Yogita Takatrao

Inspirational

5.0  

Yogita Takatrao

Inspirational

अनोख नातं

अनोख नातं

3 mins
2.1K


आज संदीप च्या आईचं तेरावं होतं.ती कर्करोगाने जाऊन आज तेरा दिवस झाले,त्याला आईने कधीच त्याच्या वडिलांबद्दल कळूच नाही दिलं आणि ती आसमंतात विलीन झाल्यावरही संदीप ला वडिलांबद्दल कळू नये ह्याची खास खबरदारी घेतली होती त्याच्या आईने मरणा आधीच!त्याची आई शेवटच्या काळात त्याच्या सावत्र बहिणी कडेच होती केरळमध्ये,तिची इच्छाच होती तशी की शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्या नंतरची सगळी कार्य गावात व्हावी अर्थात कर्करोगाने पिडित असल्याने आईला आधीच तिच्या मरणाची कुणकुण लागली होती. म्हणुनच ती संदीप कडुन मुंबईतून निघून मुलीकडे गावी जाऊन राहीली होती. आणि गावी भाषा वेगळी आईला,बहिणीला येत असे,पण संदीपला नव्हती येत.


त्याला आठवलं मरणापूर्वी तो सहकुटूंब गावी गेला होता तेव्हा सावत्र बहिणीने भाषे चा अडसर असूनही त्यांच उत्कृष्ट पद्धतीने आदरातिथ्य केलं होतं! आई दोन बहिण भावांमध्ये दुभाषकाच काम करत होती कारण बहिणीला तमिळ यायची फक्त आणि संदीप ला मराठी ,हिंदी आणि इंग्रजी,संवाद साधताना आई नसायची तेव्हा संवादाचा बट्ट्याबोळ व्हायचा सगळा!आणि आता तर.......आईच नाही त्याची मदत करायला! अचानक मन भानावर आलं संदीपच!

तो सहकुटूंब रेल्वतून उतरायची तयारी करत होता,स्टेशन जवळ जवळ येत चाललं होतं. तसं त्याचं मन परत हळूच आतल्या मनाला साद घालू लागले. त्याच्या मुलीला किती छान कपडे आणि सोन्याचे दागिने दिले होते बहिणीने आणि हे कमीच की काय! तिच्या शेजारीनींही द्यावे ?एवढी घनिष्ठतता ?कुठे अनुभवली नव्हती त्याने,तो तिकडे गेला म्हणुन सगळे ओळखीचे सोयरे येऊन त्याला सहपरिवारासह भेटून गेले.येताना कोणीही खाली हात आलेच नव्हते.मिठाई आणि हे मोठ्ठे केळीचे घड घेऊन आले होते. त्याच्या छोट्या मुलीला कोण अप्रुप वाटलं होतं ह्या गोष्टीचं! खूप खुश असायची त्याची मुलगी आणी बायको सुध्दा गावी आल्यावर!

संदीप च्या बायकोनेही खूप मदत केली होती,तिच्या परिने आणि पाठिंबा सुध्दा होता तिचा संदीपला,जेव्हा जेव्हा तिला सुट्टी नसे,ती संदीपला सांगे ,जाऊन ये तु गावी आईकडे! तिला ही गावी खूप आपलेपणा वाटायचा पण नोकरी मुळे एवढ्या लांब जाणं अशक्य व्हायचं आणि सारखी रजाही मिळणार नव्हती. पण त्याही परिस्थितीत दोघेही तडजोड करून सांभाळून घेत होते.आणि गावी बहिण आईचं सगळंच प्रेमाने करत होती म्हणून ह्या दोघांना खूप पाठबळ होतं तिचं!

आई अचानक गेली आणि बहिणीच्या मुलीचा फोन आला ,आई गेल्याचा,ती पोलिस होती आणि तिला इंग्रजी चांगले अवगत होते ,तिनेच कळवल आई गेल्याचं,नाहीतर भाषेचा अडसर,कसं कळलं असतं ह्यांना मुंबईत,शेवटचं मुख दर्शनही लाभलं नसत ,आयुष्यभर सल लागून राहिली असती.

संदीप जरी विचारांत गुरफटलेला पण नजर मात्र चाणाक्षपणे

ईच्छित स्थळ आल्याचा सुगावा देऊन गेली. तो तडक सामान आणि कुटुंबियांना रिक्षाने घेऊन बहिणीच्या घरी पोहोचला. बहिणीने सगळी तयारी करून ठेवली होती कार्याची,भाऊ,वहिनीचींच वाट बघत होती.आणि आईच्या तेराव कार्य सुरळीत पार पडले बहिणीमुळेचं! बहिणीने कसलीशी महत्त्वाची कागदं संदीपच्या हाती सुपूर्द केली. बहिणीच्या मुलीने इंग्रजीतून संवाद साधला मामाबरोबर,मामा हे आजीचे बँकेत ठेवलेल्या पैशांचे तपशील. आई म्हणाली की तूच बघ त्याच काय ते! संदीप ने कागद उघडून वाचून पाहिला,आईने लाखो रुपये जमवून ठेवले होते आणि बहिणीने त्या कडे एकदम सहजपणे दिले,ना आढेवेढे ?ना त्या पैशांवर हक्काची झालर! एवढा विश्वास? थोडया दिवसांतच?जिथे लोकं भांडतात , भावां-भावांमध्ये ,बहिण-भावांमध्ये जिकडे आईवडीलांच्या मालमत्तेचे भांडवल होऊन मोठी मोठी भांडणं होतात तिथे हा अनुभव अनपेक्षितपणे पणे त्याला कायमस्वरूपी हक्काची बहिण देऊन गेला,जिथे भाषा समजत असूनही भावंड एकमेकांना सांभाळून,समजुन न घेता मालमत्तेच्या वादात अडकतात तिथे हा प्रसंग सुखावणारा होता. संदीपचं मन आणि ऊर दोन्हीही अभिमानाने दुथडी भरून वाहू लागले. त्याने आदरयुक्त नजरेने बहिणीकडे एक कटाक्ष टाकला आणि तो त्याच्या भाचीला म्हणाला मी ह्याचे समान भाग करेन.आणि माझा हिस्साही बहिणीला कामाला आला तर चांगलच आहे,त्याने मनात ठरवून टाकलं.

निरोप घेताना संदीप आपल्या सावत्र बहिणीचा सख्खा भाऊ झाला होता. वास्तविक त्याने आतापर्यंत मित्रपरिवारात त्यांचे अनुभव ऐकले होते! आईवडील गेले की आनंदाने एकत्र नांदणारी भावंड वेगळी होतात,संदीपला आई गेल्यावरही बहिणीच्या रूपात एक अनोख नातं मिळाल होतं ,कायमस्वरूपी !


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational