Hari Das

Drama Romance Fantasy

4.3  

Hari Das

Drama Romance Fantasy

अनपेक्षित लाभ!

अनपेक्षित लाभ!

6 mins
1.1K


दुपारी साडेचारची वेळ.. संजय पुणे गाडी पकडण्यासाठी बसस्टँडवर आला. स्थानकावर नेहमीची वर्दळ पसरलेली..त्यातच डिझेलचा टिपीकल वास, मुताऱ्यांचा दर्प आणि न कळणाऱ्या सुरात केली जाणाऱ्या अनाउन्समेंटने आल्याआल्या संजयला मळमळायला लागलं. एसटीचा प्रवास त्याला मुळीच आवडायचा नाही. दुसरी काही व्यवस्था असती तर पैसे कितीही जास्त पडले तरी त्याने तो मार्ग निवडला असता, इतका त्याला या प्रवासाचा तिटकारा. पण, नाईलाज होता. साकेगाववरुन पुण्याला जायचं म्हटलं की, 'परिवहन महामंडळाची बस' हा एकमेव मार्ग. त्यामुळे मन मारून, अन नाकाला रुमाल बांधून, त्याला एसटी स्टँड वर यांवचं लागायचं.


तसं बघायला गेलं तर संजय कुणी 'बडे बाप का बेटा' किंव्हा सुखवस्तू घरातून आलेला नव्हता. सर्वसामान्य शेतकऱ्याचाचं तो मुलगा. नुकतेच डिग्री घेऊन पुण्यातील एका कंपनीत तो नोकरीला लागला होता. त्यामुळे, साकेगाव ते पुणे हा त्याचा प्रवास आता नित्याचाचं. दर दहा-पंधरा दिवसाला त्याला साकेगावला आपल्या घरी चक्कर टाकावी लागायची.. शनिवारी घरी यायचं आणि रविवारी संध्याकाळी निघायचं, हे त्याचं शेड्युल. आजही पुणे जाण्यासाठी तो बस स्टँड वर आला होता. गाडी लागायला अवकाश असल्याने बाजूलाच असलेल्या नवनाथ रसवंतीच्या सावलीत तो उभा राहिला. रसवंतीतुन येणाऱ्या 'खुळ्ळुक खुळ्ळुक’ च्या आवाजाने त्याचे लक्ष तिकडे वेधले. तप्त उन्हाळ्यात थंडगार ऊसाचा रस पिऊन तृप्त होणारे चेहरे न्याहाळत असतांना एका चेहऱ्यावर त्याची नजर खिळून राहिली.


गंभीर विचारात गढून गेलेली 23-24 वर्षाची एक युवती शून्यात नजर टाकून बसली होती. सावळा रंग पण नाकीडोळी आकर्षक. अंगावर साडी, नुकतंच लग्न झालेल्या नवविवाहिते सारखे अंगभर दागिने. चेहऱ्यावर हलकासा मेकअप, हातात कॉलेजच्या तरुणी वापरतात तशी स्टाईलिश हँडबॅग, हेअरस्टाईलही आधुनिक. ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा संगम झालेलं सौंदर्य पाहून संजयची मळमळ कुठल्याकुठे पळून गेली. जास्तवेळ असं एकटक पाहणं बरोबर नसल्याने सौंदऱ्याचा रसपान करणारे डोळे संजयने दुसरीकडे वळवले. इतक्यात, डेपो मधून पुण्याची बस आली, आणी सगळे तिकडे धावले. चार तासाचा प्रवास उभ्याने करण्याची इच्छा नसल्याने संजयही गर्दीतून वाट काढत बसमध्ये घुसला. खिडकीची जागा सांभाळून बसतो ना बसतो तोच..


"माझ्यासाठी एक जागा ठेवाल का प्लीज !"


मघाशी बघितलेली तरुणी अजयला विचारत होती. 


"हो, आहे की जागा, या तुम्ही सावकाश"


अस सांगून संजयने पूर्ण शीट आवरली. गाडीत तोबा गर्दी असल्याने जो तो जागेसाठी भांडण करत होता. पण संजय ने यशस्वी किल्ला लढविला आणि एक जागा त्याने राखून ठेवली धक्काबुक्की करत अखेर ती सुंदरी एसटीत चढली आणि संजयच्या बाजूने येऊन बसली.

'आजचा प्रवास कंटाळवाणा होणार नाही' मनातल्या मनात सुखावत संजयने बोलायला सुरुवात केली.


"तुम्हाला खिडकीकडून बसयाचं असेल तर तुम्ही बसू शकता बरं..!"


संजयने आपला दिलदारपणा उघड केला.


'नाही, सध्या ठीक आहे..!'


तोच तो मंजुळ आवाज.


पुढे काय बोलावं?, हे काही संजयला कळलं नाही. लगेच ओळख करुन घ्यायला गेलो, आणि तिला नाही आवडलं तर शेजारी बसण्याचं सुखही हिरावल्या जायचं. सुरवात कशी करायचं याचा विचार करत असतांनाच पुन्हा तो मंजुळ आवाज त्याच्या कानावर पडला.


"हा एसटीचा प्रवास ना..मला मुळीच आवडत नाही. एक तर हे ऊन अन त्यात ही गर्दी. आज तुम्ही होते म्हणून जागा मिळाली नाहीतर माझी काही धडगत नव्हती.."


वेगळ्या प्रकारे का होईना, सुंदरीने संजय चे आभार मानले.

संवादाला सुरवात झाल्याचे पाहून संजयची भीड चेपली.


"असा प्रवास कुणाला आवडेल? पण काय करणार नाईलाज आहे..!"


"बाय द वे, तुम्ही साकेगावच्या आहात का?"


"हो, आता तसंच म्हटलं पाहिजे.. माझा नवरा साकेगावचा म्हणजे, माझं ही गाव तेच.."


"अरे वा, छान आहे. मग पुणे तुमचं माहेर असलं पाहिजे."


औपचारिक चर्चेत दोघांची चांगलीच ओळख झाली. तृप्ती, संजयला घायाळ करणाऱ्या त्या सुंदरीचं नाव तृप्ती होतं. मूळ पुण्याची असलेल्या तृप्तीचा आठ महिन्यापूर्वी विवाह झाला होता. नवरा मुंबईत नोकरीला. तिथं राहण्याची अद्याप सोय नसल्याने तृप्ती सध्या पुण्यात आपल्या माहेरीचं राहत होती. गेल्या आठवड्यात तिची सासू आजारी असल्याने 'सून' धर्म निभावण्यासाठी ती साकेगावला आली होती, आणि आता परत निघाली होती. बोलका स्वभाव असल्याने दोघांचीही एकमेकांशी चांगलीच गट्टी जमली. घरगुती गप्पांपासून ते कॉलेजकट्यावरच्या जुन्या गोष्टींना उजाळा देऊन झाल्यानंतर बोलण्याचा रोख थट्टामस्करी कडे वळू लागला होता.


"मग काय, मजा आहे तुमची. विद्यानगरी तुन थेट मायानगरी त झेप घेतली.."


संजयने मिश्किल नजरेने पाहत तृप्ती ला छेडले.


"कसली मजा नी कसलं काय? आठ महिने झाले त्याला राहण्याची जागा शोधता आली नाही अजून. विकेंड ला यायचं म्हटलं, तरी हजार कामं सांगतो तो.."


"हो.. मग तृप्ती 'तृप्त' झाली नसेल अजून..!"


 वाक्य तोंडातून निघालं अन संजय ओशाळला..


 "सॉरी, म्हणजे मला वेगळ्या अर्थाने म्हणायचं होतं.." त्याने खुलासा केला. 


"त्यात काय इतकं.." 'खरंच आहे ते..'


"पण, तुमच्या नजरेला मानलं पाहिजे..!" "महाभारतातल्या संजय ला कुरुक्षेत्रवरचं दिसयाचं या संजयलाही अगदी मनात उतरता येतं..!"


'तसं काही नाही..मी आपला एक अंदाज लावला'


 हसत हसत संजय ने उत्तर दिलं.


"मला वाटलं, खरंच दिसतं की काय तुम्हाला?

इतकं रोखून बघत होतात..म्हटलं काही दिसलं असेल तुम्हला.


'रोखून..?' संजय बवरला


'बस स्टँडवर हो' खट्याळपणे हसत तृप्ती म्हणाली.


चोरी पकडल्यासारखा त्याचा चेहरा झाला. इतक्यात गाडी शिवाजीनगरकडे वळत असताना अचानक तृप्ती उभी राहिली..खिडकीतून वाकून "ते बघा आमचं कॉलेज..' पण वाकताना संजयच्या मांडीवर अनावधानाने नेमका नको तिथं तिने हात ठेवला. तृप्तीचा चेहरा गोरामोरा झाला. काय बोलावं दोघांनाही सुचेना. तिने एक चोरटा कटाक्ष संजयकडे टाकला तर तो तिच्यापेक्षाही जास्त ओशाळला होता. दहा मिनिटात गाडी शिवाजी नगर बस स्टँड मध्ये घुसली. चार तासाची मैत्री अशी अबोल्यात संपू नये, असं दोघांनाही वाटत होतं. मात्र काय बोलावं? कुणालाच काही समजत नव्हतं. गाडीतून खाली उतरल्यावर संजय ने बोलायला सुरुवात केली.


"चला मग, निघू या..!"


"मला ना जाम तहान लागलीये.."


'मी आपल्याला बियर पाजू शकतो, बर का..'


मिश्किलपणे संजय बोलला. 


"मी पिऊ शकते..पण बियर पिऊन घरी काशी जाणार?


अनपेक्षित धक्का.. "हीला म्हणावं घरी कशाला जाते..चल की माझ्याबरोबर..!"


पण संजयची हिम्मत झाली नाही. संजयला विचारात बघून तृप्तीनेचं पुढाकार घेतला.


"माझ्याकडे पैसे पण आहेत..मला फक्त कॉल्डड्रिंक पिण्यासाठी कंपनी पाहिजे.."


आता बस झालं, ही आपली खेचते का? संजय ने आता तिला बिनधास्तपणे विचारलं.


"चल की बियरचं घेऊया..हवं तर माझ्याकडे थांब काहीवेळ. वाटलं तर तुला सोडतो नंतर घरी."


'किती वेळ लावता बोलायला..!"


दोघांची नजरानजर..डोळ्यांनी डोळ्यांचं काम केलं. अन संजय ने टॅक्सी थांबविली.


 'ग्रँड हॉटेल' रुम न. 105


"ए तू घेतलीच पाहीजे, थोडीशीच, बघ ट्राय करुन" कमरेत हात घालत त्यानं तिला जवळ ओढलं. तिनंही लटकं नको नको करत थोडीशी घेतलीच. थोडीथोडी करत अर्धा ग्लास संपवला.

"मस्त आहे, पण चव चांगली नाही." छताकडं बघत ती म्हणाली. ही नशा काही वेगळीच होती.


सकाळी 8 वाजता संजय जागा झाला..बाजूला तृप्ती नव्हती..गेली वाटतं.. अरे आपण तिचा नंबर ही घेतला नाही..स्वतःवर चरफडत असताना संजयला टेबलावर ठवलेली एक चिट्ठी दिसली..दोनच ओळी.


"तुम्ही मनाने फार चांगले आहात.. तुमच्या भेटीचा हा 'अनपेक्षित लाभ' कायम स्मरणात राहील. भविष्यात कधी पुन्हा भेटीचा योग आलाच तर आपण मला ओळख देणार नाही, याची खात्री आहे..!

- तृप्त झालेली तृप्ती


आता संजयला एसटीचा प्रवास कंटाळावाणा वाटत नाही..पुन्हा एकदा 'अनपेक्षित लाभ' होण्याची तो आता वाट पाहत आहे..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama