अनोळखी ओळख
अनोळखी ओळख
तो -Hi! कशी आहेस?
ती-मी मस्त!पण sorry मी ओळखलं नाही आपल्याला.
तो-खरंच गौतमी!
ती-बापरे! तुम्हाला माझं नाव कसं माहित?
तो-मला तुझा प्रत्येक क्षण न् क्षण माहित आहे.तू कधी चिडलीस,रुसलीस,रागावलीस...अगदी राग अनावर होऊन शिव्या कधी हासडल्यास ते सुद्धा!😊
ती-O hello! कोण आहेस तु? मी ओळखत नाही तुला आणि बाजुला सरक मला पुढं जायचंय.
तो-अरे!तुम्हीवरुन direct तु वर😳 ठिक आहे ,तुझा हक्क आहे😉 आणि मी तुझी वाट नाही अडवत आहे .मला माहित आहे तु थांबणार नाही माझ्यासाठी पण ऐकना! एकदा प्रयत्न कर ना मला आठवायचा please.
ती-नाही आठवत
तो-please, थोडा मेंदुवर जोर दे आठवेल काही...
ती-ए! हे बघ,माझी बुद्धी तल्लख आहे व memory पण strong आहे .नाही आठवत आणि बास हं! सरक बाजुला मला जाऊ दे!
तो-बरं!पण ते diet करणार होतीस त्याचं काय?
ती-नाही ना!थोडे दिवस केलं पण परत येरे माझ्या....एक मिनीट,तुला कसं माहित? हसु नको हं!उत्तर दे.
तो-बरं!वजन झालं का कमी?😃
ती-नाही ना यार!उलट अजुन...एक मिनीट, हे तुला..हसु नकोस हं!
तो-swimming चं काय?
ती-लावला होता मी पण सोडला
तो-बुडालीस म्हणुन घाबरुन सोडलास हो ना!😄
ती-खरंच घाबरलेले.तुला काय जातं हसायला.नाकातोंडात पाणी..(मध्येच वाक्य तोडत)
तो-अगं 3-4 फुट पाणी असेल,उभी राहिली तेव्हा कंबरे एवढं पाणी होतं फक्त पण कसली तंतरलेली तुझी😅😂
ती-तुला कसं?
तो-झुंबा का काय लावणार होतीस,शेवटपर्यंत तोंडच नाही दाखवलं त्या क्लासला.
ती- हो ,प..
तो-आणखीही बरंच काही बाही ठरवलं होतंस,तु विसरलीस पण मी नाही .सुरुवातीला केले प्रयत्न पण नंतर येरे माझ्या मागल्या...
ती-please ,सांग ना कोण आहेस तु?
तो-अजुन नाही ओळखलंस,मी सरणारे वर्ष! कसं ओळखशील? वर्षाच्या सुरुवातीलाच इतक्या संकल्पांनी मला नटवलंस.मी पण खुश होतो माझं रूप पाहुन.तु ही सुरुवातीला 100% प्रयत्न केलेस पण मग.... विसरले, कंटाळा,टंगळमंगळ सुरु झाली व नंतर तर साफ मला तुझ्या आयुष्यातुन सोयीस्कररित्या बाजुला केलेस.इतके की आज शेवटच्या दिवशी तुझा निरोप घ्यायला मी भेटलो तर तु ओळखलंस सुद्धा नाही...😊 चल थोडेच तास राहिलेत.डोळेभरुन बघतो तुला.
अगं वेडाबाई! रडायला काय झालं? हे बघ,मी तुला बोल नाही लावत पण Please Dear येणार्या माझ्या मित्राबाबतीत म्हणजे नववर्ष गं,असं करु नकोस.
ती-sorry यार! खरंच मी पुन्हा अशी चुक नाही करणार. उत्साहात भरमसाठ संकल्प करुन नंतर त्यांना मोडीत काढणार नाही.विचारपुर्वक संकल्प करेन. 99% प्रयत्न करेन पार पाडण्याचा. ए! please 1% सुट दे ना !
तो- बरं दिली सुट! खुश!!!
ती-Thank you Dear!!! पुन्हा ही अशी अनोळखी ओळख नाही होणार promise!☺
तो-Happy New Year In advance!
ती-bye ! miss you!
तो-bye! miss you too Dear!
तुम्हीपण अशी अनोळखी ओळख होऊ देऊ नका.छान संकल्प करा व ते पार पाडण्याचे 99% प्रयत्न करा.
Happy New Year !!!
गौतमी सिद्धार्थ( 23/12/2020)
