बा विठ्ठला तूच सांग रे आता.. .
बा विठ्ठला तूच सांग रे आता.. .


अरे किती अंत पाहशील तुझ्या भाबड्या भक्तांचा
कि तू ही उठलास जीवावर व्यापा-या सारखा
गाठून मारावं तसा निसर्गहि त्याच्यावर कोपला
हैराण केले आधी बोनड अळीने , आता गारपिटीने ...
बा विठ्ठला तूच सांग रे आता .. त्यांन कसं जगावं ?
बळीराजा नाही हा तर बळी दिलेला राजा
वरून राजा आपल्याच मर्जीने येतोस जातोस
तूच देतोस दोन्ही हाताने भरभरून ...अन
हाता -तोंडाशी आलेला घासही तूच हिरावून घेतोस...
बा विठ्ठला तूच सांग रे आता .. त्यांन कसं जगावं ?
किडुक मिडूक गहाण ठेवून दुबार पेरणी केली
रात्रंदिन रघत ओकून ती पिकं जोपासली
अरे तो शेतावर नाही देहावरच नांगर चालवतो
आणि उभ्या जगाच्या पोटाची काळजी वाहतो
पुढारी , व्यापारी अन आता विठ्ठला तू ही त्यालाच छळतो
फाटक्या संसाराला तो थिगळ लावत जगतो
त्याची ही तू बिनधास्त राखरांगोळी केलीस
रक्ताळलेल्या पायानी हिरवं स्वप्न पाहतो
ते हि तू धुळीस मिळविलं पुढा-यासारखं ...
बा विठ्ठला तूच सांग रे आता .. त्यांन कसं जगावं ?