Anuja Dhariya-Sheth

Romance Inspirational Others

3  

Anuja Dhariya-Sheth

Romance Inspirational Others

अरे संसार...

अरे संसार...

5 mins
354


मागच्या भागात आपण पाहिले की सोनम आणि समीर यांचे लग्न झाले....


दोन्हीकडच्या पूजा झाल्या.... फिरायला जायची तयारी सुरू होती... बुकिंग 8 दिवसानंतरचे होते... म्हणून जवळ एक थंड हवेचे ठिकाण होते तिथे गेले ते फिरायला.. मिनी हनिमून काय?? म्हणून सर्व मित्र-मैत्रिणी चेष्टा करत होते... सोनम मात्र लाजेने चूर होत होती... खूप छान दिवस असतात सुरुवातीचे... दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी चूर झाले होते.... नंतर हनिमूनला जाऊन आले.... आणि मग दोघेही त्यांच्या फ्लॅटवर शहरात आले...


नवीन संसार मांडत होते... आपले नवीन घर सजवत होते... हळूहळू महिना झाला.. दोघेही आपला जॉब, घर सांभाळत होते... सोनमची खूपच कसरत होत होती... आधी पण ती घरीच डबा बनवत असली तरी तयारी आई देत होती.... आता मात्र सर्व नियोजन करणे, भाजी आणणे, किराणा, दळणं... तिच्या नाकी नऊ येत होते... हे सर्व करता करता ती दमून जायची... रात्री लवकर झोपायची... समीर जवळ आला तरी तिला उत्साह नसे... याचा परिणाम असा झाला की भांडण होऊ लागली... अबोला वाढला... आणि एका वीक एन्डला समीरला न सांगता सोनमने आईकडे जायचे ठरवले...


शुक्रवारी रात्री समीर तिला म्हणाला उद्या मस्त मुव्हीला जाऊ....पण ही भांडण करायच्या मूडमध्ये... ती म्हणाली.. मी आईकडे जाणार आहे... समीर रागवला... झाले हिला निमित्तच हवे होते....


शेवटी दोघेही गावी आले, तिला तिच्या आईकडे सोडून हा जवळच असलेल्या त्याच्या गावी गेला.... एकटेच कसे आलात या प्रश्नाचे उत्तर दोघांनी दिलेच नाही..


पण दोघांच्या आई मात्र काय समजायचे ते समजल्या.... आणि त्या दोघींनी मिळून यांची बट्टी करायची ठरवली....


दोन्ही आईंनी आपल्या मुलांकडून गोड बोलून काढून घेतले की काय प्रॉब्लेम आहे??


सोनमच्या बोलण्यातून आले की, समीर तिला मदत करत नाही... तिने काही केले तर ते आईसारखे झाले नाही असे बोलतो, आईला विचार...असेच कर आणि तसेच कर....


समीरच्या बोलण्यातून समजले, की सोनम त्याचे ऐकत नाही, त्याने कुठे बाहेर जायचं ठरवलं तर मी दमले असे सांगते....


दोन्ही आई अगदी बरोबर समजल्या....त्यांनी त्या दोघांना घेऊन एका देवीची ओटी भरायला जायचे ठरवले, जोडीने जावे लागते म्हणून दोघेही तयार झाले....


गाडीत सोनमला समीरच्या ज्या गोष्टी पटत नव्हत्या, त्याचा विषय समीरच्या आईनं काढला, तुम्हाला सांगते सोनमची आई, आमचे नवीन लग्न झाले ना तेव्हा हे मला सारखे त्रास द्यायचे, तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही... आई माझी मस्त करते... मला एवढा राग यायचा यांचा.. सोनम हसत होती.. समीरकडे बघून... मग तेव्हा माझ्या आईने मला समजावले ते मी तुम्हाला सांगते... त्या दोघी मुद्दामून चर्चा करत होत्या...


नवरा आणि बायको यांचे नाते टॉम आणि जेरीसारखं असते....


सुरुवातीला नवीन असताना सगळं अगदी परफेक्ट वाटत असते.. जसे की हाच तो किंवा हीच ती वगैरे....


लग्न होते आणि मग काय थोडे दिवस अगदीच गुलाबी असतात.... सगळे हवेत विरून जातात हळू हळू आणि मग् संसार सुरू होतो....


प्रत्येक माणूस कधी कधी चुकत असतो, चिडत असतो, भांडत असतो कधी चिडून बोलतो पण त्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते, पण आपण मात्र ते समजून न घेता त्या व्यक्तीला दोष देत बसतो आणि नात्यात असलेला आपलेपणा त्यामुळे संपून जातो... म्हणूनच प्रत्येकवेळी प्रत्येकाला प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे... कारण चिडून ओरडून एकमेकांना दोष देऊन नातं बिघडतं आणि ते सोपं असते हो... अवघड असते ते एकमेकांना समजून घेऊन नात्यात गोडवा ठेवणं अवघड असते..


