vishal lonari

Romance

5.0  

vishal lonari

Romance

"अपघाती प्रेमकथा"

"अपघाती प्रेमकथा"

7 mins
900


तुला बघावे, तुला स्मरावे

तुझ्यात काही अशी ग जादू

तुझ्या समोरी तरी स्मरे तू

तुझ्यात काही अशीच जादू

मिठीत येते हळूच माझ्या

मला हरुनी कधी सखे तू

खिळून जातो तुला बघूनी

मनात, स्वप्नात, जीवात ही तू

अशी ग काही तुझ्यात जादू


धाङ. . . . . .गाणं बंद झाले. प्रचंङ मोठ्या आवाजाने तो भानावर आला. आज त्याच्याकङून त्याच्या गाडीचा अगदी विचित्र अपघात झाला होता. रस्त्यावरची वर्दळ गाडीभोवती गोळा झाली. कोण, कुठले आणि का थांबलेत त्याला काहीच समजत नव्हते. डोक्याला जोरदार मुका मार बसल्याने तो अर्धेशुध्दीत होता. अस्पष्टशी कुजबुज ऐकू येत होती. "कोण असेल ओ हा? दारू पिऊन चालला होता वाटतंय? रागात निघाला असेल,"तावातावात गाङी जोराजोरात"....(कुण्या खोडकराने मिश्कीली केली)


तेवढ्यात हायवेवरचे पोलीस पोहोचले. चौकशी सुरु झाली. काही कॉन्स्टेबल गाडी तपासत होते. एकाने त्याच्या तोंडात काळं नळकांड खुपसंल. "साहेब ,बेवङा नाहीये हा ! पोलिसांनी लोकांची एक शंका तर मिटवली. आतापर्यंत गर्दी पांगायला लागली होती. काही लोक टाईमपास करत थांबली होतीच. पोलिसांना त्याच्या मंद श्वासांत माझ्या फक्त कांदा भजी आणि सिगारेटचा कंदर्प असा (पुलं चा शब्द) मिश्र वास होता. त्यांच्या गमन निर्गमनाचा निष्कर्ष त्यांनी नोँदवला. "अपघात झाला, तेव्हा कुणी बघितला का ? कोण आलं आधी गाडीजवळ? जाधव, जरा बघा कोणी सांगतंय का? इन्स्पेक्टर शिंदेंनी खणखणीत ऑर्डर सोडली. भावना, सह्रदयता, माणूसकी नसलेले वा गुंडाळून बसलेले बघे लोक काहीच बोलायला तयार होत नव्हते. त्यांनी तरी काय सांगावे ना त्याला कोणी धङकले, ना तो कुणाला ठोकला. त्याचाच वेडेपणा त्याला नडला होता. मग त्या लोकांचा तो कुणीही नसताना त्यांनी तरी का बोलावे ना ? पोलीस फार कसून चौकशी करतात म्हणे!


त्या रस्त्यावर हा सगळा गोंधळ चालू होता. कर्रकचून ब्रेक दाबत एक गाडी थांबली. त्याच्या गाडीच्या बाहेर जखमी अवस्थेत त्याला बघून जीव हेलावत एक आवाज गर्दीच्या दिशेने आला . "सौरभ, उठ, सौरभ काय झालंय तुला? सौरभ मी आलेय. अरे, उठ बघ किती लागलंय तुला. पटकन बाटलीतले पाणी त्यावर शिंपडले. अहाहा किती तृप्त वाटत होते त्याला ! गेला बराच वेळ जीव तहानेने व्याकूळ झाला होता. त्याला खूप गरज होती पाण्याची . . .कोण होती ती. तिच्या स्पर्शाने जरा धीर आला. त्याने अलगद डोळे उघडले. बघितलं तर क्षणभर त्याला आश्चर्यचकितच व्हायला झाले. मृणमयी. हो मृणमयीच होती ती. सौरभची अगदी खास मैत्रीण.


सौरभ अन मृणमयी एकमेकांना अवघे सहा महिनेच ओळखत होते. तशी ती ग्रँज्युएट. नोकरी करणारी गौरवर्णी मुलगी. तो मात्र तिच्याहून वेगळा, विचार ठेवणारा असा बिझनेसमन मुलगा. आमची पुस्तके आणि मराठी चित्रपटांची आवड एकच. याकारणानेच ओळख झाली. मग बोलता बोलता ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. पण अजुन एकही भेट घङली नव्हती.


अजब आहे ना. काय अचंबीत व्हायचं त्यात. आपल्या आजुबाजूला सगळे फक्त धावत असतात. बोलायला, भेटायलादेखील वेळ नसतो. तेव्हा सौरभने फेसबुकवर अकाऊंट बनविले. पहिलीच रिक्वेस्ट मृणमयीला पाठवली. तिनेसुध्दा थोड्याच दिवसांत ती स्वीकारली. ओळख नाही असे पाहून फ्रेंड रिक्वेस्ट ब्लॉक करण्याचा काळ नव्हता ना तो. तर, अशी जुळली होती सौरभ अन मृणमयीची मैत्री.सगळी गोष्ट अशी सहजपणे जणू घडत गेली की, सृष्टीनिर्मात्याने, निसर्गानेच लिहिली असावी अशी गोष्ट.


तर सौरभला अपघात झाला होता. लोक, पोलीस आणि आता मृणमयी आली होती. पोलिसांचा मोर्चा तिच्याकडे वळाला, "मॅडम. तुम्ही ओळखता का याला? कोण आहेत हा? कुठे चालला होता? काय सांगू शकाल? "अहो , इंन्सपेक्टर हा सौरभ आहे. गेले सहा महिने आमची मैत्री आहे. अगदी निर्व्यसनी मनुष्य आहे. मुंबईत राहतो. मी पुण्याकडे जातेय याला घेऊन जाते मी. तुम्ही आलात त्याबद्दल आभार. ती विशीतली मुलगी किती भङाभङा बोलून गेली. गाडी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडरवरच्या झाडाला धडकवल्याने, आणि सीटबेल्टही बांधला नसल्याने गाडीत जोरात आडवा तिडवा असा सौरभ पडला होता. काहीच बोलू व हलू शकत नव्हता. मृणमयीने तिच्या ड्रायव्हरला गाडी घरी आणायला सांगून सौरभला त्याच्याच मदतीने तिच्या फोर्ङमध्ये लोळवले. परत एकदा पाणी पाजले. पण एव्हाना, सौरभला झोप लागली होती.


प्रवास संपला. सौरभला जाग आली तेव्हा तो बेडवर होता. मृणमयीच्या घरी आलाय हे ती बोलायला आली तेव्हाच समजले. तो पाहतच राहिला. नितळ-गोरी कांतीची ती. मधाळ आवाजात बोलत. तिच्या रेशमी केसांच्या मखमली बटा, गुलाबाच्या पाकळ्यांसम ओठ. नाजुकसेच पण तरतरीत असणारे नाक मोतिया दंतपक्ती. तर डोळे काळेभोर. सौंदर्याचा सगळा पॅक संपवूनच तिला पृथ्वीवर जन्म मिळाला होता. सौरभच चाटच पडून बघत राहिला. "अरे ऐ बघतोस काय? मी बोलतच जातेय, तू बघतोयेस ठोंब्यासारखा? त्याच्या तंद्रीतुन सुटका करवत ती हे विचारत होती. "भांबावलोय गं, असे अचानकच तुझ्या घरी मी? म्हणजे कथेतच घडतं गं आजकल असं, ते पण रेअर्ली. हे, असं प्रथमच अनुभवतोय ना. चक्रावलोय गं? मृणमयी, हे स्वप्न आहे का?


अरे नाही रे बावळटा? तिने घडलेला सगळा वृत्तांत कथन केला. सौरभने ताबडतोब त्याच्या आईला फोन केला. ती मस्त आनंदात होती, तर नेमका पोरीने उचलून नेल्याची तिला काळजी वाटू लागली. पण, सौरभ सुखरुप असल्याचे त्याने कळवले. ती बिचारी घरी आज एकटीच होती. म्हणूनच एकाच मालिकेचे आठवड्याभराचे एपिसोड तिला संपवायचे होते. त्यात पोराने टेंशन दिलेलं. पण, आणलीच मुलगी घरी तर, मालिका बघायला कंपनी मिळेल, म्हणून आई खुशच झाली. अन, पुन्हा सिरीयल पाहायला सुरू. सौरभने आईला, मी आईला दुसऱ्या दिवशी घरी येण्याचे वचन दिले. एव्हाना भारतात अन पर्यायाने पुण्यातही रात्र झाली होती. मग काय ? मला मलमपट्टी झाली. त्याला आयतंमायतं करून खाऊ घालण्यात आले. सदाशिव पेठेत राहत असल्याने मृणमयी नी सौरभ सारसबागेभोवती फिरायला ही जाऊन आले. येताना एका दुकानातून औषधेही घेतली. पण सौरभ तर मृणमयीला पाहूनच अर्धा बरा झाला होता. त्याच्या मनात विचार आलाच. तिला विचारावं, रात्रीचं. पण तिला, आवङलं नाही तर? मग, त्याने तिच्या खोलीवर राहायचा प्लॅनच कॅन्सल केला. तरी मृणमयीच्या रूम पार्टनर्स येण्याच्या आत तो सटकल्याने, वाचला होता.


पुढे मग पुण्यातल्याच, म्हणजे जरा बाहेर "कोथरूड" ला राहणाऱ्या एका मित्राच्या घरी तो पीएमटीने मुक्कामाला गेला. अंग ठणकत राहिलंच. मग कसली झोप यायची त्याला. सौरभने मृणमयीला फोन करून भेटूच म्हणून टुमण लावलं. दुसरा दिवस सुरू होऊन दुपार झाली होती. दुपारपर्यंत तो त्याच्या मित्राच्या खोलीत होता. मित्राची निकर सोडून बाकी सगळे कपडे धुवावे लागले ही गोष्ट, अलहिदा. मृणमयीने पण कामामुळे बोअर झाली म्हणून ऑफीसमधून हाफ डे घेतला. मित्राचे 'वांदे' झाल्याने, तिला त्याची अजून खेचायची हुक्की आली. आता मी सौरभची सूज उतरली होती. पेनकिलर खाल्याने बरं वाटलं होते.


मग दुपारी खानावळीत जाऊन दोघे मस्त जेवले. म्हणजे, तशी त्यांनी स्वतःची समजूत तरी करून घेतली. परत फिरून दोघे, मृणमयीच्या खोलीवर. ते ही रिकाम्या. आता, सौरभला परत एकदा, विचारावं वाटलंच. काल अंग ठणकत होते, आज ते ही नाही. तिच्या खोलीवर बसून उगाच एमपीएससी, युपीएससीच्या परिक्षेच्या पॅटर्नवर खूप गप्पा रंगल्या. अॅस्पायरंट कसे ढिगाने झालेत, वगैरे. तसं ते दोघं यापैकी काहीच करत नव्हते, पण ती आपली उगाच वेड घेऊन पेडगावला जायचं म्हणून. अनेक विषयांवर बराच लक्षवेधी अन विशेष चर्चा झाली. अचानक , सौरभने चान्स घेतलाच. खिशात हात टाकून..


तो तिला म्हटला, "मृणमयी I Love U माझे तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. गेले, कित्येक दिवस करतोय. कधी बोलायची हिंमत नाही झाली. आज करावीशी वाटली. असे बोलून तिच्यापुढे फिल्मी स्टाईल गुडघे टेकले. मृणमयी तुझा आवाज, तुझे रुप मला सगळीकडेच ऐकू येते, दिसते. अगदी ती कृष्णाची वाट पाहणारी राधा आहे ना तिच्या जागी तुच वाट पाहतेय असे वाटते. राजकुमाराची वाट बघत तू कधी दिल तो पागल है म्हणते. कधी लाजून बाहूत बिलगत मैने प्यार किया बोलते. मृणमयी तू माझी होशील? सौरभने सिनेमाचे वेड इथं पण जपल्याबद्दल बाजीराव रस्त्यावर त्याचा सत्कार ट्राफिक वाढेल म्हणून पालिकेने पुढे ढकलल्याचे कळले.


खरं तर असे हे प्रपोज करणे, अनपेक्षीत होते. दिवसात उन्हाद दमून आल्याने, वर हे असं ऐकून मृणमयी एकदम भोवळ पडावी तशी आधी पडली. मग, नंतर सावरली. "हे असे शब्द देखील मी ऐकले नव्हते रे कधी" ती उत्तरली. मी कसं मानू तुझं खरं प्रेम? जरा तुझ्या अंदाजात गुणगुण की, फेसबुकवर मारे मोक्कार कविता टाक, शायरी टाक. हे ऐकून सौरभची कळीच खुलली. तो गाऊ लागला.


कधी तु भासे कधी तु हासे

मनात माझ्या गुलाब फूले

तुला बघावे, मुग्ध मि व्हावे


जसे मनी चांदणे येते

लुब्ध तुला पाहताना

पुन्हापुन्हा मि हारत जातो

कधी तु तारा कधी शरारा

मनात माझ्या उष्म उन्माळे

कधी तु भासे कधी तु हासे


जुन्याजुन्या आठवांची धूनी

उरात पेटे, अशी कधी की

गितात या हे शब्दच नाही

दिलातले तुझ प्रेम आहे 


कधी तु भासे कधी तु हासे

मनात माझ्या गुलाब फूले


तुला बघावे, मुग्ध मि व्हावे

असे मनी चांदण येते


गाणं थांबले तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ओठावरच्या हसुने सौरभ काय समजायचे ते समजला. त्याला घट्ट मिठीत घेतले नी ती रडायलाच लागली. मग त्याचाही हात तिच्या पाठीवर विसावला.


"सौरभ, मला नाही येत तुझ्यासारख्या कविता, गाता ही नाही येत. पण मी आजपर्यत तुझ्यावरच प्रेम करत होते. किती खोटं वाटायचे. सोशल मीडियावरचे प्रेम. ओळखीचे वेडे ठरवायचे. आभासात जगू नको सांगायचे पण मी मनात तुलाच जपून, जगापासून लपून प्रेमात आकंठ होत गेली! काल, तुला बघुन तर जीव किती घाबरला. कशीबशी सावरलं नी सगळ्याला सामोरी गेले . I Love u too saurabh. ती हे सांगताना, तो आता भडाभडा रडायला लागला. तिच्यापुढ्यात बसला गुडघ्यावर. माझी सखी, माझे प्रेम, माझी दिलरुबा माझ्यासोबत होती. तिच्यासाठी जगायचं. दिव्य करायचं पण तिला मिळवायचंच" असे रोज स्वता:ला दटावत जगत होता. पण ते सगळं असे घडेल याची कल्पनाच त्याला नव्हती. पण झाले त्याच्या आयुष्यात त्याचे प्रेम त्याला गवसले. त्याने परत एकदा जड अंतकरणाने तिचा निरोप घेतला नी घरी जायला निघाला. स्टेअरींग वळवतच गाडीत पुन्हा गाणे सुरु केले . . .


नाजुक जपले, गंध फुलांचे आज उधळले सारे . . .


तर अशी होती. सौरभ आणि मृणमयीची गोष्ट. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या अविष्काराने आणि नियतीच्या उलट्यासुलट्या घटनांतून घडून आलेली, "अपघाती प्रेमकथा"


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi story from Romance