STORYMIRROR

Kishor Powar

Comedy Drama

3  

Kishor Powar

Comedy Drama

हास्य कथा

हास्य कथा

1 min
170

आज सकाळी सकाळीच घडलेली घटना तुमच्या समोर मांडतोय आमच्या बबल्या ना म्हणजे एक नंबरचा घाबरट आणि त्यात तर आम्ही मूळचे कोकणी.गावामधे तर लाईटचा काही नेम नसायचा.त्याचा फायदा घेऊन आम्ही बबल्याला नेहमीच त्रास देत असतो.

गर्मीचे दिवस ऐन जोमात होते.दिवसभर शेतात काम करून आल्यानंतर सर्व जन घरीच होतो. चहा चा बेत रंगात असतानाच मधेच लाईटीने घोळ घातला.सर्व ठीकणी चालू असलेली दांगडमस्ती क्षणात शांततेत बदलली.याचा फायदा घेऊन काव्या ने त्या शांततेला दुभागत एक भयानक आवाज काढला.त्या आवाजाने ओसरीवर चहा घेत बसलेल्या  बबल्या ने जोरात रडायला सुरुवात केली.

बघता बघता त्याने अख्खं घर डोक्यावर घेतलं.इतक्यात लाईट आली आणि सर्व जन बबल्या जवळ जाऊन विचारू लागले काय झाले????शांत करून काव्या म्हणाली काय झाले सांगशील का???

त्यावर त्याने सांगितले की खूप भयानक आवाज ऐकला...म्हणून रडत होतो.काव्या एक सारखी हसू लागली.कोणाला काही समजत न्हवते..इतक्यात काव्याने सर्व समोर पुन्हा एकदा आवाज काढला व बब्ल्या पुन्हा रडायला सुरुवात केली .हे सर्व बघून घरात एकच हशा पिकला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Comedy