Sangita Tathod

Inspirational

3  

Sangita Tathod

Inspirational

बडे अच्छे लगते है

बडे अच्छे लगते है

6 mins
192


  बडे अच्छे लागते है

    ये धरती ,ये नादिया ये रैना

       और - - - - -

    

    पेशाने शिक्षक असलेला अनीलचे लग्न होऊन काही महिनेच झाले होते .तो बायकोचा हात हातात घेऊन वरील गाणे ऐकत होता .त्याची बायको दिव्या गाणे ऐकता ऐकता ,अगदी प्रेमाने त्याच्या डोळ्यात डोळे घालुन बघत होती .पण अनिलच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसत होते .तो अचानक  उठला आणि दिव्याला म्हणाला ,

"दिव्या ,अशीच परिस्थिती राहिली तर ,ही आपली धरती ,या नद्या ,हे पर्वत आणि ही चांदण्यांची रात्र

अशीच सुंदर राहील का गं ? दिव्याला तर अनिलच्या बोलण्याचे नवलच वाटले .वेळ काय ?हा बोलतोय काय ?


"काय बोलता तुम्ही ?काहीच कळत नाही ."दिव्या


"नाही ,दिव्या आता मी पक्का निश्चय केलाय .ही गव्हरमेन्टची ,नोकरी सोडून देणार . इथे काहीच

मनासारखे करता येत नाही .नाहीतरी आजोबांची खूप इच्छा होती ,मी आपली स्वतःची शिक्षण संस्था

सांभाळावी .आजोबांचे स्वप्न मी पूर्ण करणार आणि माझेही ."अनिल

   दिव्याला आज त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक  दिसत होती अनील उठला .टेबलवरचा लॅपटॉप काढला,आणि कामात गढून गेला .सकाळी सकाळी झोपला .रात्रभर त्याच्या डोक्यात आपल्या शाळेसाठी काय करता येईल याचेच विचार सुरू होते .आपल्या शाळेत काहीतरी वेगळे करावे असे त्याला आधीपासूनच असे वाटत होते पण हिम्मत होत नव्हती ,नवीन काही सुरू करायची .घरचा

बऱ्यापैकी श्रीमंत होता .धाडसी ,प्रामाणिक ,सतत काहीतरी नवीन करण्याची आवड असणारा 

,म्हणजेच सृजनशील विचारांचा पण थोडासा गरम  डोक्याचा होता तो .त्याचे गाव तालुक्याचे ठिकाण

होते .वडिलोपार्जित दोन चार जागा ,त्यांच्या मालकीच्या होत्या .वडीलांचे ,दूध डेअरी ,कृषी केंद्र

आणि घरी भरपूर शेती होती . 

  दुसऱ्या दिवशी त्याचे वडील विश्वासराव यांच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला ,

"बाबा ,माझा विचार आहे की आपली कोकीळाबाई ढोरे विद्यालय मी आता माझ्या ताब्यात घ्यावं ."

 विश्वासराव त्याच्याकडे डोळे मोठे करून बघतात ,

"मग ,तुझ्या नोकरीच काय करणार ?चांगली सरकारी शाळेवर ,नोकरी आहे ,तिच्यावर काय लाथ मारणार आहेस ?"

"हो ,बाबा माझा नोकरी सोडायचा विचार आहे ."

अनील

"अरे पण ,संस्था जरी आपली असली तरीही ,ती डबघाईला आलेली आहे .दर वर्षी पटसंख्या कमी

होत आहे .कधीही बंद पडू शकते ."विश्वासराव "हो ,बाबा त्यासाठीच तर मला ,ती माझ्या ताब्यात

घ्यायची आहे ,आणि मोठया शहरात शिक्षणासाठी जाणारा मुलांचा ओढा थांबवायचा आहे ."अनील

"तुला ,योग्य वाटेल ते कर ,पण मी तुला यात काहीच मदत करू शकणार नाही ."विश्वासराव

  "बाबा ,फक्त तुमचे आशीर्वाद असु द्या ."अनील


  अनील ,नोकरीचा राजीनामा सादर करतो आणि हळूहळू ,कोकीळाबाई विद्यालयाकडे लक्ष देण्यास

सुरुवात करतो .शाळेत पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग भरत होते .शाळेतील शिक्षकांचा निरुत्साह

बघुन अनील सर दर शनिवारी सर्वांची मिटिंग घेत . त्याच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्याचा

प्रत्येक करत .काही उत्कृष्ट शाळांचे विडिओ त्यांना दाखवत .हळूहळू शिक्षकांमध्ये सकारात्मक भाव

निर्माण झाले होते .हिच सकारात्मकता आता विद्यार्थ्यांमध्ये आणायची होती .त्यासाठी अनील

सरांनी ,रोज सकाळी योग ,मौन ,ध्यान घेणे सुरू केले .शेवटच्या तासिकेला खेळ घेत .सर्व शिक्षकांना

मैदानावर उतरवत .एकदा काय होते की , धवण्याची स्पर्धा, असते .मैदानावर ,जास्त न फिरकणारे

उमेश सर ,त्या दिवशी ,तिथेच घुटमळतहोते . मुलांना आश्चर्य वाटते .पांढऱ्या रेषा

आखायला मदत करत होते .मुलांना रनिंगचे नियम समजावून सांगत होते.पूजा सहज म्हणून जाते,

"आज धवण्याच्या शर्यतीत ,उमेश सर भाग घेतात वाटते ."

"मी ,घेतला असता भाग, आणि पहिला नंबरही मिळवला असता पण ही शर्यत मुलांसाठी

 आहे ना ?" उमेश सर

उमेश सरांच्या बोलण्याने सर्व मुले हसतात .

सनी म्हणतो, "उमेश सर ,उमेश सर ,तुमचे नव्वद किलोचे वजन सांभाळून त्या टोकापर्यंत चालत जरी पोहचला तरी पुरे आहे "

 बाजुला असलेले अनील सर ,मुलांचे हे बोलणे ऐकत असतात .ते मधे येऊन बोलतात ,

"ही स्पर्धा ,फक्त आपल्या शाळेपुरती मर्यादित आहे. तेव्हा याचे नियम बनविण्याचा अधिकार सुध्दा आपलाच आहे . उमेश सर या स्पर्धेत भाग घेतील ."

  अनील सरांकडे सर्व मुले बघतच राहिले .उमेश सरांना उत्साह आला ,

"मी माझ्या शालेय जीवनात ,रानींग चॅम्पियन होतो ." उमेश सर

"सर ,ती फार जुनी गोष्ट आहे .सनी च्या पुढे तुम्ही जाऊच शकत नाही ."सनी

"अरे ,बघच सनी तू ,तुझ्या पूढे जातोच की नाही ." उमेश सर

  सर्व मुलं पांढऱ्या रेषेवर उभे राहिले .उमेश सर शेवटी उभे राहिले .सनी त्यांच्याकडे कुत्सित नजरेने

पाहत होता .अनील सरांनी गेट सेट गो म्हटले . सनी सर्व मुलांना मागे टाकुन सर्वात पुढे धावत होता मुलांचा "सनी सनी "असा कल्ला सुरू होता . उमेश सर आधी थोडे मागे होते पण काही सेकंदात ते सनीच्या मागे येतात .मुलांचे लक्ष सरांकडे गेले. काही मुले "उमेश सर ,उमेश सर" म्हणून ओरडू

लागले .उमेश सर अगदी थोडे मागे पाहून सनीने धवण्याचा स्पीड वाढविला, पण त्याचा दम कमी

पडला .याच संधीचा फायदा घेत उमेश सर त्याच्या पुढे निघून गेले .अगदी घामाघूम झालेल्या उमेश

सरांना ,मुलं अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचत होती .  

 या एका प्रसंगाने विद्यार्थी आणि शिक्षकांमधील नाते दृढ झाले आणि मुलांचा अनील सरांवरील

विश्वास पक्का झाला .येथूनच ,खऱ्या शिक्षणाला सुरुवात झाली .अनील सरांना ,सर्वात प्रथम मुलांमध्ये निर्माण करायचा होता ,आत्मविश्वास . "आत्मविश्वास हाच आपले अर्धे काम यशस्वी करत असतो ."

  लहान गोष्टींतुन ,छोट्या छोट्या उपक्रमातून त्यांनी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला . जर मनापासुन आपण कोणतीही गोष्ट केली तर त्यात यश हे मिळतेच मिळते .शाळेत होणाऱ्या

सकारात्मक बदलांचे पडसाद बाहेर दिसू लागले  होते. दुसऱ्या वर्षी लगेच बावीस नवीन ऍडमिशन

शाळेत झाल्या होत्या .आता करायची होती ,पर्यावरण विषयक जागृती - - - !त्यासाठी शाळेने

हाती घेतला ,गावातून वाहणाऱ्या गौतमी नदीच्या स्वच्छतेचा उपक्रम .सुरुवातीला पालक आक्रमक

झाले , "मुलांना आम्ही शाळेत शिकवायला पाठवितो . गटार साफ करायला नाही ."एक पालक

"आमची मुलं काय हमाली करायला शाळेत येतात  का ?"दुसरा पालक

"घाण उचलून मुलं आजारी पडली तर - - ?"तिसरा पालक

"तुम्ही जर आमच्या मुलांना असेच राबवले तर , आम्ही मुलांचे नाव दुसऱ्या शाळेत टाकू ." चौथा पालक

    पालकांचा रोष अनील सरांच्या लक्षात आला होता .त्यांनी पालकांची समजूत काढली .

दोन महिन्यांनी नदीचे पालटलेले रूप पाहून नागरीक खुष झाले .

   शिक्षणासोबत शाळेने अनेक ,पर्यावरणाची जपवणूक करणारे उपक्रम राबविले .जसे की

,रेन वॉटर हार्वेस्टिंग .आपण घर बांधायला ,लाखो रुपये खर्च करतो पण रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी

पाच दहा हजार खर्च करणे कठीण असते का ? शाळेच्या आवारात पाणी जीरवले होतेच पण

प्रत्येक विद्यार्थ्यांनी घरी सुध्दा रेन वॉटर हार्वेस्टिंग  केले होते .शाळेची सम्पूर्ण ,वीजची उपकरणे ही

सोलर वर चालत होती .

   शाळेचे स्नेहसंमेलन होते .त्या कार्यक्रमाला  पालक उपस्थित होते त्याबरोबर गावातील अनेक

प्रतिष्ठित लोक आलेले होते .याच संधीचा फायदा  घेत ,सरांनी भाषण केले ,

"शालेय शिक्षण तर ,प्रत्येक शाळा देत असते . तुम्ही बघताय की ,मागील सात वर्षपासून आपली

शाळा ,कोणत्याही शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत कमी पडलेली नाही .पण त्यासोबत आपले 

पर्यावरण सुरक्षित ठेवणे ही आपलीच जबाबदारी  मनाली आहे .ही माती हे पाणी ,ही स्वच्छ हवा , निळा समुद्र ,ही हिरवळ हे रात्रीचे आकाशातील स्वच्छ चांदणे आपण कितीही पैसे खर्च केले तरीही ,निर्माण करु शकत नाही . आहे का कोणात हिम्मत ? माती निर्माण करायची. जुन्या काळात भगिरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती म्हणतात ,आज कोणी आणू शकेल का दुसरी

कोणती नदी ?नाही ना - - -?मग जे आपल्याला मिळाले ते तरी जतन करून ठेवू या .अगदी लहान

गोष्टी जरी आपण अंगिकारल्या तरीही आपली धरती सुरक्षित राहू शकते .आपला निसर्ग वाचविणे

हिच आपली देश सेवा ठरेल .देशसेवा करण्यासाठी प्रत्येकाला बॉर्डरवर जावून लढायची गरज नाही .

लहानपणी ,लागलेल्या सवयी आयुष्यभर टिकत असतात म्हणुन माझा अट्टहास असतो की मुलांना

पर्यावरण जोपासण्याची सवय ही बालपणीच लागायला हवी .त्यासाठी मी कधी कधी  जबरदस्तीही करीत असतो .माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही ,आमच्या संस्थेत ऍडमिशन दिली, त्याबद्दल सर्व पालकांचे आभार .तसेच ,हे काम मी एकटा करू शकत नाही ,मला सहकार्य करणाऱ्या माझ्या संपूर्ण स्टाफचा मी ऋणी आहे ."

   अनील सरांचे प्रास्ताविक संपले आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला .त्यानंतर ,बहारदार नृत्य,

नाटिका ,कविता गायन ,एकपात्री प्रयोग सादर झाले. त्यातील सातव्या वर्गातील सोनमने एक स्वरचित

कविता सादर केली 

    

    शाळेने द्यावे ,आम्हास 

    जीवनोपयोगी शिक्षण

    समजवावे कसे करावे

    अपुल्या धरेचे रक्षण


    निसर्गाला मित्र मानावे

    मुलासम त्याला जपावे

    तोच अपुला पालनकर्ता

    त्याचे जतन ,,सदा करावे


    काळानुसार शिक्षण मिळावे

    नको ते ,पोट भरण्याचे साधन

    धरेच्या राक्षनाचे लावून घ्यावे

    प्रत्येकाने स्वतःच्या मनाला बंधन


   कार्यक्रम संपला .अनील सर घरी आले .आज ते खूप खुश होते .प्रत्येकजण शाळेचे ,विद्यार्थ्यांचे,

राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे अगदी मनापासून कौतुक करत होते .दिव्याने अनील 

सरांच्या आवडीचे गाणे लावले ,


  बडे अच्छे लागते है 

     ये धरती ,ये नादिया ये रैना

      और - - - -  तुम


   हम तुम कितने ,पास है

   कितने दूर है ,चांद सितारे

   सच पुछो तो ,मन को 

    झुठ लगते है, ये सारे

    मगर सच्चे लगते है

    ये धरती - - - -


   तुम इन सबको छोड के 

   कल सुबह कैसे जाओगे

   मेरे साथ इन्हे भी तो तुम 

     याद बहोद आओगे

   बडे अच्छे लागते है - -  


  गीत संपल्यावर सर दिव्याला म्हणाले,

"मी ,गेल्यावर ही धरती ,मी तिच्यासाठी काहीतरी

केले म्हणून नक्कीच आठवण ठेवील माझी ."


"अहो , अशी मरणाची भाषा कशाला करता ? अजून तर तुम्हाला खूप काही करायचे आहे या

वसुंधरेसाठी .आणि पुढची पिढी तयार करायची आहे तिचे जतन करण्यासाठी .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational