्या संगीतावर डोलणारे पीक,हिरवा शालू नेसलेली धरणी, मोर - पोपट- चिमण्यांची आपापसातील मंजुळ कुजबुज, चुलीवरच्या भांड्यांमधून निघणाऱ्या अस्सल कोल्हापुरी जेवणाचा खमंग वास,छोट्या मोठ्या पाणदिमधून घुंगराच्या तालावर चिखल वात तुडवणारी बैलजोडी आणि ह्या बैलांच्या जीवावर काळ्या मातीतून सोन पिकवणारा माझा गावकरी बळीराजा हे दृश्य नेहमीच पाहायला भेटते.

           त्या रात्री वरुण राजा बेभान होऊन कोसळत होता.गावातील बत्ती तर केव्हाच गुल झाली होती. साधारण रात्रीचे ८ वाजले होते. व पावसाचा वाढता जोर पाहता गुरुजींनी तासिका मधेच बंद केली.आता प्रश्न होता तो घरी जाण्याचा. तरीही कोसळणाऱ्या पावसात कडाडणाऱ्या विजेच्या मदतीने घरी जायचे ठरवले.धावत पळत एकदासा मुख्य खिंडीच्या प्रवेश द्वार जवळ आलो. तिथल वातावरण हे खूपच भयानक होते.

           डराव डराव ओरडणारे बेडूक ,विहिरीच्या पाण्यात विजेच्या खांबावरील बंद चालू उजेडामुळे तयार होणारी प्रतिमा आणि ती प्रतिमा लगेच गिळून टाकणारा काळाकुट्ट अंधार सोबतीला असणारे बेटा तून येणारा भयानक आवाज यामुळे माझे पाय थरथर कापू लागले.अचानक सर्वत्र स्मशान शांतता पसरली.आणि विजेच्या लख्ख प्रकाशात माझ्या समोर अचानक एक आकृती तयार झाली.ती आकृती डोळेभरून पाहतो न पाहतो तिला आंधराने गिळून टाकले. मी जोरात किंचाळलो.आणि हाताची मूठ घट्ट करून जिवाच्या आकांताने क्षणाचाही विचार न करता पळत सुटलो ते थेट दरवाजा जवळ येऊन दाराची कडी जोर जोराने थोटवू लागलो.

            दार उघडले गेले.घराच्या लोकांना पाहिल्यावर माझ्या जीव भांड्यात पडला. तिथून ते आजपर्यंत खिंडीच्या प्रवेश द्वारावर आले की मला तो प्रसंग नेहमीच आठवतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror