बचत
बचत
एके दिवशी अचानक लॉकडाऊन झाले.आणि रघुनाथवर उपासमारीची वेळ आली..तो रस्त्याच्या कडेला चपला शिवण्याचे काम करत असे...पण संचारबंदीमुळे दोन पैसे मिळायचे ते पण बंद झाले.दोन दिवस झाले रघुनाथच्या घरची चूल पेटली नव्हती.त्याच्या लहान मुलीला खूप भूक लागली होती.जेव्हा मुलगी तिच्या बाबाला विचारते."बाबा आपल्याला जेवायला कांहीच नाही." तेव्हा रघुनाथ धान्य संपलं, पैसे नाहीत म्हणाला. तेवढ्यात मुलगी घरात जाऊन एक थैली हातावर आणून ठेवते.त्यात दोनशे रूपये निघतात.हे कुठले पैसे रघू विचारतो.त्यावर मुलगी म्हणते."बाबा तुम्ही मला ना खाऊसाठी रोज एक रूपया द्यायचे ना...! तेच मी जमवले होते." रघुनाथचे मन भरून आले.डोळ्यांतून अश्रुंनी वाट मोकळी केली.
