भेट
भेट
हाय सुजय, मी तुला फोन यासाठी केला की तुलाबोलायच आहे आणि तु भेट मी सांगते.ती फोन ठेवते.सुचिताने सुजयला वेळ काढून तिला भेटायलाये अस सांगत होती.पण त्याला तिला भेटायच नव्हत.त्याला तिचा राग आला होता.कारण तिने लग्न करण्याचा निर्णय बोलून दाखवला होता.कारणतिच्या घरचे तिच्यासाठी मुले बघत होते.पण तिच सुजयवर प्रेम होत आणि त्याचही तिच्यावर खूप प्रेम होत.पण सुजयला वाटायच सुचिता खुप घाई करतआहे,आपल्याला अजून वेळ हवाय.हेच तिला सांगायच ना तर त्याचा स्वभावच खुप रागिष्ट होता.तो छोट्या छोट्या गोष्टींवरूनही लगेच रागवायचा.पण सुचिता मात्र त्याला खूप समजून घ्यायची.पण सुजय तिला समजून घेत नव्हता.बोलत नव्हता आणि भेटायला टाळाटाळ करत होता.पण सुचिताच सुजयवर प्रेम आहे हे तिने घरी तिच्या आईबाबांना सांगितल आणि त्याला थोडावेळ देण्याची विनंती केली.तिच्या घरचे सुशिक्षितहोते.त्यांनी होकार दर्शविला.शेवटी आईबाबांनातिच्या सुखातच त्यांच सुख होत.तिला हे ऐकूनखूप आनंद होतो.ती आईबाबांना थँक्यु म्हणते त्यांना मिठी मारते.हेच तिला आज सुजयला प्रत्यक्षभेटुन सांगायच होत.हा कालपण नाही आला.आजत्याला ही आनंदाची बातमी सांगातली ना तो खूप खुशहोईल.तिला त्याच करियर आणि त्याची खूप काळजीवाटायची.त्याला आईबाबांनी वेळ दिलाय.त्याच टेन्शननक्की दूर होईल.मग काय आपल स्वप्न पुर्ण होईल
तिने भेट म्हणून परत सुजयला काॅल केला.तिनेसांगितल की तुला खुप बोलायच आणि महत्वाच काहीतरी सांगायच आहे प्लिज आज नक्की भेट. सुजय लगेच म्हणतो हो बघू ऑफीस सुटल की भेटू.तिलाखुप आनंद होतो.त्याला वाटत आज काय नवीन सांगणार काय माहीत ही,उगाच माझ्या डोक्यालाटेन्शन. संध्याकाळ झाली.सुजय ऑफीसमधून बाहेरपडला.पण तो जाउ का नको म्हणून बाहेरच वेळ घालवत होता.इकडे सुचिता त्याला भेटण्यासाठीखुप उत्सुक होती.नवीन ड्रेस घातला होता.आता फक्तसुजयची वाट बघत बसली होती.बराच वेळ झाला पणतो आलाच नाही.ती काॅल करते पण तो घेत नाही.ती स्वतःच्या मनाची समजूत काढते कामात असेल तो. म्हणून घरी कारने जायला निघते.
गाडी चालवताना तिच लक्ष नव्हत.तिच गाडवरील नियंत्रण सुटल निगाडी एका झाडाला धडकली.तिचा अपघात झाला.त्या रोडवरून जाणार्या लोकंनी तो अपघात बघितलाआणि पोलिसांना कळवण्यात आल.तिच्या घरी व सुजयला काॅल केला व हाॅस्पिटल मध्ये यायला सांगितल होत.सुजय धावतपळत हाॅस्पिटल मध्ये पोहचला पण डाॅक्टरांनी सुचितला मृत घोषित केल होत.त्याला तिलाअस समोर मृत अवस्थेत बघून त्याच्या पायाखालची जमिनच आधरली.एका दिवसात काय होऊन बसल.तो खुप रडत होता.तो आतून पूर्ण तुटतो,त्याला धक्काचबसतो.खुप रडतो पण आता रडून नि पश्चाताप करून काय उपयोग ? सुचिता हे जग सोडून निघून गेली होती.सुचिताला आपण भेटलो नाही आज याच वाईट होत. सुजयला तरी काय माहीत अस होईल सुचिताच्या बाबतीत अन् ती कायमची निघून जाईन.
आपल्याला कोणी भेटायला बोलवत असेल तर गेल पाहीजे त्या व्यक्तीला काहीतरी सांगायच असेल,माहीत नाही ती व्यक्ती परत भेटेल की नाही. म्हणतात ना आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही...म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की, त्याने फक्त चेहर्यावर हसू उमटेल

