MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

3.5  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

भारताची उडनपरी हिमा दास

भारताची उडनपरी हिमा दास

4 mins
157


      पूर्वीचा एक काळ होता. त्या काळात स्त्री फक्त चूल आणि मूल करत होती. सावित्रीच्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना शिक्षण मिळत नसे. शिक्षणाची मक्तेदारी फक्त उच्चवर्णीयांकडेच होती. क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अखंड समर्पक सेवेमुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेताना आपल्याला दिसत आहेत.आजच्या सावित्रीच्या लेकींनी आकाश कवेत घेतले आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी हे जग व्यापून टाकलं आहे.

    

      "आकाशाला कवेत घे 

      अशी तू भारतीय नारी 

       प्रयत्नांनी घे गरुडभरारी 

       दे उद्याला यशाची ललकारी....!!"


   या वरील उक्तीप्रमाणे कालची 'ती' ने आजच्या 'ती' ला पार बदलून टाकले आहे. आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये अनेक स्त्रियांनी बाजी मारलेली आहे. आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे -काल परवाच उडीसा सरकारने जिल्हा (डीएसपी) पोलिस उपअधीक्षक बनवले आहे. असे जिचे कर्तुत्व, भारताची उडानपरी,भारताची सुवर्णकन्या म्हणून अख्ख्या जगाला जी ची ओळख झाली ती 'हिमा दास' होय. जिला गोल्डन गर्ल म्हणून आज ओळखले जाते. ही भारताची पहिली सुवर्णकन्या ठरली आहे. ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधू, जागतिक स्पर्धेतील पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पूनिया यांच्या मागोमाग आता गोल्डन गर्ल 'हिमा दास' हिच्यामुळे जगात भारताची मान या सावित्रीच्या लेकीमुळे आज अभिमानाने उंचावली आहे.


      हिमा दास हिचा जन्म ९ जानेवारी २००० मध्ये आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी या छोट्याशा गावात झाला. तिचे वडील रणजीत दास आणि आई जोनाली दास हे भात शेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. तिचे शिक्षण धिंग पब्लिक स्कूलमध्ये झाले. लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ती शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पण श्याम शुक्ल हक यांच्या सूचनेवरून हिमा दास ने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षक प्रशिक्षक शहा यांनी तिच्या नागाव स्पोर्ट्स असोसिएशन च्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमादास नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाली. आणि तिने या क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली.ही स्पर्धा २०१८ मध्ये 'आशियाई क्रीडा स्पर्धेत' महिला ४०० मीटर धावणे मध्ये रोपे पदक मिळविले. या स्पर्धेत मिश्र रिले ४×४०० मीटर मध्ये रोप्य पदक मिळविले.आणि २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला रिले ४×४०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तेंव्हा भारत सरकारने हिमा दास यांना अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनंतर IAAF जागतिक २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिला ४०० मीटर मध्ये हिमाने एक सुवर्णपदक जिंकले.आणि २०१९ मध्ये विविध स्पर्धेमध्यें खालीलप्रमाणे यश संपादन केले.


पदक.      २०१९मधील विविध स्पर्धा.      महिला 

सुवर्ण     पोझनान ॲथलेटिक्स.           २००मीटर

                    

 सुवर्ण     कुत्नो ॲथलेटिक्स स्पर्धा, .    २०० मीटर

          पोलंड महिला 


सुवर्ण      टाबोर स्पर्धा,          महिला २०० मीटर

           चेक प्रजासत्ताक


सुवर्ण      क्लादनो स्पर्धा,        महिला २०० मीटर

          चेक प्रजासत्ताक 


 सुवर्ण      नोव मेस्टो ग्रांप्री, 

          चेक प्रजासत्ताक      महिला ४०० मीटर


   अशा अनेक स्पर्धेत एकूण सहा सुवर्णपदक व दोन रोप्य पदक मिळवणारी हिमा दास ने बालपणीचे स्वप्न पूर्ण केलं.


    "जिंकण्याची उमेद हवी 

    हरण्याची तमा नसावी

    सातत्य व प्रयत्नांनी 

     जिंकण्याची जिद्द असावी....!!"


         अशा प्रसिद्ध धावपटू हिमा दास ला २६ फेब्रुवारी २०२१ मध्ये आसाम पोलीस विभागात वयाच्या एकविसाव्या वर्षी पोलीस विभागात उपअधीक्षक डीएसपी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. लहानपणी पाहिलेले पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न आज अखेर यशस्वी झालं. कालची 'ती' आज 'पोलीस अधिकारी पदावर' फक्त तिच्या कर्तृत्वाने सिद्ध झाली आहे. हिमा दास यांना आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. गुवाहाटीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पोलीस महासंचालकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला त्या वेळी हिमादास म्हणाल्या "मी लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा होती मी हे स्वप्न पाहिलं होतं. शालेय दिवसापासूनच मला पोलिस अधिकारी व्हायचं होतं. माझ्या आईचे देखील हेच स्वप्न होतं. आई मला दुर्गापूजेच्या काळात खेळ म्हणून बंदूक घ्यायची आई म्हणते "पोलिसांची कामे करून मी चांगले माणूस बनावं"

      हिमा दासचं जेवढं कर्तृत्व तेवढंच दातृत्व सुद्धा दिसून येते. हिमा दास ने पहिला पगार कोरोना संकट काळासाठी आसाम सरकारला दान देणार आहे. इतकच नाही तर २०१८ मध्ये हिमा दास चा अपघात झाला. त्यावेळी तिला जबर दुखापत झाली होती. तरी १८ महिन्यांच्या कालावधीनंतर हिमा दास ने पुन्हा खंबीरपणे आपले ध्येय साध्य करण्यासाठी, नवीन ऊर्जेने उभी राहिली. पहिल्या स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.इंडियन ग्रा.पी. २ च्या महिला गटात तीने हे यश मिळविले. आसाम मध्ये जेव्हा पूरस्थिती आली होती. तेंव्हाही हिमाने अर्धा पगार पूरग्रस्तांसाठी मदत केली होती. एका शेतकर्‍याच्या मुलीने खूप संघर्ष करीत सामाजिक व स्पोर्ट्स क्षेत्रात देशाचे नाव जगात मोठे केले. या हिमा दास ला कुणी उडनपरी म्हणून ओळखतं, तर कुणी सुवर्णकन्या म्हणून ओळखतं, तर कुणी गोल्डन गर्ल म्हणून ओळखतं...


      "ध्येय साध्य करण्यासाठी 

       उत्तुंग भरारी घेऊया 

       परिस्थितीवर मात करण्या

        बाणा करारी ठेऊया....!!"


   आजच्या काळातील तरुण मुला-मुलींनी हिमादास चा आदर्श घ्यायला पाहिजे. अशा करारी बाण्याच्या सावित्रीच्या लेकीला, सुवर्णकन्येला, गोल्डन गर्लला मानाचा मुजरा...

खरं तर हा उत्सव तिच्या आत्मसन्मानाचा उत्सव फक्त एका दिवसाचा नसून सदैव तिच्या अस्मितेचा, तिच्या करारी बाण्याचा उत्सव ३६५ दिवस मनवला गेला तरी तोडकेच....!!


सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational