Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

SWATI WAKTE

Inspirational


4.4  

SWATI WAKTE

Inspirational


अनय

अनय

2 mins 1.8K 2 mins 1.8K

अनय एक दहा वर्षाचा मुलगा.त्याचे आई वडील दोघेही तो आठ वर्षाचा असतांना एका कार अपघातात मरण पावतात. अनय एकुलता एक मुलगा असतो. आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचे काका, काकू अनय च्या घरात रहायला येतात.ते त्याच्या aai,बाबाच्या घरावर,शेतावर पूर्ण ताबा मिळवतात.त्याच्या काका काकूला दोन मुले असतात .एक दहा वर्षाचा आणि एक आठ वर्षाचा असतो.काका, काकू अनय ला चांगली वागणूक देत नाहीत. आई, बाबा गेल्यावर अनय ला त्याच्या aai,बाबांच्या वस्तूला कुणी हात लावलेला आवडत नव्हता. पण त्याच्या आईच्या कपडे, सोने हक्काने वापरत असे. काकाही त्याच्या बाबाच्या वस्तू वापरत. एव्हडेच काय अनय एकुलता एक असल्यामुळे त्याच्या आई, बाबाचा खूप लाडका असतो. त्यामुळे त्याच्याकडे खुप सारी खेळणी, कपडे असतात. ते सर्व त्याचे चुलत भावांना काका, काकू देतात. अनय रडला,चिडला की काका, काकू त्याला मारहाणही करतात.


काकू अनय ला घरातील कामेही करायला lavte..झाडू मारणे, फरश्या पुसणे कपडे वाळत घालणे. काकाही बाहेरची कामे सांगतात. अनय च्या आई बाबांनी त्याला चांगल्या शाळेत प्रवेश दिला असतो पण काका काकू त्याला आई बाबांच्या मृत्यू नंतर महानगर पालिकेच्या शाळेत घालतात. आणि त्यामुळे त्याच्या फी चे पैसे वाचतात. त्याला त्या शाळेतील मुलेही त्रास देतात.त्याला ह्या सर्व गोष्टीची सवय नसते म्हणून अनय एकदा अनय कंटाळून रडत घर सोडून वाट मिळेल तिकडे निघतो. चालता चालता खुप अंधार होतो.तो एका जंगलात पोहचतो.खुप दमल्यावर एका झाडाखाली बसतो. अचानक रडता रडता त्याला दिसते की एक सावली वेगाने त्याच्या दिशेने येत आहे. अनय खुप घाबरतो, ओरडतो पण जंगलात कुणी त्याच्या मदतीला नसते. ती सावली त्याच्या पर्यंत पोहचतेच तोपर्यंत त्या मागून सुंदर पंख असलेली परी येते व त्या सावलीला पकडून मारते.आणि अनय ला जवळ घेते. खुप अनय चा लाड करते.अनय ला त्या परी जवळ खुप छान वाटते. परी अनय ला म्हणते. बाळा मला तुझ्या बद्दल सर्व माहिती आहे. तु रडू नकोस, घाबरू नकोस...


अनय म्हणतो तु कोण आहेस बेटा मी परी आहे.आणि तुझ्या मदतीला आले. अनय म्हणतो. मग मलाही तुझ्या सोबत घेऊन चल. मला इथे कुणीच नाही. परी म्हणते नाही बेटा असे नको बोलूस.. मी तुला घरी सोडते. अनय म्हणतो नको मला नाही जायचं त्या घरात. बेटा ते घर तुझेच आहे. तुझ्या आई बाबा ने तुझ्या साठीच घेतले आहे. अन्याय सहन करू नकोस. अन्याय करणे जसे पाप आहे तसेच तो सहन करणे ही पाप आहे. तुझ्या मदतीला मीही तुझ्या बरोबर येते. तु असा तिथून पळ काढला तुझ्या आई बाबांना आवडणार नाही. परी अनय ला घरी घेऊन येते. आणि त्याच्या काका, काकु ला चांगली अद्दल घडविते.


अचानक काका, काकु अनय शी चांगले वागायला लागतात.त्याला परत चांगल्या शाळेत घालतात..


Rate this content
Log in

More marathi story from SWATI WAKTE

Similar marathi story from Inspirational