भाऊबीज
भाऊबीज
"ताई, अगं कुठे निघालीस एवढ्या सकाळी?" चहा पिता-पिता रमेशने शैलाला विचारले.
"अरे, आज भाऊबीज आहे ना. विजयकडे जाऊन येते." असे म्हणत तिने पर्स उचलली.
"कोरोनाच्या लॉकडाऊन काळामध्ये, तुझ्या भाऊजींच्या आजारपणात त्याने केलेली आर्थिक मदत आणि दिलेला भावनिक आधार मी या जन्मीतरी विसरु शकत नाही."
बोलताबोलता तिने रमेशकडे पाहिले. त्याची नजर खाली झुकलेली होती आणि चहा गार झाला होता.
