vishal lonari

Tragedy Horror Crime

3.8  

vishal lonari

Tragedy Horror Crime

विकृताची शॉककथा

विकृताची शॉककथा

19 mins
12.5K


आजच्या दिवशी

महानगरात नेहमीसारखीच प्रसन्न सकाळ होती. रोजच्यासारखेच शहर उठून धावायला लागले होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. मधूनच कबुतरे फडफड करायची तर कुठं कावकाव ऐकू येत होती. गाड्यांच्या आवाजाचा दणदणाही एव्हाना सुरू झाला होता. रिक्षा, टॅक्सी, मोटारी, सायकल, आणि लोक त्या प्रत्येकाचा आपापला गलबला अगदी नेमेची सुरू असतो तसाच चालू झाला होता. सूर्यही आकाशातून पसाभर हसायला लागल्याने आता कोवळं ऊन्ह जाऊन प्रखर उष्णता जाणवू लागली होती.

फोनची रिंग वाजली.

“हवालदार शेवडे बोलतोय सर”

“शेवडे, का सकाळी सकाळी फोन केलाय, झोपू द्या की” इन्स्पेक्टर श्रेणीक साखरदांडे बोलले.

“आय एम एक्स्ट्रीम्ली सॉरी सर, पण इथे आग्रा हायवेवर एका मुलीने आत्महत्या केली आहे, म्हणून मला तुम्हाला त्रास द्यावा लागलाय सर, अन्यथा मी पामराची काय ती बिशाद आपल्या गुळ झोपेत व्यत्यय आणायची”

“कसले फालतू जोक मारता हो, साखर झोप असते, हे गुळाची झोप काय!!”

शेवडे जरा मोठ्यानेच बोलायला लागले. “माफी असावी सर, पण पांचट विनोदामाध्येही आपले नाव घेणे, मला उचित वाटले नाही हो”..

“हम्म, ब्रश तोंडात टाकत, नळ सुरू करून श्रेणीक बोलायला लागले, “तुम्ही चांगले साहित्यिक, व्हायचे ... गुळणी थुंकत, तुह्मी ना साले दमडीभरचे लेखक होऊन कागदांच्या सुरुळ्या करणारे लेखक व्हायच्या लायकीचे, कोणी पोलीस केलं तुम्हाला”. ठेवा फोन!

“तेव्हा ट्रेनिंग इन्चार्ज डीपार्टमेंटचे कांबळे होते सर, मी वायरलेसवर लोकेशन सांगतो सर.”

 महानगरी जरी मोठ्या उत्साहात होती. इन्स्पेक्टर श्रेणीक साखरदांडे यांच्यासाठी मात्र एका वाईट बातमीने सकाळचे स्वागत झालं होतं. अर्थात मानवीय दृष्टिकोनातून ती कितीही वाईट बातमी असली तरी त्यांना कर्तव्य म्हणून अशा कित्येक घटनांकडे प्रचंड तटस्थपणे बघावे लागते. जरी एखाद्या घटनेतील शल्य त्यांना आतून बोचत असले तरी त्यांना हे सगळं करणं भागच असते. आजही जेव्हा त्यांना मुंबई आग्रा हायवेवर दुर्दैवी आत्महत्या झाली असल्याचे समजले तेव्हा खचितच त्यांना दुःख झालं पण क्षणात त्यांनी घटनास्थळी आपण पोहोचत असल्याबद्दल सांगितले. आग्रा हायवेवर आज एक नाही तर दोन आत्महत्या होणार होत्या, पण झाली एकच, अर्थात ही आत्महत्या होती की खून ह्याचा तपास श्रेणीक यांनाच करायचा होता. त्यात ते पारंगत झाले होतेच, याआधीही असे अनेक गुन्ह्यातील गुंता त्यांनी सोडवून आरोपीला पिंजराबंद केलं होते.

सलग आलेल्या सुट्यांनंतर आज कॉलेज सुरू झाले होते. पार्किंगमध्ये गाड्यांची गर्दी वाढल्याने तिथे असलेले गार्डस व्यवस्था बघू लागले होते. येत्या जात्या प्रत्येक गाडीस्वाराला सूचना देऊन गाड्या लावून घेत होते. वेगवेगळ्या प्रिंट, झेरॉक्स काढण्यात विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. शेजारचे कँटीनही असेच मुला मुलींच्या घोळक्याने फुलायला लागले होते. गरम मिसळ, समोसा, वडापाव आणि वाफाळलेल्या चहाची मजा घेताना गप्पांत अनेकजण रममाण झाले होते.

“ज्ञाना, आज ती कुठे रे? सोडून आलास की काय कुठं?”

“अहह हं, काय !” ज्ञाना क्षणभर गडबडला. “काहीतरीच काय भोपळ्याच्या फोडी कापाव्या तशा माझ्यावर शब्दांच्या फोडी कापतो रे, डोकं आहे माझं, काय समजलास याला? शोम्या, मी कशाला तिला कुठं सोडून येऊ?” ज्ञानाच्या कपाळावर टपोरे घामाचे थेंब जमायला सुरुवात झाली होती.

“इतकं तंतरायला काय झाले. घाबरून दचकतो काय, पूनम कुठे आहे इतकंच विचारलं मी, लहानात लहान चड्डी घालायचास ना तेव्हापासून सोबत आहोत आपण, मजाक पण करू शकत नाही का? हे काय, तुला घाम का आला इतका, ठीक आहेस ना?" तिला काय ढगात तर नाही पाठवलं बाबा?"

या बोलण्यानंतर मात्र, ज्ञानाने चेहेऱ्यावर पटकन हासू आणले. “अरे काहीतरीच काय, तिच्या त्या मैत्रिणी नाही का रे, वृषाली आणि चिन्मयी, त्यांच्यासोबत कुठेतरी फिरायला म्हणून गेली आहे. संध्याकाळी येईल म्हणाली.”

“चल, ही कॅन्टीनची वर्ल्ड फेमस मिसळ संपली असेल तर, आपण आता क्षुधा शांत करून लेक्चरला पायांना एक चक्कर मारून आणू, तेवढाच मास्तरचा मुखवास”

इन्स्पेक्टर श्रेणीक घटनस्थळी पोहोचले होते. महामार्ग असल्याने, आत्महत्या केलेल्या तरुणीचा मृतदेह होता तेवढी जागा पूर्णतः क्राईम सील केली होती. बाकी रोड तसा सुरू होता. तरुणीच्या पर्समध्ये खूप पैसे, पाकीट, मोबाईल, घड्याळ, एक वही, विषाची नवीकोरी बाटली आणि एक चिठ्ठी आढळून आली होती. तिचं कॉलेज हॉस्टेलचे आयकार्डदेखील होते. त्यावरून तिची ओळख पटली. मृत तरुणीचे नाव 'पूनम' होते. जी कॉलेजला न आल्याबद्दल, ज्ञानेशला त्याच्याच मित्राने सोहमला प्रश्न विचारला होता. परंतु, पुनमच्या चिठ्ठीत एक विचित्र गोष्ट इन्स्पेक्टर श्रेणीक यांना जाणवली. आत्महत्या करीत असल्याची कारणे तर होतीच, मात्र त्या चिठ्ठीत एक नाव नव्हते तर एक मुलगा अन पूनम अशी दोन नावे होती. यामुळे त्यांना या आत्महत्येमागे काहीतरी गूढ नक्कीच आहे, असे वाटायला लागले होते. हे प्रकरण विशेष म्हणूनच हाताळण्याचे त्यांनी ठरवले. आता, त्यांना पुनमच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल वाचण्याची उत्सुकता लागली होती. 

काही महिन्यांपूर्वी

कॉलेजचे नवीन वर्ष सुरू झाले होते. नवीन वर्ष, नवीन वर्ग, मित्र, मैत्रिणी सगळीच नव्याची झालर जुलै महिन्याच्या त्या सोनपिवळ्या ऊन्हात कॉलेजची मोठी इमारत न्हाऊन निघाली होती. अगदी निसर्गरम्य परिसरात टुमदार इमारतीत कॉलेज उठून दिसायचं. पुढे छोटीशी इमारत असली तरी मागे मोठी इमारतही लक्ष वेधून घेणारी होती. कलाशास्त्रचे धडे देणारं कॉलेज होतं ते, तिथली इमारत मात्र वास्तुकलेचा सौंदर्यात्मक वास्तुपाठच म्हणता येईल अशीच होती. याच कॉलेजमध्ये पूनमही शिकत होती. आपल्या मैत्रिणींसोबत तिचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. अगदी जीव लावणाऱ्या मैत्रिणी अगदी बहिणींसारख्या एकमेकांवर माया करत. असे असले तरीही पूनमला मात्र त्यांचीच सोबत होती असे नाही. ज्ञानेश हा पण तिच्या आयुष्याचा सोबती होता. ज्ञाना आणि पूनम यांचे एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम होते. दोघेही एकमेकांत गुंतलेले होते. कॉलेजला भेटल्यापासून त्यांना एकमेकांची ओढ लागली होती. त्या ओढीनेच त्यांची मैत्री घडवली होती. मैत्रीत त्यांना एकमेकांना पूरक असल्याचे जाणवू लागल्यानेच, त्यांनी एकमेकांना सोबत करण्याचा निर्णय घेतला. पुनमच्या घरी ही गोष्ट कळली असती तर त्यांनी तिला जिवंत सोडले नसते यामुळेच हे सर्व प्रकरण पुनमच्या दोन मैत्रिणी, ज्ञानाचा मित्र सोहम याव्यतिरिक्त कळू द्यायचे नाही, असे ठरवले होते.

पूनम आणि ज्ञाना एकमेकांच्यात नको इतके गुंतायला लागले होते. प्रेम म्हणजे फक्त एकमेकांचा विचार करणे, भेटणे, मिठी मारणे इतकंच पुनमला वाटत होते. आयुष्यात पुढे जाऊन एकत्र येऊ न येऊ यातील न येण्यावरच पूनम ठाम होती. ज्ञानाही या गोष्टीला मानत होता. तरीही त्याला पुनमची ओढ लागलेली असायची. त्याचं पुनमवर नक्की प्रेम होते की नाही हे मात्र त्याला कळत नव्हते. तिचं सारखं त्याला मिस करणे, भेटायला बोलावणे, हे त्याला नको वाटत असायचं. नंतर त्याला ही जाणीव अधिक प्रकर्षाने होऊ लागली. पुनमला तसेच त्याने बोलावून पण दाखवलं. लवकरच तिनेही ते सत्य स्वीकारलं. मात्र तरीही मैत्री जपायची म्हणून तरी ज्ञानाला भेटण्याचा तिचा आग्रह असायचाच. दोघेही भेटायचे खूप भटकायचे, हॉटेलिंग करायचे. पेट्रोल भरून टाकी फुल करून गाडी धावत सुटायचे. कधी नदीच्या किनाऱ्यापाशी जाऊन शांत बसत होते. त्याच नदीच्या झुळझुळ पाण्याच्या धबधब्यावर जाऊन त्याचे फोटो काढणे हा त्यांचा आवडता छंद होता. त्या धबधब्याजवळ एक मोठे रॉक गार्डन होते. बाजूने जाणारा पूल पलीकडे असलेल्या गावाला जोडत होता. नदीकाठी छोटी छोटी देऊळ होती. असे निसर्गकुशीतील हे ठिकाण महानगरातील प्रेमी युगुलांसाठी लव्हपॉइंट डेस्टिनेशन होते. या लव्हपॉइंटचं एक वैशिष्ट्य म्हणजे धरणातून नदीला सोडलेलं पाणी उन्हाळ्यात कमी होणाऱ्या अवर्तनामुळे धबधबा आणि रॉक गार्डनजवळ अगदी प्रमाणात असे. तो परिसर पाण्याने तुडुंब न्हाऊन जात नसे. याचमुळे रॉकगार्डनवर कुठे कोपऱ्यात चोरून भेटण्याचा अन बोलण्याचा ज्ञाना अन पुनमचा दिनक्रम असायचा.

"किती मनरमणीय स्थळ आहे हे." इति पूनम

"जलप्रवाह अतिशय धिम्या गतीने वाहतो आहे. पात्रात पाणीही कमीच सोडण्यात आल्याचे दिसते. पाणी शक्तिशाली क्षमतेने वाहते असले की या पुलाच्या वरून जाते. हा पूर्ण धबधबा ओसंडून वाहू लागतो." यानंतर स्वतःच्या संभाषणातील हा बदल ऐकून एकमेकांशी दोघेच हसायला लागले. एकमेकांच्या हातात हात देऊन चालू लागले.

"आता, बघ किती कडक ऊन पडलंय, तिथे सावलीत बसू, त्या कातळावर."

"पूनम मला, स्वप्नात पण कधी अशी जागा आणि कोण्या मुलीसोबत मी इथे येईल असे वाटले नव्हते. घरच्यांसोबत यायचो, त्या मंदिरात जाऊन, दर्शन घ्यायचो फक्त, हे किती भारीये राव".

"आपण फक्त बोलण्यातच वेळ घालवणार आहोत का, मला तुला हग करायचे आहे". असे बोलून पूनम मात्र डबा उघडून खायला लागते. मिठीत घ्यायचे आहे म्हणून चक्क जेवणाचा डबा उघडून खायला लागली आहे हे बघून ज्ञानाने अगदीच हिरमुसलेला चेहेरा केला.

"एवढं काय ग, पर्समध्ये तुझ्या", कटलरीचे सामान, किती राशनचा माल, की कोस्मेटीकचे दुकानच काढलंय, मैत्रिणीसाठी. हे जरा फनी आहे का गं”

“ज्ञाना, माझ्यावर केलेले कोणतेही विनोद कधी म्हणजे कधीच फनी नसतात गडे, केव्हा बरे अक्कल यायची तुला”. माझ्या मैत्रिणीच्या वस्तू आहेत त्यात.

"त्यांना काय, तुझीच पर्स मिळते का, कॉलेज काय म्हणतंय."

"काय म्हणणार आहे, चालूये, रोजचीच कटकट. त्या भदाणे बाई भेटल्या होत्या. त्यांना मी फारच आवडते अरे, सारखं माझं कौतुक करत राहतात."

"त्यांची हुशार, विद्यार्थिनी असशील तू"

तू यायला, बघायला पाहिजेस. नेहमी मलाच सल्ले देत बसतात.

"माझ्या डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत त्या, मला चांगलं माहीती आहे त्यांची."

"तू, लिहून दिलेला लेख पण दाखवला मी त्यांना, छान आहे म्हटल्या."

"माझ्या नावाने दाखवला नाहीस ना"

"नाही रे, पण खूप चांगला विचार मांडला आहे, असे म्हणत होती"

"होत्या" हं, बघू जरा..असे म्हणून केसांना लावलेला काटा तो सोडून टाकतो. जवळ सरकून बसत, तिचे चुंबन घेण्यास सुरुवात करतो. ती पण त्याच्या पाठीवर हात लावून घट्ट पकडते. चुंबनाला प्रतिसाद देऊ लागते. असे बऱ्याच वेळ त्यांचं सुरू राहते.

त्या रात्रीही पूनम आणि ज्ञाना बराच वेळ चॅटिंग करतात. त्यावेळी अगदी मग जेवली का, हे केलं का, ते केलं का इथपासून गप्पांचा ओघ सुरू होतो. जशी रात्र अधिक गडद होत जाते. तसा ज्ञानाची चुळबुळ वाढायला लागते. बेडवर एका कुशीला वळून तो तिच्याशी चॅट करू लागतो. तिला दुपारी केल्या किसबद्दल विचारतो. तिच्याकडून ही चांगली उत्तरे यायला लागतात. तो तिच्याशी संवाद साधू लागतो.

दुपारातील खुशमस्करी जाऊन तो आता गांभीर्याने तिच्याशी बोलत होता. मात्र त्याचा मूड अतिशय वेगाने बदलू लागला. त्याला मात्र आपल्यात काही बदल घडतोय याची जाणीव होतच नव्हती. त्याच्या मनात विक्षिप्त विचार यायला लागले, हे वाईट की चूक याचेही भान त्याला येत नव्हते. शरीरच्या सर्व जागी त्याने आपल्याच स्पर्शाने चाचपडून पहिल्या. वेड्यासारखा वागायला सुरूवात केली. उपड्याचा पालथा झोपला, अंगात फक्त आतले कपडे ठेवले. त्यानंतर पुन्हा पुनमशी मेसेज वर बोलायला सुरूवात केली.

"आपण जेव्हा किस करत होतो तेव्हा, माझा प्रॉब्लेम झाला ग"

"कसला प्रॉब्लेम" चक्कर आली होती की उलटी?

"होतो, माझा प्रॉब्लेम" बाय द वे, तू घरी जाऊन ओकली नाहीस ना बाई?

"कसला पण, सांग ना", इश्य काहीतरीच काय भलते

"अगं, कसे सांगावं तुला, मला कळत नाही, तू ओकलीस तरी जे खाल्ले अन्न आहे, त्याला जाग आणि ओक बाई, आपल्यात अजून *तसे* तार जुळले नाही”.

"ठीक आहे, नको सांगू" तुझं आपलं काहीतरीच बडबडणे असते बाई, कविता वगैरे अतीच, लेखक विशाल चावला काय तुला?

तिचा असा रिप्लाय वाचून ज्ञाना युट्युब उघडतो, एफ्यूसीके टाकतो. दोन चार व्हिडीओ येतात, ती प्ले करतो, काही व्हिडिओत नायक नायिका किस करत असतात, नायक नायिकेचे अंग पीळत असतो, समागम करत असतो. ते व्हिडीओ ज्ञाना पुनमला शेअर करत असतो.

"हे, काय ? काहीही काय पाठवतो आहेस" गलिच्छ, नालायक, बेशरम

"हाच तर प्रॉब्लेम आहे न, माझा ****पण इरेक्ट झाला होता, तुला किस करताना". गर्लफ्रेंडला नाही पाठवणार तर, भाजीवाल्या सखुला पाठवू का ?

"ओबीयसली, तसे होणारच ना", असे व्हिडीओ दाखवत जाऊ नको, मला नाही आवडत. कोणालाही पाठवू नकोस. कुणी पाहावे असे नाहीतच ते.

"हो, न तसंच होतं". काय करणार, साले हे वयच भलते. अवखळपणे वागते, खरे. मात्र मला जाणवते की प्रेमाच्या या सर्व पातळ्या आहेत, मोक्षापर्यंत जायचे तर ह्या सगळ्यातून जावे लागते.

असे म्हणून तो एक स्वतःचा फोटो पाठवतो. वाकुल्या दाखवणारा. ती त्याला विचित्र भाव दाखवणारी स्मायली पाठवते. त्यानंतर ज्ञाना बिछान्यातच स्वतःला शांत करतो आणि झोपी जातो. खूप वर्षांनी त्याला कुणावर तरी प्रेम करण्याची संधी मिळाल्याने, तो विक्षिप्त वागत होता, पण तरी त्यात त्याला काहीच चूक वाटत नव्हतं. वयही बरंच झालं असल्याने तो आजवर फक्त वाचत किंवा बघत आलेल्या, ज्याला साधारण भाषेत पॉर्न म्हणतात, त्या शरीर सुखाला प्रचंड आसुसलेला होता. काठीण्यपातळीवर जाऊन त्याच्या मानसिक संरचनेतच असा काही बदल घडून आलेला असतो. त्याचं वयही आता पंचविशीच्या पुढे होते, त्याचे वागणे हे नैसर्गिक यासाठी होते कारण ज्यासाठी तो आसुसला होता, ती गोष्ट त्याला योग्य त्या वयात मिळायला सुरुवात व्हायला हवी, तशी ती झाली नव्हती.

शमा सिकंदर नावाच्या एका अभिनेत्रीने तिच्या एका चित्रपटात हे दाखवले होते. एखाद्याची शारिरीक, मानसिक गरज, भूक ही प्रचंड असते, ती पूर्ण व्हावी, त्याला ती पूर्ण करता यावी, हा निसर्गतः त्याचा अधिकार असतो. या गोष्टींना समाजात तिरस्कृत नजरेतून पाहतो, याला कारण पिढ्यापिढ्या त्या समाजाची या गोष्टीला निव्वळ लांच्छन म्हणून बघण्याची खोड अतिशय मुळाशी जोडली गेली आहे. कायदाही या गोष्टींना फारशी समंती देत नाही. 

सकाळी उठल्यावर तिला मेसेज करून विचारलं, तुला राग नाही आला माझा, तिने नाहीच सांगितलं. तुला आवडतं, म्हणून मी सगळं करते. या बाबीचा ज्ञानाने चांगलाच फायदा घ्यायचा ठरवला. म्हणूनच, केवळ स्वतःच्या मनावर स्वतःचेच उपचार करून घ्यायचे म्हणून पूनमशी तो अतिशय लगट करे, तिचाही त्याला विरोध नव्हता.

यानंतर ज्ञानाचे पुनमशी असणारे संबंधच जणू बदलून गेले. पूर्वीसारखी प्रेम आणि ओढ काहीच राहिली नाही. पुनमला जरातरी त्याच्याबद्दल प्रेमभावना जिवंत होत्या, तरी त्याला ती आवडत नव्हती. म्हणूनच ज्ञानाने आता फक्त शारिरीक सुखासाठी तिचा वापर करायचा, मौज करायची असे ठरवले. त्यांचे या विषयावर अगदी बेधडक बोलणे होत असायचे, मात्र दोघेही एकमेकांना द्यायचे तो शरिराचा निखळ आनंद, कोणतीही मर्यादा उल्लंघून न टाकता, ते एकमेकांत गुरफटून जात.

ते खूप मजा करत असत. रात्रभर बोलत. निव्वळ निखळ प्रियकर आणि प्रेयसी म्हणून जगत. एकदा आकाशवाणीसाठी म्हणून त्यांनी नगरीच्या थोडे बाहेर जाऊन, जिथे डोंगरावर खूप मोठी झाडे लावली होती, तिथे जाऊन आले. त्यानंतर मिसळ तर त्यांनी बऱ्याचवेळेला खाल्ली होती. एकदा त्या रॉकगार्डनला त्यांनी एका पोलिसाने पकडले होते. तेव्हा त्याला शंभर रुपये देऊन त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली होती. तिथे मग तो पोलीस त्यांच्या सहकाऱ्यांसह जेवायला बसला होता. असे दिवस अतिशय आनंदात त्यांनी घालवायचे ठरवले होते.

‘आजच्या दिवशी’

“सर, पोस्ट मोर्टेम अहवाल आलाय, हवालदाराने इन्स्पेक्टर श्रेणिक यांना सांगितले.” हवालदार शेवडे नाकावर येत असलेली टोपी वर सरकवत, पाय दाणकन आपटून, नेहमीच्या शैलीत सलाम ठोकत म्हणाले.

“दाखवा बघू”, काय आहे त्यात ? श्रेणीक यांनी उत्सुकतेने त्यांनाच पुन्हा विचारले.

इन्स्पेक्टर श्रेणीक यांनी अहवाल तपासायला घेतला. पूनम हिचा मृत्यू आत्म्हत्येनेच झाला होता. पण, मग पूनमने चिठ्ठीत दोन जणांची नावे का लिहीली असावीत. जर आत्महत्या तिला एकटीलाच करायची होती. हायवेवर गाडी समोर येऊन, त्याही आधी विष खाऊन जर तिला एकटीलाच मारायचे होते, तर तिने ही चिठ्ठी का लिहीली असावी, या मुलाशी तिचा कोणते नाते आहे, हा मुलगा आता कुठे आहे, याचा तपास लागायला हवा. यासाठी आता साखरदांडे यांनी पूनम ज्या कॉलेजला शिकत होती. तिथे जायचे ठरवले. मात्र, त्यांना कोणीही ओळखू नये, या हेतूने त्यांनी वेषांतर करून जाण्याचे निश्चित केले. श्रेणीक साखरदांडे यांच्याकडे एका तोतया पत्रकाराचे आयडी कार्ड तसेच होते, तपासाकरिता त्या जप्त वस्तूचा योग्य उपयोग करून घ्यायचे त्यांनी पक्के केले. पोलीस स्टेशन सोडून त्यांनी थेट कॉलेज गाठले. ज्या वर्गात पूनम शिकत होती, त्या वर्गात ते गेले. मात्र वर्ग, रिकामा होता. त्यामुळे त्यांनी कोणाच्याही चौकशीला उत्तर न देता, आपण चुकून इथे आलो असे हावभाव अगदी बेमालूमपणे चेहेऱ्यावर आणले. वर्गात कुणी न सापडल्याने श्रेणीक यांनी आपला मोर्चा कॅन्टीनकडे वळवला. तिथे दोन मुली मिसळ खात बसल्या होत्या. श्रेणीक यांनी त्याच्या बाजूच्या टेबलावर बसून, दोन समोसे आणि चहाची ऑर्डर दिली.

“चिनू, पूनमने असे का केले असेल गं?’’

“तू जरा, हळू बोलशील का? इथे कोणाला समजू नको देऊस.

“नाही, चिनू आपल्या पूनमला न्याय मिळायलाच हवा.”

“हो, वृषाली तुझ्या-माझ्या सोबत इतके वाईट वागली ती, आपल्या दोघींचे त्या अवस्थेत फोटो काढले, तरीही तू तिच्या न्यायाची आस धरून आहेस..वा ! बेवफा”

“पूनमने जे केलं, ते खरोखर अशोभनीय होतेच गं, पण त्यात तिची चूक तर नव्हती, तिच्यावर त्या नराधमाचा भावनिक दबाव जो होता”

“तू अजून पाव घेणार आहेस? रीसेस संपायला पंधरा मिनिटे आहेत.”

“काका, दोन पाव सांगा” चिन्मयी ..

“हे बघ, मला जरा या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा संशय येतो, आपण हॉस्टेलवर जाऊनच बोलू या विषयावर.. वृ आता गुमान मिसळ संपव.

यानंतर इन्स्पेक्टर श्रेणीक आपला चहा संपवून तिथून निघून गेले. कॉलेजला असल्यासारखे ते काही दिसत नव्हते. शिवाय त्यांना कधी कॅम्पसमध्ये न बघितल्यामुळे मुलीना त्यांच्यावर संशय येत होता. मात्र, श्रेणीक साखादांडे ज्या कामासाठी तिथे आले होते, ते जवळपास झाले होते. पूनम हिने तिच्या आयुष्याला पूर्णविराम का दिला, जीवनयात्रा का संपवली. यामागे पुनम ही स्वतःला अपराधी समजायला लागली असल्याचे कारण असू शकते. या दोन मुली ज्यांचे नावे वृषाली आणि चिन्मयी आहे यांना खूप मोठा त्रास पूनम आणि तिच्या मित्राने दिला त्यामुळे, तिच्यातील नैराश्याने जीव द्यायला भाग पाडले. असे ढोबळ आडाखे श्रेणीक यांनी आपल्या मनाशी बांधले. बुद्धिमान असल्यामुळेच त्यांना कोणत्याही प्रकरणाची नाडी ओळखणे अचूक जमत होते. फक्त आता, पूनम हिला त्रास देणारा मुलगा, जो या आत्महत्येस खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरला होता. त्याचा तपास श्रेणीक यांना करायचा होता.     

कॉलेजमधून त्यांनी इन्स्पेक्टर श्रेणीक यांनी मूळ रूप धारण करायचे ठरवले. कॉलेजमधून त्या मुलींच्या होस्टेलचा पत्ता मिळवला. कॉलेजपासून मागच्या बाजूस एक मोठा रस्ता जात होता. मोठ्या रस्त्याला लागूनच एक जॉगिंग पार्क होता. त्याच्यासामोरच्या गल्लीत एका जांभळ्या रंगाच्या इमारतीतच त्या मुली राहत होत्या. वृषाली, चिन्मयी आणि पूनम, जी आता तिथे राहण्यासाठी कधीच येणार नव्हती. श्रेणीक तिथे पोहोचले आणि दरवाजा वाजवला. अगदी कोणीतरी जवळचे आले असेल म्हणून चिन्मयीने अनवधानाने दरवाजा उघडला, आणि ताबडतोब लावून घेतला. इतक्या चपळाईने दरवाजा लावताना बघून वृषालीही घाबरली, त्यांनी एकमेकाकांना खुणेनेच, कॅन्टीनमध्ये दिसलेला तोच विचित्र माणूस असल्याबद्दल सांगितले. त्यानंतर हाताच्या मुठीत डब्यातील लाल तिखट पावडर घेतली. दाराच्या दिशेने हात नेला, दार उघडले.

“नमस्कार, मी इन्स्पेक्टर श्रेणीक साखरदांडे”, वृषालीला बोलण्याचा चान्सच न देता ,साखरदांडे यांनी अगदी दमदार एन्ट्री घेतली. त्यांना मग बैठकीवर बसवून, पाणी दिले. मिरची पूड घाबरून तिथेच पडली असल्याचे श्रेणीक यांच्या लक्षात आले, पण पोरींच्या डेरिंगचे कौतुक पण वाटले.

“मला, तुमच्या मैत्रिणीच्या आत्महत्येबद्दल तुम्हाला सांगायचे आहे, थोडी चौकशीही करायची होती”.

“काय ? कोणाच्या आत्महत्येबद्दल बोलताय, आपण ?”

पूनमच्या , श्रेणीक यांनी तत्काळ उत्तर दिले.

“पण, आमची का चौकशी, आमच्याकडून काय माहीती हवी आहे.”

“हे बघा, मला माहीत आहे की, पूनम याच घरात राहत होती. तुमच्यासोबत तिचे काही मतभेद किंवा भांडण झाले त्याचीच खंत वाटल्याने तिने आपले जीवन संपवले . तुम्ही मला, मदत कराल तर तिच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या प्रत्येक गोष्टीचा तपास लावण्यास सोपे जाणार आहे. तेव्हा माझी मदत तुम्ही कराल, अशी मला अपेक्षा आहे.”

जरा वेळ वृषाली आणि चिन्मयी यांनी विचार करण्यात घालवला. तोपर्यंत वृषालीने चहाचे अधाण ठेवले. तर, चिन्मयी मात्र आता, आलेच म्हणून जिना उतरून खाली पळाली.

“चहा, वृषालीने चहाचा कप पुढे करत म्हटले.

“ही, बिस्किटेही तुम्हाला खायला आवडतील.” चिन्मयीने दारातून येतच पुटपुटले.

“सर, बाकी तुम्ही अगदी हुशारीने आमची चौकशी आमच्याच घरात करणार असे दिसतेय?’’ मिणमिणे डोळे करुन वृषालीने श्रेणीक यांना प्रश्न विचारला.

“ ती, सायरनची जीप इथे येऊन, तुम्हाला या कॉलनीमधील लोकांच्या कदाचित माझ्या चौकशीपेक्षाही जरा जास्तच अवघड चौकशीला सामोरे जायचे असेल, तर मी जीप घेऊन येतो.”

या उत्तराने सावध होत, जरा बिचकतच चिन्मयी पुढे आली, “काहीही काय सर, ही वृ ना, हिला कळतच नाही, काय बोलावं ते.” नंतर खुणेनेच दोघी एकमेकांत भांडत बसल्या.

“दोघा बहिणींचे चांगलेच गुळपीठ आहे तुमचे”.

वृषाली यावर खो-खो हसायला लागली. तर चिन्मयीने श्रेणीक यांना समजावण्याचा सूर सांगत बोलायला लागली.

“नाही सर, आमचं ते पवित्र नाते आहे, जे हा समाज कधीच मान्य करणार नाही. अगदी निरपेक्ष आणि निर्मळ भावना आमच्या दोघींच्यात आहेत. एकमेकांत इतके सरमिसळलो आहोत, जणू की एकमेकांसाठीच आमचा जन्म झाला आहे. बाहेर कुठेही आम्ही त्याचे प्रदर्शन करण्याचे टाळतोच. मात्र जेव्हा संधी मिळते, आमच्यासारख्या अनोख्या निष्पाप लोकांच्यात आमचं नातं न लपवता जगण्याची, ती आम्ही कधीच चुकवत नाही. वुई आर प्राउड लेस्बियन्स.”

“ओह, छान. पण हे सगळं, असे एकदम मला सांगायची काहीच गरज नव्हती”.

वृषालीही आता मनमोकळेपणाने बोलायला लागली. “होती सर, कारण आमच्या नात्याचा या पूनमच्या आत्महत्येशी अगदी निकटचा संबंध आहे, तो जो स्वतःचे नाव ‘ज्ञाना’ म्हणून सांगतो. त्याने आमच्या या नात्याकडे इतर लोकांसारखेच हिडीस नजरेने पाहिले. लांच्छनास्पद वागला तो, बिचाऱ्या कोवळ्या जुईच्या कळीप्रमाणे असणाऱ्या पूनमशी, अन आमच्याशीही”.

“म्हणजे, मी काही समजलो नाही”. हा कोणता साहित्यिक आहे, जो मिसळीबद्दल असे लिहू धजतो की, अमुक अमुक शहरातील मिस्ल्प्रेमिंचे प्रेम इतके उत्कट आहे की, मिसळ समोर बघितल्यावर ते कोणाचेही राहत नाही.”

“सर, विषयांतर नको ना, ते कोणीतरी विशाल नावाचे लेखकमहर्षी स्वतःला चांगला खर्डाही लिहिता येत नसेल दिवसातला, पुस्तकांतून काहीबाही छापून आणत असतो, ही चिन्मयी वाचत बसते, तर सर आमच्याबद्दल तुम्ही कुठेही सांगू नका, लोकशाहीची पाती सध्या कमकुवत झाली आहेत, आमची मुळासकट उपटणी व्हायची मग. वृषाली बोलत होती, तर चिन्मयी तिच्या बोलण्याला समर्थन केवळ डोळ्यातूनच देत होती.

“ठीक आहे, आता मला तुम्ही सगळं पहिल्यापासून समजावून सांगा, नक्की तुमच्याबाबतीत काय घडले.”

वृषाली सरसावून बसली. तिने बोलायला सुरुवात केली. त्या दिवशी, पूनम रूमवर आली होती. आम्ही जेवतच होतो. पूनम आल्याचे पाहून मी तिलाही एक ताट बनवले. तिघी खाली भारतीय बैठक मारून बसलो. त्यावेळी तिने त्या ज्ञानाचा ‘खर्रर्र छ जुप्या’ चा फोटो दाखवला. मोठ्या उत्साहात सांगायला लागली, की “आज त्याने मला प्रपोज केले, मीही त्याला हो म्हणून दिले.”

 “बरं, मग पुढे काय झालं. तितक्यात काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने वृषाली बघायला म्हणून आत गेली. त्यामुळे पुढची गोष्ट सांगण्याची जबाबदारी चिन्मयीवर आली. ती म्हणाली.

“सर, पुढे मी पूनमकडून तिचा मोबाईल हिसकावला.

“ओह्ह, मग त्यात काय आक्षेपार्ह आढळले ?”

“बरंच काही, मात्र त्यांचे नाते इतकं पुढे आल्यामुळे, जसे मेसेजेस असावेत तसेच होते. त्यामुळे आम्ही काही फार लक्ष दिले नाही, बाकी तिने मात्र त्याचे कौतुक करण्याची एकही संधी सोडली नाही.”

तेवढ्यात आतून हात-पाय पुसत वृषालीही आली. बरणी फुटल्यामुळे तिला थोडी साफ-सफाई करावी लागली होती. “पण सर, जो जसा दिसत असतो, तसा नसतोही”.

“बरं, यानंतर मला हे सांगा, की ज्या दिवशी वृषाली या घरातून बाहेर पडली, आत्महत्येसाठी त्या दिवशीचा दिनक्रम काय होता सगळा. मला जरा तो नीट आठवून सांगा.”

“नाही सर”, चिन्मयीने आता श्वास घेत नाराजीचा सूर लावला होता. तो आमच्या   आयुष्यातला अत्यंत काळाठीर्र दिवस होता हे खरं आहे, पण तो फक्त तिच्या शेवटाचा दिवस होता.

वृषालीलाही आता भडभडून आले. “खरंतर तिने तिच्या मृत्यूला आमंत्रण त्याच्या पंधरा दिवस आधीच दिले होते” असे म्हणत तिने धाय मोकलून रडायला सुरूवात केली.

“आम्ही एकमेकिंशिवाय नाही जगू शकत सर. ज्याप्रमाणे सामान्यतः एखादे जोडपे आपल्या अंतरिक प्रेमळ भावनांना शेवटी कामोत्सुकेने वळण देतात, तसेच आम्हीही एकेमेकींच्या प्रेमात चिरंतर मश्गुल होऊन आकंठ सुखात बुडण्याचा अनुभव घेत होतो.” हे सर्व घडताना मात्र चोरून आम्हाला कॅमेऱ्याच्या लेन्समधून आमची मैत्रीण न्याहाळत होती, कैद करत होती, मात्र आम्ही या कुत्सित आणि क्रूर मैत्रीच्या चेष्टेपासून कोसांवर एकमेकांत रममाण होतो.”

“हम्म, आता मला या गुन्ह्यातील गोम लक्षात यायला लागली आहे” श्रेणीक साखरदांडे यांना त्यावेळी त्या मुलींवर कीव आली.

“काही दिवसानंतर मी सहज तिचा मोबाईल चेक केला. तेव्हा आमचे काही फोटो पूनमने ज्ञानाला पाठवल्याचे आढळले. त्यावर त्याने अत्यंत अश्लील भाषेत टिपणीदेखील केली होती. मात्र यानंतर जणू या घरात मी रणशिंग फुंकले. पुनमची चांगलीच कानउघडणी केली. खोदून खोदून विचारत तिला सत्य वदून घेतले. वृषालीने आता चिन्मयीच्या खांद्यावर आधारभूत हात ठेवला. डोळ्यातले पाणी पुसत तिने सांगायला सुरूवात केली. भडभडा मी तिला खूप काही सुनावले. खूप काही बोलले, एवढेच नाही तिच्या कानशिलातही एक सणसणीत चपराकही ठेवून दिली.

“तुम्ही या गोष्टीची पोलीस स्टेशनला तक्रार का नाही दिली ?”

“त्या भाबड्या मुलीचे करीयर बिघडू नये म्हणून” इति वृषाली.

“पण, काहीतरी मार्ग काढायला हवा होता, त्याच्यापासून तुम्ही रोखले का नाही ?” साखरदांडे उवाच.

“काढला कसा नाही, सोडेल कशी? चिन्मयी त्वेषात येऊन म्हणाली. मी तिच्याकडून शपथ वदवून घेतली, की पुन्हा त्या ज्ञानाला कधीच भेटणार नाही.”

“तरीही, नाही सुधारली ना ती” श्रेणीक

वृषाली बोलायला लागली. “यामुळे आम्ही तिच्याकडून हे लिहूनच मागितले होते. मात्र अखेर रडण्याचे इतके बेमालूम नाटक केले, की आम्हाला पाघळून पुन्हा तिलाच धीर द्यावा लागला”.

“अच्छा, मग या प्रकरणाच्या दरवाज्याला अशी कोणती नवी कडी घातली गेली, की पूनमने आपल्या आयुष्याचे घरच एकदम उध्वस्त करून टाकले.”

चिन्मयी, जरा खुदकन हसली, “सर. साहित्यिक फक्त विशाल हेच”. तुम्ही कोणतीही कोटी बनवू नका”.

जरा हडबडून जात श्रेणीक यांनीही मग, “अच्छा, मला सांगा तिने आत्महत्या का केली”

“अहो आता काय सांगू, आम्हाला नंतर कळले, की शपथ घेऊनही पूनम आणि ज्ञाना एकमेकांशी मेसेज करून बोलत असतातच. मग आम्ही याबद्दल एकदा विचारले, तेव्हा तिने सांगितले “त्याला, त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे म्हणून. मग दोन दिवस आम्ही तिच्याशी अबोलाच केला. तिच्या पहिल्या शपथ प्रकरणानंतर कॉलेजच्या अभ्यासात मग्न होतो. दोन दिवस अबोला होता, पण एके दिवशी सकाळी, “मला तुमचा खूप आधार आहे गं” असे समजुतीच्या स्वरात बोलली. इतकी लाघवी बोलायची की आमच्या दोघींच्याही गळ्यात पडून रडली, आणि बाहेरच गेली. ती जे गेली ना, बेपत्ता झाली. तर आज सकाळीच तिच्याबद्दल असे काही समजले.”

 “आता सगळं काही मला स्पष्टपणे लक्षात आले आहे. हे प्रकरण काय आहे, कसे घडले आहे.” इन्स्पेक्टर श्रेणीक साखरदांडे यांच्या चेहेऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण चमक दिसू लागली. त्यावेळी त्या मुली मात्र निर्विकार त्यांच्याकडे बघत होत्या. सामान्यतः जेव्हा श्रेणीक असे हासत असे, कांबळे, शेवडेच काय त्यांच्याकडे बघणाऱ्या कोणालाही, अगदी कोणालाही आपल्या चेहेऱ्यावर स्मित येण्यापासून रोखता येत नव्हते. मात्र त्या मुली अगदी स्वच्छ मनाने, त्यांना बघत होत्या.

काही वेळ शांततेच निघून गेला. त्यानंतर श्रेणीक यांचा फोन वाजला, त्यांनी तो कट केला. त्यानंतर त्यांच्या स्टेशनमधून फोन आला. त्यांनी तो उचलला.

“बोला शेवडे, काय खबरनामा, वचा जरा तक्रारींचा पाढा, फिरवा तुमच्या डोक्याचा घाना.”

“माफ करा सर, तुम्ही कामावर असताना इतकं गंभीर-विनोदी, नरम नरम कसे काय बोलू शकता ? अहो वहिनीसाहेबांचा फोन आला होता, जेवणाचा डबा घरीच विसरून आलात तुम्ही”.

“हो, हो शेवडे तुमच्या या सवयीमुळे माझ्या बायकोनंतर मला सगळ्यात जास्त फोन करणारे तुम्हीच, अहो कधी स्वतःच्या घरीही फोन लावत जा, एखाद्या वेळी चमेली-मोगरांचा गजरा न्या”

“कल्पना उत्तम आहे सर. ती, प्रेमाने बोलतच नाही माझ्याशी कधी, सदानकदा डाफरत असते.”

“नुसतं, सुटलेलं पोट घेऊन घरी जाता, च्यायला आरती ओवाळेल का तुमची”. सोडा ! वहिनी फार रागात नव्हती ना तुमची ?

“नाही, विचारत होती, आजही डबा घ्यायला येणार की मोत्याला मेजवानी घालू ?”

“शेवडे जरा हळू बोला हो”.

“एक मिनीट साहेब, कंट्रोल रूमवरून मेसेज आहे”.

“साहेब, नदीच्या काठावर एका मुलाचा मृतदेह वाहून आला आहे, तरूण आहे साहेब. पाकीटात ज्ञानेश नावाची आयडी मिळाली आहे.”

“व्हॉट ? ओह नो, तुम्ही पोहोचा तिथे मी निघतोच,”

  वृषाली आणि चिन्मयीला श्रेणीक साखरदांडे ज्ञानाच्या घरी जाऊन चौकशी करण्यास सांगतात. त्या दोघीही लगबगीने निघतात.

“सोहम. अरे,  ज्ञाना....” ? वृषालीचे बोलणे मध्येच तोडत

“अरे, पूनम आणि ज्ञाना इतक्यातच बाहेर गेले आहेत, मला म्हणाले आईसक्रीम आणायला जातो. तुम्ही या ना, हे काय पोलिसांना का घेऊन आलात.”

“बाळ सोहम, मी इन्स्पेक्टर साखरदांडे, आम्ही तुला काहीतरी सांगायला आलो आहोत, पण ते ऐकून कदाचित तुला मोठा धक्का बसेल”.

“मी काही समजलो नाही सर, काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला अचानक भीती वाटायला लागली आहे तुमची!”

“वृषाली” . साखरदांडेनी त्याला सावरायला खुणवले.

“सोहम, पूनम आणि ज्ञाना आता या जगात नाहीत”. 

“काय, बोलताय सर तुम्ही, मी का ऐकून घेतोय तुमचं. आहो आता माझ्या डोळ्यापुढे ते आईस्क्रीम घेऊन येतो तुला म्हणून बाहेर गेलेत, थांबा मी ज्ञानाला फोनच लावतो कसा.”

 ज्ञानाला तो फोन लावतो. मात्र रिंग वाजते ती साखादांडे यांच्याकडे असलेल्या प्लास्टिक पिशवीतून. त्याच्यासमोर ते फोन धरतात. धक्का लागून सोहम खाली बसतो.

इन्स्पेक्टर साखरदांडे सोहमला सांगू लागतात. इकडे वृषाली आणि चिन्मयीच्या डोळ्यातही अश्रूधार वाहू लागते.

“तुला झाला तो फक्त त्या दोघांचा भास होता. शेवटचे तुला भेटायला आले होते. या जगात काही गोष्टी अतार्किक वाटल्या तरी खऱ्या असतात मित्रांनो. आपल्या विकृतीमुळे इतकं वाईट वागूनदेखील, सोबतीने मरायला आलेल्या प्रियकराला चुकवून पूनमने आत्महत्या केली. तर पुनमचे त्याच्यावरचे हेच प्रेम पाहून तिला छळणारा, तो वेडा, भ्रमिष्ट मनुष्यदेखील पस्तावला. बदलला, अन त्यानेही तिच्याप्रेमापोटी स्वतःचा जीव नदीत टाकून दिला. मेला तो, पण आजही माणुसकी संपत चाललेल्या या जगात प्रेम जिवंत आहे, हा धडा शिकवून गेला. त्याच्यातील मानसिक संरचनेत होणारे अफलातून बदल हे त्याला विकृतीच्या बक्कळ अंमलाखाली आणत होते, पण खऱ्या प्रेमानेच पुन्हा त्याच्यावर मात केली, विकृती हा काय आजार नाही, मनाचा विकार आहे, अनेकवेळा प्रेमाने त्याला बरे करता येते. येतो मी. स्वतःची काळजी घ्या”.

असे म्हणून इन्स्पेक्टर साखरदांडे निघून गेले. वृषाली, सोहम आणि चिन्मयी उदास होऊन स्वतःकडेच विषिन्न बघत बसले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy