STORYMIRROR

Kishor Powar

Romance Tragedy Others

4  

Kishor Powar

Romance Tragedy Others

आठवणीतील पाऊस

आठवणीतील पाऊस

1 min
359

"श्रावण मासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे"

कवी कुसुमाग्रज यांच्या या श्रावण महिन्यात पर्यावरणातील मनाला आल्हादायक असे वातावरण आणि परिसरातील नव अंकुरित बदल पाहून मन कसे प्रसन्न होते.

  महाविद्यालयीन शिक्षण हे प्रत्येकाच्या आयाष्यासाठी खूपच महत्वाचे असते . मी ही नुकताच महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.महाविद्यालय हे माझ्या गावावरून जेमतेम ७ किलोमीटर अंतरावर.हा प्रवास बस ने तर कधी कधी मित्राच्या बाईकवरून. आठवडा पासून पावसाचा जोर हा चांगलाच वाढला होता.त्यामुळे सर्वांचा दिनक्रमात थोडा बदल झाला होता.मी नेहमी प्रमाणे बस्थानकावर बस ची वाट पाहत होतो. खूप उशीर बस न आल्याने बस बस्थानकासमोर जेमतेम गर्दी होती. 

     इतक्यात बस चा हॉर्न एकू आला आणि लोकांनी एकच झुंबड उडवली.कसाबसा गर्दीतून वाट काढत काढत बस मधे प्रवेश केला .गर्दीमुळे बसण्यासाठी जागा शोधणे म्हणजे शिपल्यात मोती सापडणे सारखे होते.बस ने वेग धरला.पुढच्याच स्थानकावर बस मध्ये तीही चढली.तिला पाहताच असे वाटू लागले की जणू अप्सरा आज आपल्यासमोर आवतरल्या आहेत.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance