भूक
भूक
जेमतेम फराळ खाऊन मैत्रीणी गेल्या. काहीजनींनी जाताना वरवर माझ्या सुगरणपणाचे कौतुक केले, काहींनी सूचना केल्या तर काही तशाच निघून गेल्या. बश्यांमधील उरलेल्या फराळाचे काय करायचे याचा मी विचार करु लागले तेवढ्यात बाहेरुन आवाज आला. भंगार वेचणारी एक बाई फराळाचे मागत होती. मी झटक्याने घरातून तेच फराळ आणले. त्या बाईने पायरीच्या बाजूला बसून काही पदार्थ खाल्ले नि उरलेले पोरांसाठी बांधून घेतले. मी दिलेले पाणी पिऊन तिने तृप्तीचा ढेकर दिला.
" बाईजी, मिठाई बहुत अच्छी बनी है,"असे म्हणत ती उठली आणि माझ्या मुलांना भरभरून आशीर्वाद देत भरल्या मनाने ती तिच्या कामाला लागली
