Manaswi - (Savita Nath)

Abstract


4  

Manaswi - (Savita Nath)

Abstract


भाव वेडे...

भाव वेडे...

3 mins 918 3 mins 918

तरल तरल म्हणून किती नाजूक असावी दोन मने जोडणारी एखादी भावना..? भावना जपणाऱ्या मनासाठी ती अखेरपर्यंत साथ-सोबत करणारी, कोणत्याही परिस्थितीत एकटं न सोडणारी इतकी मजबूत. अन त्या भावनांचा गंध नसलेल्या एकाच तिऱ्हाईत कटाक्षात दृष्टावणारी इतकी नाजूक..! एकाच wavelength च्या भावना जेव्हा दोन मनातून सारख्याच frequency ने वाहत असतात तेव्हा नक्कीच काहीतरी चमत्कारिकच घडणार हे सांगायलाच नको.. 

एक मन सारखं विचारत असतं दुसऱ्या मनाला की, सांग ना कोण आहेस तू माझा? सांगण्यासारखं, लक्षात राहण्यासारखं काहीच नातं नाही रे तुझ्या माझ्यात.. मग तुझा विचार मनावेगळा करतांना एक धागा तुझ्यात अडकून ताणला जात असल्यागत वेदना का होतात रे? तुझ्या सोबत भावनिकतेत वाहवत जाताना ते वाहवत जाणं खूप सुखद, खूप आल्हाददायक असतं. 

संथ, समृद्ध, तृप्त, गोड झऱ्यातून एक नाजूक नाव न डगमगता, न बुडता आत्मविश्वासाने आपल्याच मस्तीत डोलत जातेय दूरवर.. क्षितीजाच्या पलीकडे...दिसेनाशी होईपर्यंत तिच्या प्रवासाचा अंत कुठे, कधी व कसा होईल याचा अंदाज कुणालाच सांगता येणार नाही. पण तरीही झऱ्याच्या त्या शांत प्रवाहात ती नाव मोठ्या विश्वासाने वाहवत असते. संयम ढळू न देता, डोंगरदऱ्यातन वाट काढत झराही नेत असतो तिला जपून. 

मोठमोठ्या सागरात जरा भरती आली की नाजूक नावेचा निभाव लागणं कठीण होत जातं. तसंच इतर आल्हाददायक नित्याच्या, सवयीच्या नात्यात होतं असावं का? खुपसाऱ्या जबाबदाऱ्या, भावनांच्या, अपेक्षांच्या भरतीत नाजूक नाव भरकटत जाते, दमते, दिशाहीन होते पण जिथे जबाबदाऱ्या, अपेक्षा, भावनांचा पूर येत नाही त्या छोट्याशा झऱ्यात मात्र ती नाजूक नाव ऐलतीरावरून पैलतीर नक्की गाठत असेल. किमान कोणत्याच पूर, वादळाची भीती तरी नसते त्या शांत प्रवाहात.

असचं आहे आपलं नातं. एक त्या शांत, संयमी झऱ्यासारखा अन दुसरा त्या लहरींवर स्वार झालेल्या आपल्याच मस्तीत जाणाऱ्या नाजूक नावेसारखा! 

आपण भेटायचं हे नियतीनेच ठरवलेलं असेल का? निसर्गानेही ठरवून घडवून आणली आपली भेट! किती सुंदर योगायोग जुळून आलेला होता ना आपण जेव्हा भेटलो तेव्हा..? नुकतीच पौर्णिमा सरलेली. बाहेर चंद्र चांदण्यां एकमेकांना पाहून ओळखीचं हसत होते. त्यांचंच धुंद, मंद हसू पसरलेलं होतं साऱ्या वातावरणात. त्या शुभ्र चांदण्यात आपण आपलीच उघडी-बोडकी सुख-दुःख उसवलेल्या मनात सांभाळत बसलेलो. मग एकाचा आश्वासक हात येतो पुढे अन काहीतरी समजल्यासारखा दुसऱ्याचा हात त्या हातात गुंफला जातो. घट्ट बांधलेल्या हातातून अन हाताच्या धमन्यांमधून वेगवेगळं रक्त वाहतंय ही जाणीवच नाहीशी झालेली काही क्षण. न बोलताच बराच डेटा ट्रान्सफर झालेला असतो इकडून तिकडे अन तिकडून इकडे! आईची माया, बापाचा सुरक्षित स्पर्श, मैत्रीतले सावरणे अश्या कितीतरी जाणिवा भरभरून असलेले ते दैवी क्षण ! साऱ्या रित्या जागा काठोकाठ भरून उतू गेल्याची ही एका मनाने दुसऱ्या मनाला दिलेली जाणीव!

अश्या किती अन कश्या पोकळ्या असतात आपल्या आत? ज्या वर्षानुवर्षे आपल्याला जाणवतही नाही. सर्व ऐहिक सुखे समोर असताना, ती सुखे भरभरून उपभोगून झाल्यावर एक वेळ येते जेव्हा अस वाटून जातं की आयुष्यात अजून काही सामावून घ्यायला जागाच नाही अन कोणतीच उणीव ही नाही. अश्याच भरल्या वेळी आपण एकमेकांच्या आयुष्यात आलो. आत एक रितेपण आहे हे जाणवून गेलं त्या क्षणी. आपल्या आत असलेल्या साऱ्या नाजूक पोकळ्या भरत भरत खोलवर झिरपत राहिलो आपण. तू आयुष्यात यायच्या आधी काही कमी होती आयुष्यात अस तर कधी त्यावेळी वाटलं नाही, मग तू आल्यावरच वाटणारी ही काठोकाठ भरून उतू गेल्याची समृद्धी का नाही जाणवली आधी? तू पुरून उरतोयस.. तुझ्यामुळे बऱ्याच मानसिक तृष्णा जाग्या होतात रे.. अन भीती पण वाटते नाजूक नात्याला जापतांना..

हक्क सांगूच नये तू माझ्यावर अन मी तुझ्यावर.. म्हणजे जे माझं नाही ते गमवायची भीती पण नसेल ना...! असेच राहू आपण लांबून एकमेकांना साथ- सोबत करत. "तुझ्यासाठी मी, माझ्यासाठी तू" असू नेहमीच available, एका हाकेच्या अंतरावर..! मुळात आपण आहोतच भक्कम. तरी साऱ्या परिस्थितीवर, भाव भावनांवर मात करायला अजून सक्षम बनवत जाऊया एकमेकांना. अन मजबूत आधारस्तंभ बनूया एकमेकांचे. सोबतच एक हळवा कोपरा जपून ठेवूया एकमेकांचा वेडेपणा जगणारा. 

तसा तू आहेसच वेडा, माझ्या साऱ्या वेडेपणाला तू अगदी अलगद संभाळतोस. तू शक्ती अन स्फुरण आहेस माझ्यासाठी. माझा अक्षय ऊर्जेचा झराच ! एखाद्या नाजूक क्षणी माझी आठवण येईलच तुलाही. त्यावेळी तू चंद्र-चांदण्याकडे बघ, ते सांगतील तुला माझा निरोप मी त्यांच्याकडे ठेवलेला. हे चंद्र-चांदण्याचं जपतील आपलं गुपित आभाळभर पसरून


Rate this content
Log in

More marathi story from Manaswi - (Savita Nath)

Similar marathi story from Abstract