समजून घेण्याने नाते फुलत जाते... ओपन राहते काहीही लपवून ठेवायची गरज राहात नाही....


म्हणूनच मी म्हणते समजून घेणे ही एक कला आहे जी सगळ्यांना जमत नाही आणि ज्याला जमते त्याचे आयुष्य खूप सुंदर होते....


प्रत्येक जणं हा चांगलाच असतो परिस्थितीप्रमाणे तो वागत असतो... त्यामुळे कोणाला दोष न देता समजून घेणे हाच उपाय असतो. माणूस म्हटलं की सगळे भाव आलेच हो पण त्याला समजूतीची जोड असली तरच अर्थ आहे...


तसे लगेच सोनमची आई म्हणते, शेवटी काय हो संसार म्हणजे तडजोडच...पण कोणा एकाने ती करायची नसते.. तर दोघांनीही एकमेकांना आनंद देण्यासाठी खुश ठेवण्यासाठी एकमेकांच्या प्रेमाखातर ती करायची असते....


भांडण होतात अगदी एकमेकांना बोलतो,लायकी काढतो, एकमेकांच्या घराण्यांचा अगदी उद्धार केला जातो... आणि शेवटी सगळे विसरून परत एक होतो असं नातं फ़क्त नवरा आणि बायको यांचंच असेल नाही....


भांडण झाले की नाहीशी होत मला नाही बघायचं तोंड असे नवरा रागात बोलतो आणि बाहेरून आला की पहिली हाक बायकोलाच मारतो.....


जातेच मी माहेरी येणार नाही आता ८ दिवस असे ती बोलली की तो म्हणतो जा खुशाल.... आणि लगेच मित्रांना फोन करतो तिच्या समोरच... ८ दिवस मोकळा आहे रे मी....


पण खरंच जेव्हा ती जाते...तेव्हा संदीप खरे यांचे गाणे आठवते त्याला


नसतेस घरी तू जेव्हा..

जीव तुटका तुटका होतो...

जगण्याचे विरती धागे....

संसार फाटका होतो....


तिकडे तिची अवस्था काही वेगळी नसते... दोन दिवस नाही होतायत तर तिला घरची ओढ लागतें....


शेवटी काय हो किती भांडलो तरी एकमेकांशिवाय अपूर्ण असतो नाही का??


एकाने पसारा केला तर दुसऱ्याने तो आवरायचा असतो,


एक रडला तर दुसऱ्याने त्याचे अश्रू पुसून त्याला हसवायचे असते,


एक पडला तर दुसऱ्यांन त्याला सावरायच असते...


कारण शेवटी आयुष्य आपल्याला सोबत काढायचं असते,पण हे सर्व दोन्ही बाजूने व्हायला हवे तर ते नाते खुलत जाते आणि घट्ट होते...नाहीतर मग तुटत जाते किंवा मनाविरुद्ध जपले जाते पण त्या नात्याला अर्थ नसतो


शेवटी सगळे पाश सोडून जातात उरतो फ़क्त आपण, तू आणि मी....


म्हणूनच म्हणतात ना तुझं माझं पटेना अन तुझ्या शिवाय करमेना


खरेच आहे हो म्हणून दोघी हसतात.... तेवढ्यात मागे बसलेले दोघांच्या बाबांचा आवाज येतो... एवढ्या वेळ हे सगळं आम्ही पण ऐकतोय... असे ते पण हसत हसत म्हणतात... आणि एवढे तुम्हाला पटतंय तरी म्हणालच "मी म्हणून टिकले हो..." परत जोरात हशा पिकतो...


शेवटी काय याचेच नाव संसार.... "अरे संसार संसार" दोघी गाणे म्हणतात, आणि लगेच बाबा लोकं त्यांची टेर खेचतात....


पण त्या चौघांचा निशाणा बरोबर लागलेला असतो, समीर आणि सोनम दोघांना चूक समजते आणि अबोला दूर होतो....


घरी आल्यावर सोनम चक्कर येऊन पडते, सर्वांना वाटतं प्रवासाच्या दगदगीने त्रास झाला की काय?? तिचा काकाच डॉक्टर असतो, तो येऊन सांगतो गोड बातमी आहे....


मग काय सोनम आणि समीर आता होणारे आई-बाबा म्हणून एकमेकांच्या प्रेमात नव्याने पडतात....


लग्नाला एवढी वर्षे झाली तरी त्यांच्या मनात या आठवणी अजूनही ताज्या आहेत... दरवर्षी जुलै महिना आला की या आठवणींमध्ये ते अगदी रममाण होतात.. आणि नव्याने प्रेमात पडतात....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance