अतूट प्रेम
अतूट प्रेम
सूर्य मावळतीला चालला होता. तू तिथेच झाडाखाली कितीतरी वेळ वाट पाहत उभी होतीस. माझी नाव खूप दूर गेली. लाटांचा आवाज, वाऱ्याची झुळूक मला बेभान करत होती. मला जेव्हा आठवले तुझ्याबद्दल तेव्हा वेळ खूप झाला होता. मी फिरलो माघारी तुला भेटायला. तू वाट पाहून पाहून थकली होतीस.
रात्र चढू लागली तसा किनारा दिसू लागला. पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात तुझे केसही उडू लागले होते. तुझी चिरनिद्रा मला भंग करावी वाटली नाही म्हणून मी ही झालो तिथेच आडवा. सकाळ होता गावातील लोक आपल्याकडे पाहून म्हणाले, अतूट प्रेमात दोघे अमर झाले आहे...